फोटो – ट्विटर / ICC

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) हे एक क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. पॉन्टिंगच्या कॅप्टनसीखालीच ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 हे दोन क्रिकेट वर्ल्ड कप जिंकले. या शतकाच्या पहिल्या दशकात ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेट विश्वात प्रचंड दरारा होता. हेडन, गिलख्रिस्ट, लँगर, शेन वॉर्न, मॅग्रा यासारख्या अनेक दिग्गजांचा त्या टीममध्ये समावेश होता. स्वत: पॉन्टिंगने नेहमीच आघाडीवर राहून या टीमचं नेतृत्व केले. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 सेंच्युरी आहेत.

पॉन्टिंगला वाटत होती भीती

संपूर्ण क्रिकेट जग जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन असलेल्या रिकी पॉन्टिंगला एका भारतीय बॉलरची भीती वाटत होती. ही भीती इतकी वाढली की त्याचा एकेकाळी स्वत:च्या तंत्रावरचा विश्वास उडाला होता. स्वत: पॉन्टिंगनेच ‘DRS With ASH’ या भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनच्या (R. Ashwin) युट्यूब कार्यक्रमात याची कबुली दिली आहे.

( वाचा : जस्टीन लँगरचा जीव वाचवण्यासाठी पॉन्टिंग इनिंग घोषित करणार होता! )

रवीचंद्रन अश्विननं या कार्यक्रमात ऑफस्पिनर्सचा सामना करताना कसा अनुभव आला हा प्रश्न विचारला. त्यावेळी पॉन्टिंगनं भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगचा (Harbhjan Singh) सामना करताना वाटणारा भीतीदायक अनुभव सांगितला.

काय म्हणाला पॉन्टिंग?

‘हरभजन सिंग आणि माझं द्वंद्व अनेकदा चांगलं रंगलं. हरभजन यामध्ये अनेकदा माझ्यापेक्षा सरस ठरला. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त कोणत्याही बॉलरनं मला आऊट केलं नाही, असं मला वाटतं. एक बॅट्समन म्हणून ऑस्ट्रेलियन पिचवर स्पिनर्स विरुद्ध खेळताना मला फार भीती वाटली नाही. भारतामध्ये गेल्यानंतर मात्र परिस्थिती एकदम बदलत असे’, असे पॉन्टिंगने सांगितले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या 2001 च्या सीरिजमध्ये हरभजननं आपल्याला पाच वेळा आऊट केलं होतं. तो खूप कमी बॉलमध्ये मला आऊट करत असे,  अशी आठवणही पॉन्टिंगने सांगितली.

( वाचा : सिडनीत कोरोनाचं थैमान, आपला रोहित शर्मा सुरक्षित आहे का? )

‘बॅटिंग तंत्रावरचा विश्वास उडाला होता’

चेन्नईमधील एका टेस्टमध्ये हरभजनशी सामना करतानाचा एक अनुभवही पॉन्टिंगनं शेअर केला आहे. ‘मी त्या दौऱ्यात चांगला स्कोअर केला होता. चेन्नईमध्ये सीरिजची शेवटची टेस्ट होती. त्या टेस्टमध्येही चांगला खेळ करेल असा मला विश्वास होता. मी पुढं येऊन बॉल मारण्याचा प्रयत्न केला आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला माझा कॅच उडाला होता. मी खेळताना काहीही चूक केली नव्हती. तरीही आऊट झालो होतो. त्यावेळी माझा स्वत:च्या बॅटिंग तंत्रावरचा विश्वास उडाला आणि मी नव्या पद्धतीनं खेळण्याचा विचार करु लागलो,’ असा अनुभव पॉन्टिंगनं सांगितला आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: