फोटो: ट्विटर

पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हे क्रिकेट विश्वातील चर्चीत नाव आहे. आफ्रिदीचे क्रिकेट पदार्पणातील वय, त्याची पहिलं आक्रमक सेंच्युरी, तोडफोड बॅटर अशी जगभरातील ओळख ऑल राऊंडर म्हणून झालेला उदय तसंच मैदानातील आणि मैदानाबाहेरचे वाद यामुळे तो कायम चर्चेत राहिला आहे. शाहिद आफ्रिदीची निवृत्ती हा तर एक संपूर्ण वेगळा विषय आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागील दोन दशकांमध्ये आफ्रिदी इतका चर्चेतील क्रिकेटपटू कुणीही नव्हता. आफ्रिदीच्या पाकिस्तानातीाल लोकप्रियतेची तुलना ही पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याशी अनेकदा करण्यात आली. तो क्रिकेटनंतर राजकारणात येणार याबाबतही यापूर्वी अनेकदा अंदाज व्यक्त करण्यात आले होते. हे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. आफ्रिदी आता राजकीय इनिंग सुरू करणार आहे. आफ्रिदीसोबत त्याचा पाकिस्तान टीममधील सहकारी मोहम्मद हाफिजही (Mohammad Hafeez) राजकारणात प्रवेश (Afridi-Hafeez join politics) केला आहे.

कोणत्या पक्षात प्रवेश?

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान खान सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. नॅशनल अ‍ॅसेब्लीमध्ये बहुमत नसतानाही शेवटच्या बॉलपर्यंत लढण्याचा निर्धार इम्रान यांनी जाहीर केला होता. प्रत्यक्षात इम्रान यांनी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच होऊ दिलीच नाही. नॅशनल अ‍ॅसेब्लीमधील अंपायरच्या (उपसभापती) मदतीनं त्यांनी तो प्रस्ताव चर्चेपूर्वीच फेटाळला. इम्रान यांचे खुर्ची वाचवण्याचे हे प्रयत्न अपुरेच ठरले. त्यांना काही तासांमध्येच सत्ता सोडावी लागली.

शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद हाफिज या दोघांनीही इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पीटीआय या नावानं पाकिस्तानच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या या पक्षाकडून हे दोघंही आगामी निवडणूक लढवणार आहेत. शाहिद आफ्रिदी सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीमधून तर हाफिज पंजाब प्रांतामधील सरगोधा मतदारसंघातून निवडणूक लढवणार (Afridi-Hafeez join politics) आहे.

रिटायरमेंट का किंग कौन?- शाहिद आफ्रिदी!

आफ्रिदीची इच्छा!

आफ्रिदी आणि हफीज या दोन्ही खेळाडूंनी यापर्वी इम्रान खान सरकारला पाठिंबा दिला होता. आफ्रिदीने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्या आशयाचे त्याने ट्विट देखील केले होते. ‘ इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यास देशात अस्थिर वातावरण तयार होईल. याशिवाय निवडून येणाऱ्या कोणत्याही सरकारला त्याचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण करता यावा’ अशी इच्छा आफ्रिदीनं या ट्विटमध्ये केली होती. त्याचबरोबर काश्मीरसह अन्य प्रश्नांवरही आफ्रिदीनं इम्रान खान यांना वेळोवेळी पाठिंबा देत भारतविरोधी गरळ ओकली आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांना पीटीआय सरकारला आणखी एक संधी देण्याचे अवाहन आफ्रिदीनं केलं आहे. 74 वर्षात झालेल्या वाईट अप्रामाणिक गोष्टी बदलायला वेळ लागणार असल्याचा दावा त्यानं (Afridi-Hafeez join politics) केला आहे.

हफीजही मैदानात

पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि ऑल राऊंडर मोहम्मद हाफिजनंही इम्रान खान सरकारला पाठिंबा दिला आहे. ‘पाकिस्तानच्या सर्व नेत्यांना मी सांगू इच्छितो की पाकिस्तान हे एक वैभवशाली राष्ट्र आहे, आणि पाकिस्तानच्या प्रतिमेशी तडजोड करता कामा नये. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोबत माझे मतभेद आहेत, परंतू पाकिस्तानच्या अखंडतेसाठी आणि एकजूटतेसाठी मी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहीन.’ असं ट्विट हाफिजनं केलं होतं. त्याचबरोबर अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या इम्रान खान यांच्या निर्णयालाही हाफिजनं पाठिंबा दिला होता.

पाकिस्तानमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर इम्रान सरकार बडतर्फ झाले असून 90 दिवसांमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीनंतर पाकिस्तानच्या क्रिकेटमधील आणखी दोन चेहरे देश चालवणाऱ्या नॅशनल अ‍ॅसेब्लीमध्ये (Afridi-Hafeez join politics) दिसू शकतात.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: