फोटो – फेसबुक/द हंड्रेड

इंग्लंडमध्ये थोड्याच वेळात (21 जुलैपासून) ‘द हंड्रेड’ (The Hundred) ही स्पर्धा सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. या स्पर्धेतील खेळाडूंच्या निवडीचा तिसरा टप्पा वाईल्ड ड्राफ्ट आता पूर्ण झाला आहे.यामध्ये इंग्लंडमधील देशांतर्गत खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेची नियम, वैशिष्ट काय आहेत (The Hundred Explained)  तसेच ही स्पर्धा आयपीएलपेक्षा किती वेगळी आहे हे पाहूया

दोन्ही गटासाठी स्पर्धा

‘द हंड्रेड’ लीग स्पर्धा महिला आणि पुरुष या दोन्ही वर्गासाठी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी आठ टीम आहेत. या स्पर्धेत 5 भारतीय महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. तर भारतीय पुरुष खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाही.

या आठ टीमपैकी टॉप तीन टीम फायनल राऊंडसाठी पात्र होती. यापैकी नंबर दोन आणि नंबर तीनच्या टीममध्ये एलिमेनेटरची लढत होईल. यामधील विजेती टीम नंबर वन टीमशी फायनल खेळेल.

खेळातील मुख्य नियम (The Hundred Explained)

 • या मॅचमधील एका इनिंग 100 बॉलची आहे. त्यामुळे या लीगला ‘द हंड्रेड’ असे नाव देण्यात आले आहे.
 • क्रिकेटमध्ये साधारण 6 बॉलची ओव्हर असते. ती ओव्हर झाल्यानंतर साईड बदलली जाते. द हंड्रेडमध्ये 10 बॉलनंतर साईड बदलली जाईल
 • सलग 10 बॉल एकच बॉलर टाकेल की 5-5 बॉल दोन बॉलर्स टाकतील याचा निर्णय फिल्डिंग करणारी टीम घेईल
 • एक बॉलर मॅचमध्ये जास्तीत जास्त 20 बॉल टाकू शकतो
 • इनिंगच्या सुरुवातीची 25 बॉल ‘पॉवर प्ले’ असेल. त्यामध्ये फक्त 2 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर फिल्डिंग करू शकतील.
 • प्रत्येक इनिंगमध्ये 2.5 मिनिटे टाईम आऊट असेल. एक मॅच 2 तास 30 मिनिटांमध्ये संपेल
 • महिला आणि पुरुषांच्या 8-8 टीम या स्पर्धेत खेळणार असून प्रत्येक टीममध्ये 15 खेळाडू असतील. यामध्ये विदेशी खेळाडूंची कमाल मर्यादा 3 आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) टेस्टसाठी करार केलेल्या किमान एका खेळाडूचा प्रत्येक टीममध्ये समावेश (The Hundred Explained) आवश्यक आहे.

…तर लवकरच इंग्लंड टीममध्ये दक्षिण आफ्रिकेतून मोठी भरती करावी लागेल!

ड्राफ्ट पद्धतीनं निवड

या स्पर्धेतील पुरुष खेळाडूंची निवड ड्राफ्ट पद्धतीनं झाली आहे. यामधील पहिल्या टप्प्यात इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश होता. ECB ने करार केलेल्या खेळाडूंना ड्रॉ पद्धतीने निवडण्यात आले. ECB कडून त्यांना देण्यात येणाऱ्या पगारामध्येच या कराराचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना फ्रँचायझीकडून कोणतीही वेगळी रक्कम मिळणार नाही.

 इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना फक्त मॅच फिस देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या कालावधीमध्ये इंग्लंडची टीम कोणतीही वन-डे किंवा T20 क्रिकेट खेळणार नाही. त त्यामुळे ECB कडून लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना कोणतीही वेगळी मॅच फिस दिली जाणार नाही. बोर्डानं करार केलेल्या रकमेतच त्यांना ही स्पर्धा खेळावी लागेल.

विदेशी खेळाडूंचा ड्राफ्ट

या स्पर्धेतील खेळाडूंच्या निवडीचा दुसरा टप्पा हा विदेशी खेळाडूंचा होता. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रकमेचे ड्राफ्ट होते. विदेशी खेळाडूंना त्यांच्या रकमेचा ड्राफ्ट निवडण्याचा अधिकार (The Hundred Explained) होता. 1 लाख पाऊंड (1.02 कोटी रुपये), 80 हजार पाऊंड (82.7 लाख रुपये), 60 हजार पाऊंड (61.70 लाख रुपये), 48 हजार पाऊंड (49.37 लाख रुपये), 40 हजार पाऊंड (41.14 लाख रुपये), 32 हजार पाऊंड (32.91 लाख रुपये) आणि 24 हजार पाऊंड (24.68 लाख रुपये) या ड्राफ्टमध्ये खेळाडूंची बोली लावण्यात आली. याचाच अर्थ एखाद्या खेळाडूने 1 लाख पाऊंडचा ड्राफ्ट निवडला असल्यास त्याला तितकीच रक्कम त्याच्या फ्रँचायझीकडून मिळाणार आहे.

‘आता ते उद्योग बंद करा’, इंग्लंडच्या कॅप्टनची क्रिकेट बोर्डाकडे मागणी

निवडीचा तिसरा टप्पा

इंग्लंडकडून करार न करण्यात आलेल्या स्थानिक खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. या सर्वांना ड्राफ्टमधील सर्वात कमी रक्कम 24 हजार पाऊंड मिळणार आहे. ही स्पर्धा 2020 मध्ये सुरु होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे ती एक वर्ष लांबणीवर पडली. मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक गटातील रक्कम 20 टक्के कमी करण्यात आली आहे.

महिला खेळाडूंना किती रक्कम?

पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना मिळणारी रक्कम ही कमी आहे. महिला खेळाडूंसाठी 15, 12, 9, 7.2, 6, 4.8 आणि 3.6 हजार पाऊंड प्राईस बँडच्या गटातील रक्कम मिळणार आहे. सर्व फ्रँचायझींनी महिला खेळाडूंशी थेट संपर्क साधून त्यांना करारबद्ध (The Hundred Explained)  केलं आहे.

कोणत्या भारतीय महिला खेळाडूंचा समावेश?

भारतीय खेळाडूटीम
शफाली वर्माबर्मिंगहॅम फिनिक्स
हरमनप्रीत कौरमँचेस्टर ओरिजनल्स
दीप्ती शर्मालंडन स्पिरिट
जेमिमा रॉड्रिगेजनॉर्दन सुपरचार्जर्स
स्मृती मंधानासाऊदर्न ब्रेव्ह

द हंड्रेड टीमची नावं, होम ग्राऊंड आणि विदेशी खेळाडू

टीमहोम ग्राऊंडविदेशी खेळाडू
बर्मिंगहॅम फिनिक्सएजबस्टनफिन एलन, एडम मिल्ने, इम्रान ताहीर
लंडन स्पिरिटलॉर्डसमोहम्मद नाबी, जोश इंग्लिस, मोहम्मद आमिर
मँचेस्टर ओरिजनल्सओल्ड ट्रॅफर्डकॉलिन मुन्रो, कार्लोस ब्रेथवेट, लॉकी फर्ग्युसन
नॉर्दन सुपरचार्जर्सहेडिंग्लेफाफ ड्यू प्लेसिस, ख्रिस लीन, मुजीब उर रहेमान
ओव्हल इन्विसिबलओव्हलकॉलीन इंग्राम, सुनील नरीन, संदीप लामिछाने
साऊदर्न ब्रेव्ह द एजिस बाऊलडेव्हन कॉनवे, आंद्रे रसेल, क्विंटन डी कॉक
ट्रेंट रॉकेट्सट्रेंट ब्रिजडर्सी शॉट, वहाब रियाझ, राशिद खान
वेल्स फायरसोफिया गार्डेन्सजेम्स निशम, कायरन पोलार्ड, ग्लेन फिलिप्स

The Hundred vs IPL

 • दोन्ही स्पर्धेत पुरुषांच्या आठ टीमचा समावेश
 • आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलावाने होते. आयपीएल टीम खेळाडूंच्या पगारावर एका सिझनमध्ये साधारण 85 कोटी खर्च करतात. द हंड्रेडमध्ये खेळाडूंची निवड ड़्राफ्ट पद्धतीनं झाली आहे. पुरुषांच्या एका टीमवरील पगाराचा खर्च साधारण 10.27 कोटी आहे.
 • आयपीएलमधील सर्वात महागड्या विराट कोहलीला एका सिझनमध्ये 17 कोटी मिळतात. द हंड्रेडमधील एका खेळाडूला जास्तीत जास्त मिळणारी रक्कम 1.02 कोटी आहे.
 • IPL मधील एका सिझनमध्ये 60 मॅच होतात. द हंड्रेडमधील एका सिझनमध्ये 32 मॅच होणार आहेत.
 • आयपीएलमध्ये एक इनिंग 20 ओव्हर्सची असते. द हंड्रेडमध्ये एक इनिंग 100 बॉलची (The Hundred Explained) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: