
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं IPL 2021 ही स्पर्धा अचानक अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. या स्पर्धेतील 60 पैकी 29 मॅच झाल्या असून 31 बाकी आहेत. या मॅच झाल्या नाहीत तर बीसीसीआयला (BCCI) मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित स्पर्धा या वर्षात पुन्हा एकदा घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर होण्यापूर्वीच एक अडचण समोर आली आहे. या टप्प्यात इंग्लंडचे खेळाडू (England Players In IPL 2021) सहभागी न होण्याची शक्यता आहे.
काय आहे अडचण?
इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट अॅश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी याबातचे संकेत दिले आहेत. “आमचा एफटीपी (future tour programs) भरगच्च आहे. त्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचा दौरा झाला तर आमचे खेळाडू त्या दौऱ्यावर जातील अशी अपेक्षा आहे.” असं जाईल्स यांनी सांगितलं.
“आयपीएल स्पर्धा कधी आणि कुठे होईल याबाबत आपल्याला सध्या कोणतीही कल्पना नाही. आता न्यूझीलंड दौऱ्यापासून आमच्या क्रिकेटला सुरुवात होईल. यावेळी आम्ही मोठ्या प्रमाणात व्यस्त आहोत. T20 वर्ल्ड कप तसंच अॅशेस सीरिजसारख्या महत्त्वाच्या मालिका आमच्या समोर आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या खेळाडूंचा (England Players In IPL 2021) विचार करावा लागेल.” असं जाईल्स यांनी स्पष्ट केले.
IPL 2021 पुन्हा होणं शक्य आहे? वाचा काय आहेत BCCI समोरचे पर्याय
‘या’ दौऱ्यांना देणार प्राधान्य?
बीसीसीआयची सप्टेंबर किंवा T20 वर्ल्ड कप नंतर लगेच आयपीएलचं आयोजन करण्याची शक्यता आहे. इंग्लंडची टीम सप्टेंबर महिन्यात वन-डे आणि T20 सीरिज खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी त्यांचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. हा दौरा खरंच वेळापत्रकाप्रमाणे झाला तर तब्बल 16 वर्षांनी इंग्लंडची क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. त्याचबरोबर T20 वर्ल्ड कपनंतर इंग्लंडची टीम अॅशेस सीरिजच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे.
कोणत्या टीमना फटका बसणार?
गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडच्या टीमचं आयपीएलमधील महत्त्व वाढलं (England Players In IPL 2021) आहे. सध्या जोफ्रा आर्चर, जोस बटलर, बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स), सॅम करन, मोईन अली (चेन्नई सुपर किंग्स), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय (सनरायझर्स हैदराबाद) इऑन मॉर्गन (कोलकाता नाईट रायडर्स), सॅम बिलिंग्ज, ख्रिस वोक्स, टॉम करन (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड मलान, ख्रिस जॉर्डन (पंजाब किंग्ज) हे इंग्लंडचे प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये आहेत. त्यामुळे या टीमना इंग्लंडनं खेळाडू न पाठवल्यास फटका बसू शकतो.
IPL 2021 स्थगित झाल्यानं BCCI चं हजारो कोटींच नुकसान, टीमनाही मोठा आर्थिक फटका
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.