
मोठ्या तयारीसह प्रचंड अपेक्षा घेऊन भारतामध्ये आलेल्या जो रुटच्या (Joe Root) टीमनं 1-3 ने टेस्ट सीरिज गमावली. या पराभवामुळे इंग्लंडला त्यांच्याच देशात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही. ‘हे असं का झालं?’ यावर इंग्लंडमध्ये चर्चा सुरु झाली आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने या विषयावर देशाच्या राष्ट्रीय निवड समितीवर (England Selection Committee) आरोप केले आहेत.
‘निवड समितीच्या धोरणांचा परिणाम’
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) वाढत्या क्रिकेटमुळे खेळाडूंना आराम मिळावा म्हणून रोटेशन पॉलिसी सुरु केली आहे. या रोटेशन पॉलिसीअंतर्गत टेस्ट टीमचा कॅप्टन जो रुटला टीम निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे, अशी मागणी त्याने केली आहे. इंग्लंडचा वन-डे आणि T20 टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गन (Eoin Morgan) याला ते स्वातंत्र्य आहे असा दावा वॉनने केला आहे.
वॉननं ‘टेलीग्राफ’ मधील त्याच्या कॉलमध्ये लिहलं आहे की,’इंग्लंडनं भारताविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये कमकुवत टीम उतरवली. जोस बटलर आणि मोईन अली सारखे खेळाडू सीरिज अर्धवट सोडून मायदेशी परतले आता ते मर्यादीत ओव्हर्सच्या सीरिजसाठी टीमसोबत असतील.’
वॉन पुढे लिहितो, ‘इंग्लंड क्रिकेटचं नेतृत्व करणारी शक्ती कुणाकडं आहे हे स्पष्ट आहे. ते इऑन मॉर्गनकडं आहे. रुटकडं नाही. मला नक्की खात्री आहे की, मॉर्गन निवड समिती (England Selection Committee) आणि एश्ले जाईल्सकडे गेला आणि त्याने यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कप साठी सर्वश्रेष्ठ टीमची इच्छा व्यक्त केली. त्याची ही इच्छा पूर्ण झाली,’ असे वॉनने लिहिले आहे.
( वाचा : इंग्लंडला सपशेल लोळवणाऱ्या मोठ्या विजयासह टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! )
रोटेशनला विरोध नाही पण..
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या रोटेशन नियमाला आपला विरोध नसल्याचं वॉननं स्पष्ट केले आहे. ‘मला रोटेशन धोरणाची कल्पना आहे. खेळाडूंना बायो-बबलपासून ब्रेकची आवश्यकता आहे, याला कुणाचाही विरोध नाही. मात्र टेस्ट क्रिकेटचा प्रशंसक म्हणून मी निराश झालो आहे. आमच्या टेस्ट टीमला कमकुवत करण्यात आले आहे.
त्याचवेळी T20 ची मजबूत टीम उतरवण्यात आली आहे. तुम्ही एक कॅप्टन म्हणून वर्ल्ड कप जिंकता तेंव्हा तुम्हाला सुरक्षितता मिळते. हे मी अॅशेस सीरिज जिंकल्यानंतर ते अनुभवलं आहे. ईडी स्मिथ मॉर्गनला नकार देऊ शकतो असं तुम्हाला वाटते का? अजिबात नाही.’ या शब्दात वॉननं निवड समितीवर (England Selection Committee) नाराजी व्यक्त केली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.