
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यात कराचीमध्ये (Karachi) पहिली टेस्ट सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम (South Africa) 2007 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच खेळत आहे. या टेस्टमध्ये आफ्रिकेच्या कागिसो रबाडा (Kagiso Rabada) या 25 वर्षांच्या फास्ट बॉलरनं टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 200 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा रबाडा हा 78 वा बॉलर आहे.
‘पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण’
‘पाकिस्तान ही फास्ट बॉलर्सची (Pakistan Fast Bowlers) खाण आहे.’ हे वाक्य आपण नेहमी ऐकलं आहे.. आज वयाची तिशी ओलांडलेल्या पिढीनं इम्रान खानचा (Imran Khan) खेळ पाहिलेला नाही. पण इम्रान सोबत रिव्हर्स स्विंग करणाऱ्या फास्ट बॉलर्सबद्दल आधीच्या पिढीकडून नेहमी ऐकलं आहे. अनेक माध्यमांमध्येही पाकिस्तानच्या फास्ट बॉलिंगला सतत ग्लॅमर देण्याचा प्रयत्न केला जातो.
वासिम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनूस (Waqar Younis) हे इम्रानच्या नंतरचे फास्ट बॉलर्स. या दोघांनीही क्रिकेटच्या सर्व प्रकारात भरपूर विकेट्स घेतल्या. त्यानंतर विसावं शतक संपण्याच्या काळात शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) उदय झाला. जोरात बॉल टाकणाऱ्या अख्तरच्या वेगाचीच चर्चा नेहमी झाली. अख्तरच्या काळात मोहम्मद आसिफ, उमर गुल हे फास्ट बॉलर पाकिस्तानच्या टीममध्ये होते.
( वाचा : अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा! )
फास्ट बॉलर्सच्या परंपरेचा पाकिस्तानच्या सामान्य लोकांनाच नाही तर क्रिकेटपटूंनाही मोठा गर्व आहे. त्यामुळेच भारतीय टीमच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ‘इरफान पठाण सारखे बॉलर्स आमच्या गल्लीबोळात आढळतात’ असं वक्तव्य पाकिस्तानचे तेंव्हाचे कोच आणि भारताचा मोस्ट वॉटेंड दहशतवादी दाऊद इब्राहिमचे व्याही जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांनी केलं होतं.
आकडे काय सांगतात?
कागिसो रबाडानं पाकिस्तान विरुद्ध कराचीमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये 200 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. ‘पाकिस्तानच्या तर गल्ली बोळात इराफान पठाण सारखे बॉलर्स खेळतात म्हणे….’ फास्ट बॉलर्सच्या या प्रमाणीकृत (?) खाणीतून तावून सुलाखून निघालेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलेल्या पोहचलेल्या ढीगभर फास्ट बॉलर्सनी (Pakistan Fast Bowlers) 200 टेस्ट विकेट्स पूर्ण केल्या असतील अशी आमची समजूत होती. ‘Cricket मराठी’ नं याबाबत सहज रेकॉर्डबुक पाहिले तर काही भारी आकेडवारी समोर आली आहे.
इम्रान खानच्या युगाचा दाखला नेहमी दिला जातो. त्या युगात एकटा इम्रान खान (362 विकेट्स) हा 200 पेक्षा जास्त विकेट घेणारा पाकिस्तानी फास्ट बॉलर आहे. त्यानंतर अक्रम-वकारच्या युगाची साक्ष काढून ते किती भारी युग होतं हे ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या युगात वासिम अक्रम (414 विकेट्स) आणि वकार युनूस (373) विकेट्स हे दोनच 200 पेक्षा जास्त फास्ट विकेट्स घेणारे बॉलर आहेत.
आजपासून 26 वर्षांपूर्वी म्हणजे कागिसो रबाडा जन्मला त्यावर्षी आधी वकार युनूसनं टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर एकाही पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सला टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेता आलेल्या नाहीत.
26 वर्षांत कोण खेळलं?
पाकिस्तानचा गेल्या 26 वर्षातील शोएब अख्तर हा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर आहे. त्यानं 178 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर उमर गुल (163), मोहम्मद आमिर (119), मोहम्मद आसिफ (106) आणि अब्दुल रझ्झाक (100) टेस्ट विकेट्स अशी क्रमवारी आहे.
26 वर्षांतील यशस्वी बॉलर्स
बॉलर्स | विकेट्स |
शोएब अख्तर | 178 |
उमर गुल | 163 |
मोहम्मद आमिर | 119 |
मोहम्मद आसिफ | 106 |
अब्दुल रझ्झाक | 100 |
पाकिस्तानात क्रिकेट होत नाही!
पाकिस्तानात गेल्या दशकात फारसं क्रिकेट झालं नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सना (Pakistan Fast Bowlers) घरगुती पिचची मदत मिळाली नाही, हे कारण दिलं जातं. चांगला फास्ट बॉलर कुठंही चमकतो. त्यामुळे हे कारण लंगडं ठरतं. पाकिस्तानमध्ये क्रिकेट न होण्याला त्या देशातील परिस्थिती जबाबदार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या फॅन्सनी नशिबाला नाही तर पाकिस्तानच्या सरकारला आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांच्या देशबांधवांना जबाबदार धरावं
( वाचा : वाढदिवस स्पेशल : कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा! )
आसिफ – आमिर फिक्सिंगमध्ये सापडले!
आपलं अपयश लपवण्यासाठी आमचे दोन ‘बेस्ट बॉलर्स’ फिक्सिंगमध्ये सापडले हे देखील कारण दिलं जातं. आता फिक्सिंगचं पाप करण्यासाठी त्यांना कुणी परवानगी दिली नव्हती. मोह आणि अन्य कारणांमुळे देखील त्यांनी फिक्सिंग केली त्याची शिक्षा त्यांनी भोगली. त्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही.
पाकिस्तानचे फास्ट बॉलर्स दुखापतग्रस्त झाले!
सर्वच देशातील फास्ट बॉलर्स दुखापत ग्रस्त होतात. हा एका सीरिजचा किंवा एका वर्षाचा कालखंड नाही. तर तब्बल 26 वर्षांचा कालखंड आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी एकही फास्ट बॉलर 200 विकेट घेऊ शकत नाही,तरीही पाकिस्तानला ‘फास्ट बॉलर्सची खाण’ म्हणून कौतुक करायचं हे कोणत्याही लॉजिकमध्ये बसत नाही.
‘हे’ आहे खरे कारण!
‘पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्समध्ये (Pakistan Fast Bowlers) धार नाही. 5-6 ओव्हर टाकले की त्यांची दमछाक होते. त्यानंतर त्यांना फिल्डिंगला उभं राहता येत नाही. बॅट्समन्सच्या पुढच्या पायावर बॉल कसा टाकायचा? योग्य टप्प्यावर बॉलिंग कशी करायची? रन न देता स्टंपवर बॉल कसा टाकायचा? हे त्यांना माहिती नाही. ते स्टंपवर बॉल टाकण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्यांचा बॉल भरकटतो.’ हे सर्व आम्ही नाही तर पाकिस्तानचाच माजी फास्ट बॉलर मोहम्मद आसिफनं (Mohammad Asif) काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
( वाचा : शोएब अख्तरचे ‘गझवा-ए-हिंद’ के जहरीले सपने, ‘काश्मीर ताब्यात घेऊ, भारतावर हल्ला करु’ – पाहा VIDEO )
पाकिस्तान क्रिकेटच्या यंत्रणेचा अगदी आतून अनुभव असलेल्या मोहम्मद आसिफचं हे निरीक्षणच गेल्या 26 वर्षांतील पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सना येत असलेल्या अपयशाचं कारण असावं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.