फोटो – ट्विटर

इंग्लंड क्रिकेटला एक अभूतपूर्व प्रसंग सामोरं जावं लागलं आहे. पाकिस्तान विरुद्धची वन-डे सीरिज (ENG vs PAK) सुरु होण्याच्या दोन दिवस आधी त्यांच्या टीममधील 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे संपूर्ण टीम सध्या आयसोलेशनमध्ये आहे. या परिस्थितीतही सीरिज होईल असा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) घेतला. त्यामुळे 9 नव्या खेळाडूंसह (Uncapped) इंग्लंडची टीम पाकिस्तानविरुद्ध उतरणार आहे. इंग्लंडच्या टीममध्ये 9 ची नवलाई असूनही निवड समितीनं अनुभवी खेळाडू अ‍ॅलेक्स हेल्सकडे (No Alex Hales) पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे.

नव्या इंग्लंडचा ओपनर

6 फुट 5 इंच उंचीच्या अ‍ॅलेक्स हेल्सनं वयाच्या 21 व्या वर्षी 2011 साली भारताविरुद्ध T20 क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तीन्ही प्रकारात इंग्लंडकडून ओपनिंग केलेल्या हेल्सचा खेळ लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने बहरला.

2015 मधील वर्ल्ड कप अपयशानंतर (Cricket World Cup 2015) इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) नेतृत्वाखाली आक्रमक लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटची टीम बनवण्यात आली. त्या टीमचा हेल्स हा ओपनिंग बॅट्समन होता. आता ज्या पाकिस्तान विरुद्ध वन-डे सीरिज होत आहे त्या पाकिस्तान विरुद्ध त्याने 2016 साली 171 रनची विशाल खेळी हेल्सनं केली होती. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडनं 3 आऊट 444  हा वन-डे क्रिकेटमधील विशाल सर्वोच्च स्कोअर उभा केला. ऑस्ट्रेलिया विरुद्धही 2018 साली नॉटींगहममध्ये झालेल्या वन-डेमध्ये त्याने 147 रनची आक्रमक खेळी केली होती.

हेल्स 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी (Cricket World Cup 2019) डोपिंगमध्ये दोषी आढळला. त्यानंतर त्याला शिक्षा झाली. पण ही शिक्षा संपल्यानंतरही त्याच्यासाठी टीमचे दरवाजे उघडलेले (No Alex Hales) नाहीत. कॅप्टन मॉर्गनचा असलेला विरोध हे यामागील कारण समजले जात आहे.

हेल्सचा फॉर्म

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमधील या सिझनमध्ये (Big Bash League 2020-21) हेल्सनं सिडनी थंडर (Sydney Thunder) कडून खेळताना 15 मॅचमध्ये 161.60 च्या स्ट्राईक रेटनं 543 रन काढले. यामध्ये 51 बॉलमध्ये झळकावलेल्या सेंच्युरीचाही समावेश आहे. या बिगबॅश सिझनमध्ये सर्वात जास्त रन हे हेल्सनंच काढले आहेत.

ड्रग्ज घेतल्यामुळे वर्ल्ड कप टीममधून झाली होती हकालपट्टी, आता ठोकली 51 बॉलमध्ये सेंच्युरी!

इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या व्हायटॅलिटी ब्लास्टमध्ये (Vitality Blast) हेल्सनं ही बातमी लिहीत असताना (6 जुलै 2021) 11 मॅचमध्ये 172.07 च्या स्ट्राईक रेटनं 382 रन काढले आहेत. यामध्ये एका सेंच्युरीचा समावेश आहे.

जगभरातील T20 लीग, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुभव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉर्मात असूनही इंग्लंडच्या निवड समितीनं या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हेल्सकडे दुर्लक्ष (No Alex Hales) केले आहे. त्याची टीममध्ये निवड न होणे हे क्रिकेट फॅन्ससाठी धक्कादायक आहे. त्याचबरोबर त्यामुळे हेल्ससाठी इंग्लंड टीमचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

इंग्लंडची टीम : बेन स्टोक्स (कॅप्टन), जॅक बॉल, डॅनी ब्रिग्स, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, लुईस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेव्हीड मलान, क्रेग ऑवर्टन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड पेन, फिल साल्ट, जॉन सिम्पसन आणि जेम्स विन्स

error: