फोटो – ट्विटर

विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून सतत बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या 4 महिन्यात त्याच्या हातामधून 4 टीमच्या कॅप्टनसी गेल्या. यापैकी 3 त्याने स्वत:हून सोडल्या तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून त्याला हटवण्यात आले. विराट आणि बीसीसीआय यांच्यातील वादाच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यातच दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी न झळकावल्याचाही त्याच्यावर दबाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला ब्रेक घेण्याचा (Shastri on Kohli Break) सल्ला दिला आहे.

काय म्हणाले शास्त्री?

रवी शास्त्रीनं पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीनं ब्रेक घ्यावा असा सल्ला दिला आहे. कोहलीनं शांतपणे बॅटींगवर लक्ष केंद्रीत करावं तो आणखी 5 वर्ष सहज क्रिकेट खेळू शकतो असे मत शास्त्रींनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे.

‘विराटला आता तो 33 वर्षांचा आहे हे माहिती आहे. तो आणखी 5 वर्ष चांगले क्रिकेट खेळू शकतो. पण, त्यानं शांत रहाणे आणि आपल्या बॅटींगवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यानं एकावेळी एकाच मॅचचा विचार करावा. तो कदाचित खेळातून ब्रेक देखील घेऊ शकतो. माझ्या मते त्याने दोन-तीन महिने किंवा एक सीरिज ब्रेक घेतला तर त्याचा चांगला परिणाम होईल.

ब्रेकनंतर विराट तीन ते चार वर्ष किंग कोहलीसारखा खेळू शकतो. तो एकदम स्पष्ट आहे. त्याला त्याचे काम आणि भूमिका माहिती आहे. विराट एक टीम प्लेयर म्हणून खेळतो. एक खेळाडू म्हणून टीमसाठी मोठं योगदान देणारा आणि टीमला जिंकण्यात मदत करण्यात मदत करणारा विराट मला पाहयचा आहे,’ असे शास्त्रींनी यावेळी (Shastri on Kohli Break) सांगितले.  

Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण…

गांगुली-द्रविडलाही टोला

रवी शास्त्री यांनी आजवर विराट कोहलीची नेहमीच पाठराखण केली आहे. शास्त्रींच्या कार्यकाळात विराट तीन्ही टीमचा कॅप्टन होता. विराटवर एकही आयसीसी स्पर्धा टीम इंडियाला जिंकून न देण्याची टीका होत असते, शास्त्री यांनी यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या विषयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनाही टोला लगावला आहे.

‘वर्ल्ड कप मोठ्या खेळाडूंनीही जिंकला नाही. सौरव गांगुलीनं कधीही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. राहुल द्रविडनं जिंकला नाही. अनिल कुंबळेनं जिंकला नाही. व्हीव्हीएस लक्ष्मणनं जिंकला नाही. रोहित शर्मानं जिंकला नाही. याचा अर्थ ते खराब प्लेयर आहेत असा होत नाही.

एक खेळाडू म्हणून तुमचे काम मैदानावर जाणे आणि खेळणे हे आहे. वर्ल्ड कप जिंकलेले कॅप्टन फक्त 2 आहेत. सचिन तेंडुलकरलाही विजेतेपदासाठी 6 वर्ल्ड कप खेळावी लागली आहेत.’ असे सांगत शास्त्रींनी विराटची पाठराखण (Shastri on Kohli Break) केली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: