फोटो – इसीबी

इंग्लंड क्रिकेटसाठी सर्वात महत्त्वाची असलेल्या अ‍ॅशेस सीरिजपूर्वी (Ashes Series 2021-22) इंग्लंडला धक्का बसला आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीनं टेस्ट क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा (Moeen Ali Retires) केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या इंग्लंडच्या मोठ्या परिक्षेसाठी मोईन अली हा उपयुक्त क्रिकेटपटू होता. त्याच्या रिटायरमेंटनं इंग्लंडच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानं इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रूट (Joe Root) व्यथित झाला आहे. रूटनं मोईनबाबत घडलेल्या चुकांची कबुली दिली आहे. 

काय म्हणाला रूट?

इंग्लंडमधील पत्रकार रोब जोन्स यांनी जो रूटची प्रतिक्रिया ट्विटरवर शेअर केली आहे. मोईन अलीचा हा निर्णय इंग्लिश क्रिकेटचं नुकसान करणारा आहे, असं रूटनं मान्य केलं आहे. त्याचबरोबर आपण ज्याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर केली असा ग्रेट व्यक्ती असं त्यानं मोईनचं वर्णन केलं आहे.

क्रिकेटमधील मंडळी आणि फॅन्सकडून मोईन हा दुर्लक्षित राहिला. पण त्याला ड्रेसिंग रुममध्ये योग्य वागणूक मिळाली असा दावा रूटनं केला आहे. त्याचबरोबर हा ऑल राऊंडर तरुण खेळाडूंसाठी उत्तम रोल मॉडेल असल्याची कबुली रूटनं दिली आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या मॅनेजमेंटनं त्याला वेगळी वागणूक द्याला हवी होती, असंही रूटनं मान्य केलं आहे.

‘मोईन अलीची कारकिर्द हे त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाची साक्ष आहे. ड्रेसिंग रूम ज्याच्याशी शेअर केली असा एक तो ग्रेट व्यक्ती आहे. त्याला (Moeen Ali Retires) ड्रेसिंग रूममधून नाही तर क्रिकेट फॅन्स आणि क्रिकेटमधील मंडळींकडून दुर्लक्षित वागणूक मिळाली. आम्ही काही गोष्टी त्याच्याशी वेगळ्या पद्धतीनं करायला हव्या होत्या. अर्थात हे मागं वळून बघतान बोलणे सोपे आहे.’ असं रूटनं सांगितलं.

‘आता ते उद्योग बंद करा,’ इंग्लंडच्या कॅप्टनची क्रिकेट बोर्डाकडे मागणी

मोईन अलीची कारकिर्द

ग्रॅमी स्वान रिटायर झाल्यानंतर इंग्लंडच्या टेस्ट टीमला स्पिन बॉलरची गरज होती. मोईन अलीनं ती गरज पूर्ण केली. त्याच्या बॅटींग कौशल्यामुळेही तो इंग्लंडसाठी उपयुक्त खेळाडू बनला. हेंडिंग्लेमध्ये कारकिर्दीतल्या दुसऱ्याच टेस्टमध्ये मोईननं सेंच्युरी झळकावली होती. त्यानं 64 टेस्टमध्ये 28. 29 च्या सरासरीनं 2914 रन काढले. त्यामध्ये 5 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरीचा समावेश होता.

इंग्लंडचा महान ऑल राऊंडर इयान बोथमच्या आधी टेस्ट क्रिकेटमध्ये 2000 रन आणि 100 विकेट्सचा टप्पा मोईननं पूर्ण केला होता. मोईननं 64 टेस्टमध्ये एकूण 195 विकेट्स घेतल्या.  एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं 5 वेळा तर टेस्टमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं 1 वेळा केली आहे.

…तर लवकरच इंग्लंड टीममध्ये दक्षिण आफ्रिकेतून मोठी भरती करावी लागेल!

निर्णयाचे पडसाद उमटणार

मोईन अली हा T20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये आहे. तसंच अ‍ॅशेस सीरिजसाठी त्याची निवड नक्की मानली जात होती. तसंच सध्या तो आयपीएलमध्येही खेळतोय. या सततच्या क्रिकेटमुळे त्याला बराच काळ घराच्या बाहेर राहावं लागणार होतं. त्याला मोईन तयार नव्हता. त्यामुळे त्यानं रिटायरमेंट घेतली असं मानलं जात आहे.

बायो-बबलमुळे बदललेली परिस्थिती हा सध्या जागतिक क्रिकेटमध्ये आणि विशेषत: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठ्या चर्चेचा विषय आहे. मानसिक ताण अस्वस्थ झाल्यानं बेन स्टोक्सनं (Ben Stokes) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. तो T20 वर्ल्ड कप खेळणार नाही. त्याचा अ‍ॅशेसमधील सहभाग देखील अनिश्चित आहे. स्टोकस क्रिकेटपासून दूर असताना इंग्लंडचा दुसरा ऑल राऊंडर मोईननं टेस्ट क्रिकेट सोडल्याचा फटका (Moeen Ali Retires) इंग्लंडला आगामी काळात बसणार आहे. तसंच क्रिकेटपटूंचं वर्कलोड हा मुद्दा देखील पुन्हा एकदा इंग्लंड क्रिकेटमध्ये ऐरणीवर येणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: