फोटो – ICC

पाकिस्तानमधून अमेरिकेत स्थायिक झालेला क्रिकेटपटू समी अस्लम (Sami Aslam) याने खळबळजनक दावा केला आहे. ‘भारताचे अनेक क्रिकेटपटू अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्यास तयार आहेत, असा त्याचा दावा आहे. अंडर 19 वर्ल्ड कप विजेता भारतीय कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याच्यासह (Sami Aslam on Unmukt Chand)  अनेक खेळाडू भारत सोडून अमेरिकेत खेळण्याच्या तयारीत आहेत, असा दावा एका पाकिस्तानी वेबसाईटशी बोलताना अस्लमनं केला आहे.

अस्लम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी स्थायिक झाला आहे. अमेरिकेच्या नियमानुसार तो  नोव्हेंबर 2023 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्यास पात्र होईल. त्यानं भारत आणि पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून यामध्ये सर्वात मोठं नाव हे उन्मुक्त चंद याचं आहे.

उन्मुक्त चंद हा 2012 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या अंडर 19 टीमचा कॅप्टन आहे. दिल्ली आणि उत्तराखंड टीमकडून तो देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तसंच तो दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमचा सदस्य देखील होता. गेल्या काही वर्षांपासून त्याचा फॉर्म हरपला आहे.

अस्लम यानं यावेळी सांगितलं की, “अलिकडच्या काळात 30 ते 40 विदेशी क्रिकेटपटू अमेरिकेत आले होते. यापैकी काही अंडर 19 भारतीय क्रिकेटपटू होते. उन्मुक्त चंद, (Sami Aslam on Unmukt Chand) , स्मित पटेल, हरमित सिंह या भारतीय क्रिकेटपटूंचा यामध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचेही काही क्रिकेटपटू अमेरिकेत आले होते. येथील सिस्टीम आणि सेट अप खूप चांगला आहे. अमेरिका क्रिकेटमध्ये खूप प्रयत्न करत आहे. इथे कोच आणि ट्रेनर देखील चांगले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबचे (KIXP) माजी बॅटींग कोच अरुण कुमार हे अमेरिकेचे मुख्य कोच आहेत.”

पक्षपाताचा आरोप करत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं सोडला देश, आता अमेरिकेकडून खेळणार

100 पाकिस्तानचे खेळाडू सज्ज!

अस्लमनं त्याचा आधीचा देश पाकिस्तानबद्दलही मोठा दावा केला आहे. “पाकिस्तानच्या ज्या खेळाडूंकडं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाही त्या प्रत्येकाची अमेरिकेत येऊन क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. मला आजवर 100 पाकिस्तानी  क्रिकेटपटूंचे फोन आले आहेत. यापैकी काहींनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ते देखील अमेरिकेत येण्यास तयार आहेत. अमेरिका बोर्ड सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देशातील क्रिकेटपटूंची भरती करत आहे.” असं अस्लमनं सांगितलं.

उन्मुक्त चंदनं फेटाळला दावा

समी अस्लमनं केलेला हा दावा (Sami Aslam on Unmukt Chand)  उन्मुक्त चंदनं फेटाळला आहे. “मी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथं असल्यानं मी काही प्रॅक्टीस सत्रसाठी गेलो होतो. अमेरिकन बोर्डाशी करार करण्याचा माझा कोणताही हेतू नाही.” असं उन्मुक्तनं स्पष्ट केलं आहे. उन्मुक्तची यावर्षी दिल्लीच्या वन-डे टीमसाठी निवड झाली आहे.

अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा!

नियम काय सांगतो?

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) नियमानुसार आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या कोणत्याही भारतीय खेळाडूला विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. त्यांना विदेशी लीगमध्ये खेळायचं असेल तर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून (आयपीएलसह) रिटायर होणं आवश्यक आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: