भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे सीरिज नुकतीच संपली. या सीरिजमधील एक किंवा दोन नाही तर सर्व 3 वन-डे मॅच पराभूत झाल्यानं टीम इंडियाच्या वन-डे खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. क्रिकेट विश्वातील चतूर कॅप्टन अशी ओळख असलेल्या गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर अद्याप वन-डे खेळण्यासाठी नाही, त्याला या टीममध्ये घेऊ नये (Gambhir on Venkatesh Iyer) असे स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केले आहे.

हार्दिक पांड्याचा वारसदार!

मध्य प्रदेशमधील इंदूरमधील क्रिकेटपटू असलेल्या व्यकंटेश अय्यरकडं टीम इंडियातील हार्दिक पांड्याचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. हार्दिक प्रमाणेच व्यंकटेश हा देखील मध्यमगतीनं बॉलिंग करू शकणारा बॅटींग ऑल राऊंडर आहे. हार्दिकची लांबलेली दुखापत, त्याचा फिटनेस याचा वर्ल्ड कपमधील फॉर्म यामुळे टीम इंडियाच्या संतुलनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टी काही महिन्यांपूर्वी प्रचंड काळजीच्या आणि निवड समितीवरील टीकेचा विषय होता.

हार्दिक पांड्याचा फॉर्म घसरलेला असतानाच व्यंकटेश अय्यर आयपीएलमध्ये चमकला. आयपीएल 2021 च्या भारतामध्ये झालेल्या सिझनमध्ये तो बेंचवर होता. पण, युएईमध्ये सेकंड हाफमध्ये तो खेळला. त्याने 10 मॅचमध्ये 41.11 च्या सरासरीने 370 रन काढले. पहिल्या हाफमध्ये तळाशी असलेली केकेआरची टीम सेकंड हाफमध्ये फायनलपर्यंत जाण्यास अय्यरच्या खेळाचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्याच्यावर हार्दिक पांड्याचा वारसदार हा शिक्का बसला. तो हाच शिक्का आणि तशीच अपेक्षा घेऊन टीम इंडियात दाखल झाला.

हार्दिक पांड्याचा वारसदार तयार करण्याचे काम सुरू, वन डे टीममध्ये नवी एन्ट्री

गंभीर काय म्हणाला?

व्यंकटेश अय्यर हार्दिकच्या जागेवरच टीम इंडियात आल्यानं त्याला ओपनिंगला नाही तर मिडल ऑर्डरमध्ये खेळणे भाग होते. न्यूझीलंड विरुद्ध त्याने T20 सीरिजमध्ये पदार्पण केले. त्या सीरिजमध्ये तो व्यवस्थित खेळला. पण, दक्षिण आफ्रिकेत वन-डे सीरिजमधील त्याचे पदार्पण निराशाजनक ठरले. पहिल्या दोन वन-डे मध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे तिसऱ्या वन-डेमध्ये त्याच्या जागेवर सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली.

गौतम गंभीरनं अय्यरच्या वन-डे टीममधील समावेशावर (Gambhir on Venkatesh Iyer) प्रश्न उपस्थित केला आहे. ‘माझ्या मते अय्यरची फक्त T20 टीममध्ये निवड व्हावी. कारण, तो अजून तितका परिपक्व झालेला नाही. त्याला फक्त 7-8 आयपीएल मॅचमधील खेळाच्या आधारावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी देण्यात आली आहे. आयपीएलमधील प्रदर्शनाचा विचार केला तर त्याला फक्त T20 क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी द्यावी. वन-डे क्रिकेट हा संपूर्ण वेगळा प्रकार आहे. त्यासाठी तो अजून तयार नाही.’ असे गंभीरने ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील कार्यक्रमात बोलताना सांगितले.

गंभीर पुढे म्हणाला की, ‘अय्यर वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी योग्य आहे, असे वाटत असेल तर टीम मॅनेजमेंटने आयपीएल टीमला त्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्याची सूचना करावी. अय्यरनं आयपीएलमध्ये ओपनिंग केली होती. तो आता मिडल ऑर्डरमध्ये खेळत आहे. माझ्या मते त्याला फक्त T20 टीममध्ये आणि ते देखील ओपनर म्हणून खेळवावं कारण तो आयपीएल टीमकडून त्याच जागेवर खेळतो.’ असे गंभीरने स्पष्ट (Gambhir on Venkatesh Iyer) केले.

दक्षिण आफ्रिका विरुद्धची सीरिज गमावल्यानंतर टीम इंडिया आता पुढील लिमिटेड ओव्हर्सची सीरिज वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. या सीरिजची (India vs West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होईल.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: