
क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी 2007 साली सर्वात प्रथम T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) झाला. या वर्ल्ड कपनंतर वर्षभराच्या आत आयपीएल (IPL) स्पर्धेला सुरुवात झाली. क्रिकेटचा हा वेगवान खेळ आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आयपीएल स्पर्धेला मिळालेल्या यशानंतर जवळपास प्रत्येक टेस्ट खेळणाऱ्या देशांनी त्यांची T20 लीग सुरु केली आहे. सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) चार दिग्गज क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टेस्ट आणि वन-डे क्रिकेट तर नियमित खेळले, पण आंतरराष्ट्रीय T20 मॅच फक्त एक खेळली. एकमेव T20 (Only T20I) खेळलेले हे चार क्रिकेटपटू कोण ते पाहूया
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
टीम इंडियाचाच नाही, तर जगातील सर्वात महान क्रिकेटपटू अशी सचिनची ओळख आहे. 200 टेस्ट खेळणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन आणि सर्वात जास्त सेंच्युरी देखील सचिनच्याच नावावर आहेत. पण, सचिन हा फक्त एकच आंतरराष्ट्रीय T20 (Only T20I) खेळला आहे.
सचिन 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही एकमेव मॅच खेळला. त्या मॅचमध्ये त्याने वीरेंद्र सेहवागसोबत ओपनिंगला येत 12 बॉलमध्ये 10 रन काढले. त्याचबरोबर नंतर जस्टीन केम्पला आऊट करुन एक विकेट देखील घेतली. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली होणाऱ्या T20 वर्ल्ड कपपूर्वी तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून सचिननं माघार घेतली. तो वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) तरुण खेळाडूंच्या भोवती टीम उभी केली.
‘सचिनच्या सर्व खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचे टप्पे’
जेसन गिलेस्पी (Jason Gillespie)
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर असलेला जेसन गिलेस्पी देखील एकच आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळला आहे. गिलेस्पीने इंग्लंड विरुद्ध 2005 साली ही एकमेव मॅच खेळली. गिलेस्पी या मॅचमध्ये महागडा ठरला होता. त्याने 4 ओव्हर्समध्ये 49 रन देत 1 विकेट्स घेतली. त्याने बॅटींगमध्ये ही कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला. गिलेस्पीनं 9 व्या क्रमांकावर बॅटींगला येत 18 बॉलमध्ये 24 रन काढले.
इंझमाम उल हक (Inzamam-Ul-Haq)
पाकिस्तानच्या सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये इंझमामचा समावेश होतो. त्याने 120 टेस्ट आणि 378 वन-डे मॅच खेळल्या. इंझमामने यामध्ये अनुक्रमे 8830 आणि 11739 रन काढले. पण, इंझामानही एकच T20 मॅच खेळला आहे. इंझमामने 2006 साली इंग्लंड विरुद्ध ही मॅच खेळली होती. त्यामध्ये त्याने नाबाद 11 रन काढले.
पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?
राहुल द्रविड (Rahul Dravid)
टीम इंडियाची ‘द वॉल’ म्हणजे राहुल द्रविड. द्रविडनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये टीमसाठी नेहमीच संकटमोचक म्हणून कामगिरी केली आहे. राहुल द्रविडने टेस्ट आणि वन-डे या दोन्ही प्रकारात 10 हजार पेक्षा जास्त रन केले आहेत. पण, सचिनप्रमाणे द्रविड देखील एकच आंतरराष्ट्रीय T20 मॅच (Only T20I) खेळला आहे.
द्रविडचा 2011 साली अचानक इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत निवड झाली होती. त्या दौऱ्यात द्रविड एकमेव मॅच खेळला. या मॅचमध्ये त्यानं शानदार खेळ करत 147.61 च्या स्ट्राईक रेटने 31 रन काढले. यामध्ये त्याने समित पटेलच्या एका ओव्हरमध्ये सलग 3 सिक्सही लगावले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.