फोटो – ट्विटर, क्रिकेट पाकिस्तान

कॅलेंडरचं वर्ष बदललं पण, पाकिस्तान क्रिकेटमधील (Pakistan Cricket) वाद काही संपलेले नाहीत. पाकिस्तानात दरवर्षी नवे वाद सुरू होतात. सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2022) सुरू आहे. या लीगच्या दरम्यान दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये वाद (Former Pakistan Captain Clash) सुरू झाला आहे. क्रिकेटच्या मैदानातील विषयावर सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर वैयक्तिक चिखलफेकीत झाले आहे.

नेमके काय झाले?

पाकिस्तानचा माजी कॅप्टन सर्फराज अहमद (Sarfarz Ahmed) हा पीएसएलमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स (Quatta Gladiators) टीमचा कॅप्टन आहे. या सिझनमधील पहिल्याच मॅचमध्ये सर्फराज चर्चेत आला होता. पेशावर जाल्मी (Peshawar Zalmi) विरूद्धच्या मॅचमध्ये हा प्रसंग घडला.

या मॅचमधील अटीतटीच्या प्रसंगी क्वेटाचा बॉलर नसीर शहाला त्याच्या बॉलिंगवर मनासारखी फिल्डिंग लावण्यासाठी सर्फराजसमोर हात जोडावे लागले होते. नसीमनं हात जोडल्यानंतरही सर्फराजनं त्याचं काही ऐकलं नाही. त्यानंतर पुढे मॅचमध्ये क्वेटाचा पराभव झाला. नसीम आणि सर्फराजमधील हा प्रसंग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मैदानातील याच प्रकरणातून दोन माजी कॅप्टनमध्ये वाद (Former Pakistan Captain Clash) सुरू झाला.

सलमान बटची टोलेबाजी

इंग्लंड विरूद्ध 2010 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या प्रकरणात पाकिस्तान टीमचा तत्कालीन कॅप्टन सलमान बट (Salman Butt) हा दोषी आढळला. त्यावेळी सलमानला शिक्षाही झाली. सलमाननं अन्य पाकिस्तानी क्रिकेटपटूंप्रमाणे YouTube चॅनेल काढलं आहे. त्या चॅनेलवर तो क्रिकेट विश्वातील सर्व घटनांवर त्याचे मत व्यक्त करत असतो.

सलमाननं क्वेटाच्या मॅचमध्ये घडलेल्या प्रकारवर सर्फराजला उद्देशून चांगलीच टोलेबाजी केली. ‘सर्फराज बोलत नाही तर ओरडतो. तो कोणतीही चर्चा न करता त्याचा निर्णय इतरांवर लादतो. तो स्वत:चं खरं करणारा कॅप्टन आहे,’ असे आरोप सलमाननं (Former Pakistan Captain Clash) केले.

सर्फराजचं उत्तर 

सर्फराज अहमदला सलमान बटची ही टीका चांगलीच झोंबली. त्याने सलमानचं नाव न घेता एक ट्विट करत राग काढला. सर्फराजने त्याच्या ट्विटमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. ‘ऑन ड्यूटी देशाला विकणारा फिक्सर जर नैतिकतेवर प्रवचन करत असेल तर अल्लाह हाफिज आहे.’ अशी टीका सर्फराजनं केली.

एक फिक्सर तर दुसरा कंडक्टर

सर्फराजनं हे ट्विट करतान सलमानही गप्प बसला नाही. त्याने पुन्हा एकदा सर्फराजला बस कंडक्टर म्हणत (Former Pakistan Captain Clash) डिवचलं. ‘काही लोकं इथं चुकीच्या दुकानात आले आहेत. त्यांना हवं ते सामान इथं मिळणार नाही. त्यांनी दुसऱ्या दुकानात जावं. दुसरी अनेक दुकानं आहेत जिथं लोकं बस कंडक्टरसारखी इकडे या, इकडे या म्हणून ओरडत आहेत.’ असं उत्तर सलमाननं दिलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट उघडे

सलमान बटचं संपूर्ण करिअर हे स्पॉट फिक्सिंगमुळे संपलं. त्याला बंदीनंतर क्रिकेट विश्वात अद्याप कोणतीही जागा मिळालेली नाही. त्यामुळे तो YouTube च्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. सर्फराजची अवस्था देखील वेगळी नाही.

तीन्ही फॉरमॅटमध्ये मैदानावर जांभई देणारा क्रिकेटपटू

त्याच्या क्वेटा टीमची पीएसएलमधील सुरूवात खराब झाली आहे. ऐकेकाळी पाकिस्तान टीमचा कॅप्टन असलेल्या सर्फराजची प्लेईंग 11 मधील जागा गेली आहे. मोहम्मद रिझवानच्या आगमनानंतर त्याला क्वचित अंतिम 11 मध्ये संधी मिळते. त्यामुळे तो देखील निराश आहे. दोन निराश माजी कॅप्टनमधील या जाहीर वादाने (Former Pakistan Captain Clash)  जगासमोर पाकिस्तानी क्रिकेटचे स्वरूप पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: