फोटो – ट्विटर, आसीसीसी

जागतिक शांततेला नख लावणाऱ्या तालिबान दहशतवाद्यांचा गॉडफादर असलेला पाकिस्तान (Pakistan) नाचक्की होण्याची एकदी संधी सोडत नाही. पाकिस्तानची आर्थिक अवस्था सध्या बिकट आहे. त्यांचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) जगभर पैशांची भीक मागत फिरत असतात. त्याचबरोबर दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानात खेळाडूंना पाठवण्याची क्रिकेट बोर्डांना धास्ती बसली आहे. न्यूझीलंडनं काही दिवसांपूर्वी पहिली वन-डे सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी दौरा रद्द केला होता. आता त्यापाठोपाठ इंग्लंडच्या क्रिकेट टीमनं पाकिस्तानाचा नियोजित दौरा रद्द (England Called Of Pakistan Tour) केला आहे.

काय घेतला निर्णय?

इंग्लंड क्रिकेट टीम 2 T20 मॅच खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार होती. 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी हा दौरा होणार होता. त्याचबरोबर इंग्लंडची महिला टीम 3 वन-डे आणि 2 T20 मॅचच्या सीरिजसाठी पाकिस्तानचा दौरा करणार होती. आता इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (England Cricket Board) पाकिस्तानचा हा संपूर्ण दौरा रद्द केला आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) याबाबतचं एक वक्तव्य जारी केलं आहे. यामध्ये इसीबीनं मागच्या आठवड्यात पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत चर्चा केली. यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही टीमचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला (England Called Of Pakistan Tour) आहे, असं जाहीर केलं.

भारतविरोधी विखार भरलेला क्रिकेटपटू कमी, गुंड जास्त

काय केली घोषणा?

इसीबीनं यावेळी पाकिस्तानचा दौरा का रद्द केला याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. ‘आमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे मानसिक आणि शारीरिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिथं जाण्यासाठी आमच्या मनात काळजी आहे.

क्रिकेटपटू सध्या कोरोना नियमांनी त्रस्त आहेत. त्यामध्ये पाकिस्तानचा हा दौरा करणे चांगले असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आगामी T20 वर्ल्ड कपच्या आमच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो. हा वर्ल्ड कप ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

आमच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) प्रचंड निराश होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. ते गेल्या काही वर्षांपासून देशांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू व्हावं यासाठी सातत्यानं काम करत आहेत. मागील दोन उन्हाळ्यात त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची मोठी मदत केली आहे. आमच्या या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामाबद्दल आम्ही दु:खी आहोत. 2022 साली आम्ही आमचं वचन पूर्ण करू.’ असं गाजर इसीबीनं पाकिस्तानला दाखवलं आहे.

IPL ला होणार फायदा

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाचा मोठा फायदा सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) होणार आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यामुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू ‘प्ले ऑफ’ पूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडणार होते. आता हा दौराच रद्द झाल्यानं (England called of Pakistan Tour) इंग्लंडचे आयपीएलमधील सर्व खेळाडू फायनलपर्यंत उपलब्ध असतील.  

अचानक काय झालं? पाकिस्तानचे हेड मिसबाह उल हकनं राजीनामा देण्याचं खरं कारण…

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: