फोटो – सोशल मीडिया

मॅच फिक्सिंग ही क्रिकेटला लागलेली कीड आहे. ही कीड किती खोलवर रूजली आहे, याची उदाहरणं यापूर्वी देखील समोर आली आहेत. आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या माजी कॅप्टननं केला आहे. झिम्बाब्वेचा माजी कॅप्टन ब्रँडन टेलर याने मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्याची कबुली (Brendon Taylor Match Fixing) दिली आहे. टेलरनं सोशल मीडियावर या विषयावरील सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

झिम्बाब्वेकडून 34 टेस्ट, 205 वन-डे आणि 45 T20 इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेल्या टेलरनं 9 हजारांहून जास्त रन केले आहेत. विकेटकिपर -बॅटर म्हणून कारकिर्द गाजवलेल्या टेलरनं आपल्याला मॅच फिक्सिंगमध्ये कसं अडकवण्यात आले याची संपूर्ण गोष्ट सांगितली आहे.

काय म्हणाला टेलर?

ICC ने तयार केलेले निष्कर्ष लवकरच जाहीर होणार आहेत, त्यापूर्वी मला माझे स्पष्टीकरण द्यायचे आहे, अशी सुरूवात टेलरनं यामध्ये केली आहे. एका भारतीय उद्योजकाने ऑक्टोबर 2019 मध्ये झिम्बाब्वेमध्ये T20 क्रिकेट सुरू करण्याबाबतची चर्चा करण्यासाठी मला भारतामध्ये येण्याचे आणि त्या बदल्यात 15 हजार अमेरिकन डॉलर्स देण्याची ऑफर केली होती. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं सहा महिन्यांपासून पगार दिला नव्हता आणि तो पगार कधी मिळेल हे माहिती नसल्याने आपण ती ऑफर (Brendon Taylor Match Fixing) स्विकारली असे टेलरने सांगितले.

‘भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला रात्रीच्या पार्टीत कोकेन ऑफर करण्यात आले. तसेच मी ते कोकेन घेत असल्याचे फुटेज त्यांनी रेकॉर्ड करून मला त्यांच्यासाठी पैशांच्या बदल्यात मॅच फिक्स करण्याची ऑफर स्विकारण्यास सांगितले. माझ्या रूममध्ये त्यावेळी 6 जण होते. मला माझ्या जीवाची भीती वाटत होती,’ असा दावा टेलरनं त्याच्या विस्तृत स्पष्टीकरणात केला आहे.

सर्वात तरुण कॅप्टनच्या करियरचा गेला राजकारणामुळे बळी!

… त्यांच्या जाळ्यात अडकलो

मी त्यांच्या जाळ्यात अडकलो. माझं आयुष्य कायमचं बदलणारी गोष्ट मी मान्य केली. मला 15 हजार अमेरिकी डॉलर रक्कम देण्यात आली. तसेच काम झाल्यानंतर 20 हजार अमेरिकन डॉलर अतिरिक्त देण्याचे आश्वासन देण्यात आले. मी ती ऑफर स्विकारली (Brendon Taylor Match Fixing) आणि भारतामधून बाहेर पडलो, असा गौप्यस्फोट टेलरनं केला आहे.

‘माझ्या तेव्हा दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांना नाही म्हणणे हा मार्ग माझ्यासाठी बंद होता. मला फक्त तिथून बाहेर पडायचे होते.’ असे टेलरने सांगितले. ही रक्कम घेतल्यानंतरही आपण कधीही मॅच फिक्सिंगच्या घटनेत सहभागी झालो नाहीत. तसेच त्या घटनेनंतर 4 महिन्यांनी याबाबत आयसीसीकडे तक्रार केली, ‘ असे टेलरने स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण घटनेचा माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला, आयसीसीने माझ्यावर काही वर्षांची बंदी घालणार आहे. मी हा निर्णय मान्य करतो. तसेच माझे हे उदाहरण माहिती झाल्यानंतर भविष्यात क्रिकेटपटू लवकर याबाबत तक्रार करतील, अशी आशा करतो,’ असे टेलरने (Brendon Taylor Match Fixing) शेवटी म्हंटले आहे.

झिम्बाब्वेचा दिग्गज क्रिकेटपटू

ब्रँडन टेलरनं 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 2021 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. झिम्बाब्वेकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्याने 205 वन-डे मध्ये 11 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरीसह 6684 रन केले आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: