फोटो – ट्विटर/ICC

भारताचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या 4 T20 मॅचमध्ये राहुलचा स्कोअर हा 0,1,0, 0 असा आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये त्याने 3 मॅचमध्ये फक्त 1 रन काढला आहे. तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर राहुलच्या टीकाकारांमध्ये अचानक वाढ झाली आहे. टीम मॅनेजमेंटचा राहुलला असलेला पाठिंबा काहींना पक्षपात वाटत आहे. भारतीय टीम मॅनेजमेंट अजब निर्णयासांठी प्रसिद्ध असली तरी त्यांचा राहुलला पाठिंबा देणे योग्य आहे. भारताच्या T20 टीममध्ये केएल राहुलची आवश्यकता (Team India needs Rahul) आहे.

T20 चा अव्वल बॅट्समन

राहलच्या या खराब फॉर्मनंतरही तो सध्या आंतरराष्ट्रीय T20 रँकींगमध्ये भारताचा अव्वल बॅट्समन आहे. त्याचे 771 पॉईंट्स असून तो विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) एक नंबर वर चौथ्या क्रमांकावर आहे.

राहुलने त्याच्या आंतरराष्ट्रीय T20 कारकीर्दीमध्ये (17 मार्च 2021 ची आकडेवारी) 48 मॅचमध्ये 40.60 च्या सरासरीने आणि 143.13 च्या स्ट्राईक रेटनं 1543 रन केले आहेत. यामध्ये 12 हाफ सेंच्युरी आणि 2 सेंच्युरींचा समावेश आहे. सध्याच्या भारतीय टीममध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा अपवाद वगळला तर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी करणारा राहुल हा एकमेव बॅट्समन आहे. त्याने ही कामगिरी एकदा नाही तर दोनदा केली आहे.

यापूर्वीचे सातत्य

राहुलने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्यातही T20 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. चार मॅचच्या अपयशाचा गजर करताना त्याच्या यापूर्वीच्या लढतीमधला आवाज राहुलचे टीकाकार विसरत आहेत.

राहुलने या चार मॅचपूर्वीच्या 13 मॅचमध्ये 30, 51, 45, 39, 27, 57*, 56, 54, 45, 91, 11, 62 आणि  52 अशी कामगिरी T20 मध्ये केली आहे. त्याचे यामधील बहुतेक रन हे ओपनर म्हणून आणि रोहित किंवा शिखर पैकी एकाच्या अनुपस्थितीमध्ये आले आहेत. याचाच अर्थ टीमला गरज असताना ओपनर म्हणून चांगला खेळ करण्याची क्षमता (Team India needs Rahul) राहुलमध्ये आहे.

( वाचा : IND vs ENG : विराटची डोकेदुखी वाढली, घ्यावा लागणार कठोर निर्णय )

ओपनिंगला हवा का?

रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघंही उजव्या हाताने बॅटींग करणारे आणि एकाच पद्धतीने खेळ करणारे बॅट्समन आहे. सुरुवातीला हळू खेळणारे हे दोघे एकदा सेट झाले की मैदानात रनचा महापूर वाहू लागतो. त्यामुळे इशान किशन हा आक्रमक आणि विशेष म्हणजे डाव्या हाताने खेळणारा बॅट्समनचा पर्याय उपलब्ध असताना ‘राहुलनं रोहितसोबत ओपनिंग करावी का हा?’ हा एक प्रश्न आहे.

या प्रश्नावर भारतीय टीम मॅनेजमेंट नक्कीच विचार करत असेल. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित सीरिजमध्ये यावरील एखादा प्रयोग देखील आपल्याला पाहयला मिळू शकतो. राहुलला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचा पर्याय देखील टीम मॅनेजमेंट समोर आहे. पाचव्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर आणि नवोदीत सुर्यकुमार यादव याच्यापेक्षा राहुलकडे अनुभव जास्त आहे त्याचा टीमला (Team India needs Rahul) उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर तो पाचव्या क्रमांकावर आक्रमक बॅटींग करु शकतो हे त्याने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये देखील दाखवून दिलं आहे.

( वाचा : IND vs ENG : किशनची कमाल, कोहलीचा हल्ला! भारताने घेतला इंग्लंडचा बदला )

राहुलला वेळ द्या!

केएल राहुल ऑस्ट्रेलियाची टेस्ट सीरिज आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये बेंचवर बसून होता. या दरम्यानच्या काळात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी देखील त्याला मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला दुखापतही झाली होती. कोरोना काळातील बायो बबल, खेळाडूंवरील निर्बंध याचा परिणाम राहुलच्या मनस्थितीवर, खेळावर होऊ शकतो. तो माणूस आहे. रोबोट नाही, याचं भान आपण राखलं पाहिजे.

टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी राहुल गेल्या वर्षभरातील आपला बेस्ट T20 बॅट्समन असून खराब पॅच कोणत्याही खेळाडूला सहन करावा लागतो, असे मत व्यक्त केले आहे. तर कॅप्टन विराट कोहलीनं राहुलला फॉर्ममध्ये येण्यासाठी चांगले सहा ते आठ बॉल हवे आहेत, असं सांगत राहुलची पाठराखण केली आहे. बॅटिंग कोच आणि कॅप्टन या दोघांनाही केएल राहुलची भारतीय टीमला किती गरज आहे (Team India needs Rahul) याची नक्की जाणीव आहे. त्यामुळेच खराब फॉर्ममध्ये असूनही टीम मॅनेजमेंट राहुलच्या पाठीशी उभी आहे. भारतीय फॅन्सनी देखील या सर्व गोष्टींचा विचार करुन राहुलला वेळ द्यायला हवा.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: