फोटो – व्हायरल

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं मेडल मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिला भारतीयांचं अपेक्षांचं ओझं पेलण्यासाठी सरकारी प्रयत्नांची देखील मदत झाली आहे. कोरोना काळात भारत-अमेरिका विमानसेवा बंद व्हायच्या आगोदर क्रीडा मंत्रालयानं केलेल्या धावपळीमुळे चानू अमेरिकेला जाऊ शकली. चानू अमेरिकेला गेली आणि दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं भारतामधील विमानसेवा बंद केली. अमेरिकेत चानू वेळेत पोहचली नसती तर ती कदाचित टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपुऱ्या तयारीनं उतरली असती. त्याचा परिणाम निकालावरही दिसण्याची दाट शक्ती होती. देशातील ऑलिम्पिकपटूंचा आधार असलेली Target Olympic Podium Scheme (TOPS) या व्यवस्थेचा फायदा चानूला झाला. देशातील ऑलिम्पिकपटूंचा आधार असलेली ही पद्धत स्वातंत्र्यदिनी समजून घेणे आवश्यक आहे.  

ऑलिम्पिकपटूंचा आधार

कोणत्याही खेळाडूला त्याचं व्यावसायिक करिअर घडवण्यासाठी निधी आणि स्पॉन्सर गरज असते. भारतामध्ये क्रिकेट सोडून अन्य खेळातील खेळाडूंना तर यापूर्वी या मदतीसाठी NGO च्या कृपेवर अवंलबून राहावे लागत होते. भारतीय ऑलिम्पिकपटूंची ही गरज ओळखून सप्टेंबर 2014 मध्ये केंद्र सरकारनं TOPS ही योजना सुरू केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्सममध्ये ज्या खेळात भारताला मेडल मिळाले आहेत. त्या खेळातील खेळाडूंना ऑलिम्पिक मेडल जिंकण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिम्पिक तसेच 2024 मधील पॅरीस ऑलिम्पिक आणि 2028 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक या ऑलिम्पिकमध्ये भारताची मेडल संख्या वाढावी असा या योजनेचा हेतू होता.

मणिपूर ते जपान, 135 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं उचलणाऱ्या मीराबाईची गोष्ट

TOPS मधील खेळ आणि सूविधा

TOPS योजनेत काही प्राधान्यक्रमाचे खेळ (High Priority) निश्चित करण्यात आले आहेत. ते खेळ म्हणजे 1) अ‍ॅथलेटिक्स 2) बॅडमिंटन 3) हॉकी 4) शूटिंग 5) टेनिस 6)वेटलिफ्टिंग 7) कुस्ती 8) तिरंदाजी आणि 9) बॉक्सिंग या खेळांचा समावेश आहे.

या योजनेत ज्या खेळाडूंचा समावेश झाला आहे, अशा खेळाडूंना

  1. जागतिक दर्जाच्या क्रीडा संस्था तसेच कोच यांच्याकडून प्रशिक्षित करणे
  2. त्यांच्यासाठी खेळाचे साहित्य खरेदी करणे
  3. त्यांना सपोर्ट स्टाफ देणे (उदा. फिजिकल ट्रेनर, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ)
  4. खेळाडूंना दरमहा 50 हजार रुपये मानधन
  5. खेळासंबंधी अन्य सुविधांसाठी मदत करणे  या गोष्टींचा समावेश आहे.

Tokyo Olympics 2020: या सम हाच! ‘तो’ सोन्याचा दिवस आला

कोणत्या खेळाडूंना मेडल

TOPS योजना सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम रिओमध्ये 2016 साली ऑलिम्पिक स्पर्धा झाली. त्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणाऱ्या पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik)  यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. तसेच 2016 साली झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2 गोल्ड, 1 सिल्व्हर आणि 1 ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱे खेळाडू देखील या योजनेचा भाग होते.

आशियाई आणि कॉमनेल्थ स्पर्धेत देखील मेडल जिंकणारे बहुतेत खेळाडू हे या योजनेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिमध्ये भारतानं आजवर ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली याचे श्रेय देखील TOPS ला आहे.

Tokyo Olympics 2020 Explained: हॉकीतील ऑलिम्पिक मेडल नव्या युगाची सुरुवात का आहे?

क्रीडा महासत्तेचा पाया

टोकियो ऑलिम्पिकपूर्वी बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांनी या योजनेबाबत काय मत व्यक्त केलंय ते ऐकलं तरी TOPS चं महत्त्व समजेल.

कोणताही देश महासत्ता होण्याचे जे निकष आहेत त्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये दबदबा निर्माण करणे हे आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये महासत्ता बनवण्यासाठी 2014 साली योजना तयार करण्यात आली आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये भारत टॉप 10 देशांच्या यादीत भारत असावा हे सरकारचे ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी TOPS ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला फळ येण्याची लक्षणं टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसली आहेत. भारत भविष्यात क्रीडा महसत्ता बनला तर त्याचा पाया रचणारी योजना म्हणून TOPS ची भविष्यात नोंद होईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: