फोटो – ट्विटर

इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं वन-डे प्रकारातून निवृत्ती (Ben Stokes to retire from ODI Cricket) जाहीर केली आहे. जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला वन-डेचा एकमेव वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. स्टोक्सनं 3 वर्षांपूर्वी जुलै महिन्यामध्येच झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2019) नाबाद 84 रनची अविस्मरणीय खेळी केली होती. स्टोक्सच्या खेळीमुळेच न्यूझीलंड विरूद्ध झालेली ती फायनल टाय झाली. सुपर ओव्हरमध्येही लढत बरोबरीत सुटल्यानं इंग्लंडला अधिक फोर लगावण्याच्या नियमाच्या आधारे वर्ल्ड चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले.

काय म्हणाला स्टोक्स?

बेन स्टोक्सची याच वर्षी इंग्लंडच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून निवृत्तीचं कारण सांगितलं आहे. ‘मी मंगळवारी डरहॅममध्ये इंग्लंडकडून शेवटची आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच खेळणार आहे. मी या प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्यासाठी अवघड निर्णय होता. माझ्या टीममधील सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून खेळताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. आमच्यासाठी हा अविस्मरणीय प्रवास होता.

मला हा निर्णय घेणे अवघड गेले असले तरी काही तथ्यं मान्य केली पाहिजेत. मी या प्रकारात माझ्या सहकाऱ्यांसाठी आणि इंग्लंडसाठी 100 टक्के योगदान देऊ शकत नाही. तीन्ही प्रकार खेळणे माझ्यासाठी खूप जास्त आहे. आमच्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांना आता माझं शरीर साथ देत नाही. जोस आणि टीमसाठी सर्वस्व देऊ शकेल अशा खेळाडूची जागा मी अडवत आहे, असं मला वाटतंय.’ असं सांगत स्टोक्सनं वन-डे प्रकारातून निवृत्ती (Ben Stokes to retire) जाहीर केली आहे.

जिद्द, संघर्ष, गुणवत्तेची कमाल, वर्ल्ड कप व्हिलन बनला देशाचा हिरो!

काय आहे स्टोक्सचे लक्ष्य?

सध्याच्या क्रिकेटमधील दिग्गज ऑल राऊंडर असलेल्या बेन स्टोक्सनं आता आपलं लक्ष्य टेस्ट आणि T20 असल्याचं जाहीर केलं आहे. स्टोक्सला जून महिन्यामध्ये इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन करण्यात आलं आहे.

तो कॅप्टन झाल्यानंतर या प्रकरात अडखळत असलेल्या इंग्लिश टीमनं सलग 4 टेस्ट जिंकल्या आहेत. आता वन-डे प्रकारातून निवृत्त झाल्यानंतर टेस्ट खेळण्यासाठी फ्रेश राहण्यात स्टोक्सला मदत होईल. टेस्ट क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी त्यानं यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतूनही माघार घेतली होती.

स्टोक्सची कारकिर्द

बेन स्टोक्सनं 2011 साली आयर्लंड विरूद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण (Ben Stokes to retire) केले. मागील 11 वर्षात तो 104 वन-डे खेळला. यामध्ये त्यानं 39.44 च्या सरासरीनं 2919 रन केले असून त्यात 3 सेंच्युरी आणि 21 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याचबरोबर स्टोक्सनं या प्रकारात 6.02 च्या इकोनॉमी रेटनं 74 विकेट्स घेतल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: