
मुंगेरीलाल के हसीन सपने (Mungerilal Ke Haseen Sapne) ही हिंदी मालिका 1980 च्या दशकात प्रसिद्ध होती. त्या मालिकेतला हिरो मुंगेरीलालला कोणत्याही क्षणी स्वप्न पडत. एखादी गोष्टी जी कधीही होणे शक्य नाही तीच गोष्ट त्याला स्वप्नात दिसत असे. त्यामुळे त्यानंतर अशा प्रकारे ‘दिवास्वप्न’ रंगवणाऱ्या व्यक्तींच्या स्वप्नांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असं संबोधण्याची पद्धत रुढ झाली.
पाकिस्तानचा (Pakistan) फास्ट बॉलर शोएब अख्तरचंही (Shoaib Akhtar) एक स्वप्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. पाकिस्तानी खेळाडूच्या या स्वप्नात भारत आहे. पुस्तकांमध्ये कितीही छान-छान वाक्य वाचलेली असली तर पाकिस्तानच्या बहुतेक नागरिकांच्या भारताबद्दल काय भावना आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळे अख्तरचं हे स्वप्न मुंगेरीलाल सारखं हसीन नाही. तर जहरीले आहे. त्यामुळे या स्वप्नाला आपण ‘शोएब अख्तर के जहरीले सपने’ असंच म्हंटलं पाहिजे.
( वाचा : अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा! )
काय आहे शोएबचं स्वप्न?
शोएब अख्तरनं समा टीव्ही या पाकिस्तानी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधला हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओत शोएब भारताविरुद्ध ‘गझवा-ए-हिंद’ च्या गोष्टी करत आहे. अख्तर या व्हिडीओत म्हणतो, “ आमच्या पवित्र पुस्तकामध्ये लिहलं आहे, एक दिवस गझवा-ए-हिंद (Ghazwa-e-Hind) होईल. अटक नदी रक्तानं दोनदा लाल होईल आणि अफगाणिस्तानतून सैन्य अटकेपर्यंत पोहचेल. शमल मशरिक उठल्यानंतर उझबेकिस्तानमधूनही काही तुकड्या तिथं दाखल होतील. हे सर्व खोरासन ऐतिहासिक क्षेत्र आहे. जे लाहोरपर्यंत पसरलेलं आहे.’’
अख्यतरचा इंटवह्यू घेणारी महिला देखील पाकिस्तानीच आहे. त्यामुळे हा सर्व इतिहास लोकांनी वाचायला हवा, असं तिला वाटतं. त्यावर लगेच अख्तरच्या मनातला भारत जागा होतो. अख्तर पुढे म्हणतो, “ तिथून पुढे शमल मशरिक निघेल. त्यानंतर आपण काश्मीर जिंकून घेऊ आणि इंशाअल्लाह पुढे जाऊ ( म्हणजेच भारतावर हल्ला करु)’’
गझवा-ए-हिंद काय आहे?
अख्तरच्या या व्हिडीओमध्ये शमाल मशरिक आणि ‘गझवा-ए-हिंद’ हे दोन शब्द आहे. यापैकी शमाल मशरिक ही अरबस्तानातील एक जागा आहे. ‘गझवा-ए-हिंद’ चा अर्थ भारताविरुद्ध पवित्र युद्ध असा होतो. ‘मुर्तीपूजा करणाऱ्या भारतामधील व्यक्तींची (हिंदूंची) कत्तल करणे, आणि भारतासह संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापन करणे’ हा कट्टर इस्लामी दहदशतवादी अजेंडा म्हणजे गझवा-ए-हिंद.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना याच शब्दाचा आधार घेत तेथील तरुणांना भारताविरुद्ध तयार करतात. याच गझवा-ए-हिंद शब्दाचं स्वप्न पाहत असलेले जगभरातील धनाढ्य त्यांची तिजोऱ्या दहशतवादी संघटनांसाठी मोकळ्या करतात. भारताविरोधी दहशतवादी हल्ले करणारी आणि आजवरच्या प्रत्येक युद्धात दणदणीत मार खाल्ल्यानंतरही न जिरलेली पाकिस्तानी मानसिकता म्हणजे गझवा-ए-हिंद आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणून ज्याला संपूर्ण ओळखतं त्या शोएब अख्तरचा खरा चेहरा हा दहशतवादचाच आहे, हे या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे.
( वाचा : भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा व्हिडीओ )
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शोएबवर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी ‘शोएबची बॉलिंग किती भारी, शोएबचे केस तर लय भारी, ‘Shoaib Akhtar is so cute’ असे चित्कार काढण्यासाठी निमित्त शोधणारी मंडळी तोंडात मूग गिळून गप्प आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.