फोटो – ट्विटर BCCI/IPL

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलसाठी (Glenn Maxwell) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 ही स्पर्धा निराशाजनक ठरली. मॅक्सवेलनं 11 इनिंगमध्ये फक्त 108 रन्स काढले. 32 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. आक्रमक बॅटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलला संपूर्ण स्पर्धेत एकही सिक्सर मारता आलेला नव्हता. मॅक्सवेलच्या या अपयशायबद्दल त्याच्यावर सर्वत्र टीका झाली. आयपीएल स्पर्धेतनंतर खुद्द मॅक्सवेलनेच ESPNCRICINFO या वेबसाईटशी बोलताना त्याच्या अपयशाचे कारण सांगितले आहे.

“माझ्या खेळाचा पिचशी काहीही संबंध नव्हता. माझ्याकडून कमी वेळात जास्त खेळ करुन दाखवण्याची अपेक्षा होती. मी एकतर इनिंगची पुर्नबांधणी करत होतो किंवा कमी कमी बॉल शिल्लक राहिल्याने प्रत्येक बॉल आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होतो. प्रत्येक बॉल जोराने तडकावला नाही तर अडचणीत सापडण्याची शक्यता होती. मी त्या परिस्थितीत फार काही करु शकलो नाही. मी माझ्या करियरमधील एक सर्वोत्तम इनिंग (इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डमधील सेंच्युरी) खेळून आयपीएलमध्ये दाखल झालो होतो. मात्र याचा मला फारसा फायदा उठवता आला नाही ”, असे मॅक्सवेलने म्हंटले आहे.

मॅक्सवेल मागील आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमकडून खेळला. आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंड सीरिजमध्ये मॅक्सवेलनं जोरदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा त्याला पूर्ण करता आल्या नाही. अर्थात मॅक्सवेल आयपीएलमध्ये फेल जाण्याचे हे पहिले वर्ष नाही. त्याने आयपीएलमधील शेवटची हाफ सेंच्युरी 2016 साली लगावली आहे.

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतीलही मॅक्सवेल हा महत्वाचा खेळाडू असून मेलबर्न स्टार या टीमचा कॅप्टन आहे. बिग बॅश स्पर्धेतील नव्या नियमांचे मॅक्सवेलने स्वागत केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: