
हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय बॉलर आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 2001 साली झालेल्या टेस्ट सीरिजचा तो प्रमुख हिरो होता. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजनच्या भारतीय क्रिकेटसाठी असलेल्या योगदानाचा सर्वांना अभिमान आहे. ‘Cricket मराठी’ देखील त्याला अपवाद नाही. पण, हरभजन सिंगनं दहशतवाद्यांचे उद्दात्तीकरण (Harbhajan Singh Glorifies Terrorist) केले. त्यानंतर प्रकरण अंगाशी येतं हे लक्षात येताच माफीनामा सादर केला तो देखील फसवा आहे. त्याची जाणीव आपण प्रत्येकांनी ठेवणे आवश्यक आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारचा इतिहास
हरभजनचं वादग्रस्त प्रकरण समजण्यापूर्वी थोडा इतिहासाचा मागोवा घेणे आवश्यक आहे. भारतीय लष्कराने 1984 साली अंतर्गत सुरक्षेसाठी ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Blue Star) ही मोहीम राबवली. अमृतसरमधील पवित्र सुवर्ण मंदिरात (Golden Temple) लपून बसलेला मुख्य खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) जर्नेल सिंग भिंद्रनवाले (Jarnail Singh Bhindranwale) आणि त्याच्या साथीदाराचा बिमोड करणे हा या कारवाईचा हेतू होता.
भारतीय लष्कराने ही मोहीम फत्ते केली. भिंद्रनवालेसह सुवर्ण मंदिरात लपून बसलेले दहशतवादी मारले गेले. त्याचबरोबर देशाला या कारवाईची मोठी किंमत मोजावी लागली. आपले जवान यामध्ये हुतात्मा झाले. या कारवाईचा आदेश देणाऱ्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी तर तत्कालिन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची 10 ऑगस्ट 1986 रोजी हत्या झाली. खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये अनेक निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या. जवळपास एक दशक पंजाब पेटलेला होता. या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानची सक्रीय मदत होती.
पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?
हरभजनने काय केले?
ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 37 वर्षे झाली. खलिस्तानी संघटना दरवर्षी या काळात निषेध सप्ताह पाळतात. भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करत सामान्य शीख नागरिकांची माथी भडकवण्यासाठी या आठवड्याचा वापर या संघटना करत असतात.
हरभजनने एक पंजाबी भाषेतील पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये भिंद्रनवाले आणि अन्य त्याच्या साथीदारांचे फोटो आहेत. त्यावर, ‘स्वाभिमानाने जगणे आणि धर्मासाठी मरणे.’ असे कॅप्शन आहे. त्याचबरोबर 1 जून ते 6 जून 1984 या काळात श्री हरमंदीर सिंह साहबमध्ये झालेल्या हत्याकांडात शहीद झालेल्या सर्वांना कोटी कोटी नमन. असा मजकूर आहे. हरभजननं हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याचबरोबर त्यावर सर्व शहीदांना प्रणाम असे कॅप्शन देत (Harbhajan Singh Glorifies Terrorist) दोन्ही हात जोडल्याचा इमोजी देखील वापरला आहे.

हरभजनचे स्पष्टीकरण
हरभजनच्या या पोस्टनंतर काही वेळात वाद सुरु झाला. हरभजनने ही पोस्ट डिलीट केली असली तरी अनेकांचे समाधान झाले नाही. त्यावर हरभजनने अखेर स्पष्टीकरणाची पोस्ट टाकत माफी मागितली.
“मी काल एक इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती, मला त्याचे स्पष्टीकरण द्याचे आणि त्याबद्दल माफी मागायची आहे. ते एक व्हॉट्सअप फॉरवर्ड होते. मी ते गडबडीत न पाहता आणि त्याची योग्यता न तपासता पोस्ट केले होते.
त्या पोस्टमधील मजकूर किंवा फोटोमध्ये असलेल्या व्यक्तींचे मी समर्थन करत नाही. मी एक शीख आहे. जो भारतासाठी लढेल, भारताविरुद्ध नाही. आपल्या देशाच्या भावनेला धक्का देण्यासाठी मी बिनशर्त माफी मागतो. मी कोणत्याही देशविरोधी समूहाचे समर्थन (Harbhajan Singh Glorifies Terrorist) करत नाही आणि करणारही नाही.
मी मैदानात 20 वर्ष देशासाठी रक्त आणि घाम गाळला आहे. मी कधीही देशाच्या विरोधात काम करणार नाही.” असे भावनिक आवाहन देखील या पोस्टच्या शेवटी करण्यात आले आहे.
माफीनामा पुरेसा का नाही?
हरभजन सिंगची माफीनाम्याची पोस्ट नीट वाचली तर त्याने बॉल स्पिन करण्याचे सर्व कौशल्य आपले शब्द वळवून सामान्य लोकांबद्दलचा राग कमी करण्यासाठी केली असल्याचे समजते. हरभजनच्या या प्रयत्नानंतर त्याचा ‘दुसरा’ चेहरा आणखी ठळकपणे समोर आला आहे. त्याच्या पोस्टनंतर काही प्रश्न समोर आले आहेत
- हरभजनचे असे कोणते मित्र आहेत जे या प्रकारच्या पोस्ट त्याला फॉरवर्ड करतात. त्यांची तो सायबर गुन्हा शाखेकडे तक्रार करणार का?
- हरभजनला खलिस्तानी दहशतवाद्याचा प्रमुख चेहरा असलेला भिंद्रानवाले ओळखता आला नाही. त्याचा हा दावा तुम्हाला पटतो का?
- आजवरचं सारं आयुष्य पंजाबमध्ये घालवल्यानंतरही भिंद्रनवाले देखील ओळखू न येण्याइतका हरभजन भोळा, लहान, जगाची काहीही माहिती नसलेला व्यक्ती आहे का?
- आपण लाखो फॉलअर्स असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहोत आपण शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टला, फोटोला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्या पोस्टवरील मजकूर वाचला पाहिजे इतकं साधं गांभीर्य हरभजनला नाही का?
- व्हॉट्सअपवरील पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकताना ‘शहीदांना प्रणाम’ हेच शब्द कॅप्शन म्हणून हरभजनला का सुचले अन्य कोणते शब्द का आठवले नाहीत?
- हरभजन सिंग त्यानं न पाहिलेल्या प्रत्येक फोटोतील मजकूरावर, ओळखू न आलेल्या चेहऱ्यांवर ‘शहीदांना प्रणाम’ असे लिहितो (Harbhajan Singh Glorifies Terrorist) का?
- हरभजननं स्वत:च्या चुकीसाठी शीख धर्माचा उल्लेख करुन धार्मिक आधारावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याची काय गरज आहे?
- हरभजन टीम इंडियामध्ये सौरव गांगुलीचा शिष्य म्हणून ओळखला जात असे. पण मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर धार्मिक कार्ड खेळणाऱ्या अझहरुद्दीनचाही तो शिष्य आहे. हे त्याला या पोस्टमधून सांगयचे आहे का?
- स्वत:वरील टिका म्हणजे शीख धर्मावरील टीका असे भासवण्याचा प्रयत्न करणारा हरभजन पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीला उभं राहण्याची तयारी करत आहे का?
- हरभजननं 20 वर्ष देशाकडून खेळल्याचे सांगत पोस्ट शेवटी लोकांना पुन्हा भावनिक करावे असे हरभजनला का वाटले?
शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली, काश्मीरला स्वतंत्र करण्याची केली भाषा!
पहिली चूक नाही
हरभजन सिंगची या प्रकारची ही पहिली चूक नाही. जम्मू काश्मीर आणि भारतीय सैन्यावर नियमितपणे विखारी टिका करणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद अफ्रिदी (Shahid Afridi) याच्या फाऊंडेशनसाठी त्याने पैसे देण्याचे आवाहन (Harbhajan Singh Glorifies Terrorist) केले होते. त्यानंतर काही दिवसांनी आफ्रिदीने त्याच्या सवयीप्रमाणे भारताबद्दल गरळ ओकली. त्यावेळी देखील हरभजनने याच प्रकारचे स्पष्टीकरण दिले होते.
हरभजनच्या या पोस्टमध्ये इतके टर्न आहेत की त्यापुढे त्याची किंवा जगातील अन्य कोणत्याही महान स्पिनरची बॉलिंग सरळ वाटेल. यापेक्षा माझे अकाऊंट हॅक झाले होते, असे स्पष्टीकरण जरी हरभजननं दिले असते तरी त्यावर 0.0001 टक्के विश्वास ठेवला असता.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.