फोटो – ‘द सन’

इंग्लंड क्रिकेटचा विकृत चेहरा जगानं पुन्हा एकदा अनुभवला आहे. इंग्लंडमधील प्रतिष्ठीत यॉर्कशर कौंटी क्लबमध्ये वर्णद्वेषाचं प्रकरण (Yorkshire Racism Row) सिद्ध झालं आहे. त्याहूनही संतापाची बाब म्हणजे यॉर्कशर क्लबनं या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास नकार दिला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रूट (Joe Root On Racism) याने तोंड उघडलं आहे. रूट सध्या अ‍ॅशेस सीरिजच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियात असून तो यॉर्कशर कौंटी टीमचा खेळाडू आहे.  

यॉर्कशर क्लबचं धोरण काय?

यॉर्कशर क्लबच्या T20 टीमचा माजी कॅप्टन अजीम रफीक (Azeem Rafiq) यानं क्लबमध्ये आपल्या वर्णद्वेषी वागणूक मिळाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात क्लबच्या अधिकाऱ्यांकडं वारंवार तक्रार करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही रफीकनं केला होता.

या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणाऱ्या टीमनं रफीचे आरोप योग्य असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतरही यॉर्कशर क्लबनी या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यास नकार दिला आहे. इतकचं नाही तर क्लबचे नियामक मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात माफी मांगण्याचा प्रस्तावही त्यांनी फेटाळला आहे. या प्रकरणाचा जगभर बोभाटा झाल्यानंतर अखेर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) यॉर्कशरचं होम ग्राऊंड असलेल्या हेंडिग्लेमध्ये आंतरराष्ट्रीय मॅच होणार नाही, असं जाहीर केलं आहे. यॉर्कशरचा खेळाडू गॅरी बॅलन्सनं रफीकला वर्णद्वेषी वागणूक द्ल्याचं मान्य केल्यानंतर ECB नं ही कारवाई केली आहे.

…तर लवकरच इंग्लंड टीममध्ये दक्षिण आफ्रिकेतून मोठी भरती करावी लागेल!

जो रूट काय म्हणाला?

जो रूट आणि यॉर्कशर क्लबचं अगदी जवळचं नातं आहे. 2007 साली याच कौंटी टीमकडून त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तो या टीमच्या अंडर 17 टीमचाही सदस्य होता. 2014 आणि 2015 साली जो रूटच्या कॅप्टनसीमध्येच यॉर्कशरनं इंग्लिश कौंटी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

‘वर्णद्वेषाच्या मुद्यावर कोणताही वाद होण्याची गरज नाही. हे सहन करता येणार नाही. या प्रकरणामुळे आमचा खेळ आणि आयुष्याचं नुकसान झालं आहे. यामधून आता वर आलं पाहिजे. फॅन्स, खेळाडू, मीडिया आणि क्रिकेटच्या सिस्टममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकानंच हे केलं पाहिजे. आपल्याकडं संधी आहे आणि आपण सर्वांनी हा खेळ चांगला करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’ असं रूटनं (Joe Root On Racism) सांगितलं.

रफीक करणार होता आत्महत्या

अजीम रफीक 2008 ते 2017 या काळत यॉर्कशर क्लबचं प्रतिनिधित्व केलं. तो 2012 साली यॉर्कशरच्या T20 टीमचा कॅप्टन होता. ‘या क्लबमध्ये मला वारंवार वर्णद्वेषी टिप्पणी सहन करावी लागली. या प्रकरणात अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत,’ अशी भावना त्यानं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती.

विशेष म्हणजे इंग्लंड क्रिकेटचा मुख्य चेहरा असलेला जो रूट आणि रफीक चांगले मित्र आहेत. दोघांनी एकाच टीमसाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं आहे. तरीही रफीकला क्लबकडून न्याय (Joe Root On Racism) मिळाला नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: