फोटो – ICC

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-3 असा पराभव झाल्यानंतर इंग्लंडची नवी सीरिज न्यूझीलंड (England vs New Zealand Test Series 2021) विरुद्ध बुधवार (2 जूनपासून) सुरु होत आहे. केन विल्यमसनच्या टीम विरुद्ध ही  दोन टेस्टची सीरिज इंग्लंडमध्येच होणार आहे.  या सीरिजनंतर इंग्लंडची पुढील टेस्ट सीरिज टीम इंडिया विरुद्ध आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडला याचवर्षी झालेल्या पराभवाचा बदला होम ग्राऊंडवर घेण्याची संधी आहे. त्याचबरोबर भारताविरुद्ध इंग्लंडचा सर्वात यशस्वी बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) हा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड (Anderson Record) मोडण्याची शक्यता आहे.

अँडरसनला अनेक रेकॉर्ड करण्याची संधी

इंग्लंड टीम होम ग्राऊंडवर सलग 7 टेस्ट खेळणार आहे. या टेस्टमध्ये अनेक रेकॉर्ड होतील. यापैकी काही रेकॉर्ड जेम्स अँडरसन करु शकतो. अँडरसन न्यूझीलंड विरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅच खेळला तर इंग्लंडकडून सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारा क्रिकेटपटू होईल. 2003 साली लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध पदार्पण केलेल्या अँडरसनने आजवर 160 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. इंग्लंडकडून सर्वात जास्त 161 टेस्ट माजी कॅप्टन अ‍ॅलिस्टर कुकने (Alastair cook) खेळल्या आहेत. कुकचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला आता आणखी दोन टेस्ट खेळण्याची गरज आहे.

अँडरसनचे न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये सर्वात जास्त लक्ष हे अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडण्यावर असेल. अँडरसननं यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये 600 टेस्ट विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पूर्ण करणारा तो एकमेव फास्ट बॉलर आहे. अँडरसनच्या नावावर सध्या 614 विकेट्स असून अनिल कुंबळेला मागे टाकण्यासाठी त्याला आता आणखी 6 विकेट्सची गरज (Anderson Record) आहे.

‘पिच दोघांनाही सारखे होते, त्यात भारतीय खेळाडू उजवे ठरले’

अँडरसनला फक्त अनिल कुंबळे नाही तर भारताचा आणखी एक स्पिनर आर. अश्विनचा (Ravichandran Ashwin) रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. टेस्ट क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याच्या यादीत अँडरसन आणि अश्विन सध्या बरोबरीत आहेत. या दोघांनीही आजवर 30 वेळा ही कामगिरी केलीय. अँडरसनला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. अर्थात आर. अश्विन देखील इंग्लंडमध्ये 6 टेस्ट मॅच खेळण्यासाठी दाखल होत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये याबबतीत शर्यत रंगणार आहे. अँडरसनला जो टप्पा गाठण्यासाठी 160 टेस्ट लागल्या. तो टप्पा अश्विननं 78 टेस्टमध्येच पूर्ण केलाय, ही गोष्ट इथे विसरता येणार नाही.

सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

जेम्स अँडरसन इंग्लंडच्या होम सीरिजमधील 7 पैकी 6 टेस्ट खेळला तर मायदेशात सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळण्याचा सचिनचा रेकॉर्ड तो मोडेल. सचिननं त्याच्या 200 टेस्टपैकी 94 टेस्ट या भारतामध्ये खेळल्या आहेत. या यादीत अँडरसन सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 160 पैकी 89 टेस्ट इंग्लंडमध्ये खेळल्या आहेत.

सचिन तेंडुलकरसह 4 दिग्गज क्रिकेटपटू ज्यांनी खेळली फक्त 1 T20 मॅच

त्यामुळे अँडरसन आगामी 7 पैकी 6 टेस्ट खेळल्यास सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड (Anderson Record) मोडेल. मायदेशात सर्वाधिक टेस्ट खेळण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग (92 टेस्ट) आहे. तर अँडरसन हा अ‍ॅलिस्टर कुक आणि स्टीव्ह वॉ सह (प्रत्येकी 89 टेस्ट) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: