फोटो – ट्विटर

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यातील सीरिज सुरु होण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. त्याचवेळी इंग्लंडच्या टीममध्ये कोरोना व्हायरसचा स्फोट (Corona in England Team) झाला आहे. इंग्लंड टीममधील 3 खेळाडू आणि 4 मॅनेजमेंटच्या सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

इंग्लंडची वन-डे क्रिकेट टीम आता आयसोलेशनमध्ये आहे. तसंच स्थानिक आरोग्य विभागाच्या संपर्कात आहे. पाकिस्तान विरुद्धची वन-डे सीरिज 8 जुलै रोजी सुरु होत आहे, या सीरिजपूर्वी इंग्लडच्या टीममध्ये कोरोना स्फोट झाल्यानं त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

सीरिजचं काय होणार?

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) बायो बबलमधील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तातडीने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आता आयपीएलमधील उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरू होतील. भारतामधील कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धा आणि  त्यानंतर होणारा T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) भारतामधून यूएईमध्ये हलवण्यात आले आहेत.

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान वन-डे सीरिजपूर्वी इंग्लंड टीममधील 7 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona in England Team) आढळले आहेत. त्यानंतरही ही स्पर्धा रद्द किंवा स्थगित होणार नाही. ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केले आहे.

कोण होणार कॅप्टन?

इंग्लंडमधील आयसोलेशनच्या नियमानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहणे आवश्यक आहे. इंग्लंडच्या टीममध्ये कोरोना ब्लास्ट झाल्यानं त्यांच्या संपर्कातील सर्वांना पुढील 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहवं लागेल.

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान वन-डे सीरिजमधील मॅच 8, 10 आणि 13 जुलै रोजी आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे आयसोलेशनच्या काळातच ही संपूर्ण वन-डे सीरिज होणार आहे. त्यातच ही सीरिज स्थगित होणार नाही, असंही ECB नं स्पष्ट केलंय.

IPL 2021 स्थगित, कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या वाढल्यानं BCCI चा निर्णय

या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये बेन स्टोक्सची (Ben Stokes) इंग्लंडच्या वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून घोषणा केली आहे. स्टोक्सला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमधून माघार घेतली. या दुखापतीनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही.

पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये स्फोट (Corona in England Team) स्टोक्स इंग्लंड टीमचा कॅप्टन असेल. त्याचबरोबर सध्या काऊंटी क्रिकेट खेळत असलेल्या काही खेळाडूंची PCR टेस्ट करण्यात येत असून त्याचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांचा टीममध्ये समावेश करण्यात येईल.  

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बेन स्टोक्स आयपीएलमधून आऊट

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: