वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा शेवटच्या साक्षीदारांपैकी एक असलेल्या रिची रिचर्डसन (Richie Richardson) यांचा आज वाढदिवस.  तपकिरी रंगाची गोल टोपी घालून मैदानात उतरणाऱ्या रिचर्डसनची 1996 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमधील एकाकी झुंज अनेकांना आठवत असेल. फास्ट बॉलर्सचा सामना हेल्मेट शिवाय करणारे खेळाडू म्हणून त्यांची ओळख (Richie Richardson Birthday) होती.

पहिल्या दौऱ्यात फजिती

रिचर्डसन यांनी 1983 साली भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच आंतराष्ट्रीय दौऱ्यात त्यांची बॅग हरवली. त्यामुळे त्यांच्याकडे मोजकेच कपडे होते. रिचर्डसन टीममधील तिसरे ओपनर होते. तरीही नेट प्रॅक्टीसमध्ये त्यांचा क्रमांक बॉलर्सचा बॅटिंगचा सराव झाल्यानंतर येत असे. टीममधल्या तरुण खेळाडूवरचा हा अन्याय दूर करण्यासाठी वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर अँडी रॉबर्ट्स पुढे आले. रिचर्डसन यांचा सराव व्हावा म्हणून रॉबर्ट्स त्यांना नेट प्रॅक्टीसमध्ये बॉलिंग टाकत असत.

रिचर्डसन 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 86 टेस्ट खेळले. यामध्ये त्यांनी 44.39 च्या सरासरीने 5949 रन्स केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची बॅट विशेष तळपत असे. 16 पैकी 9 टेस्ट सेंच्युरी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावल्या. भारताविरुद्ध 1989 साली जॉर्जटाऊन टेस्टमध्ये त्यांनी 194 रन्स काढले होते. हा त्यांचा  (Richie Richardson Birthday) टेस्ट करियरमधील सर्वोच्च स्कोअर होता.

हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला, मॅकग्राला भिडला आणि बोर्डाशी भांडला!

कॅप्टन रिचर्डसन!

1992 च्या वर्ल्ड कप नंतर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचे उत्तराधिकारी म्हणून रिचर्डसन यांची निवड करण्यात आली होती. टीममधील सीनियर खेळाडूंना वगळून रिचर्डसन यांना कॅप्टन करण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. रिचर्डसन 1992 – 96  अशी चार वर्षे वेस्ट इंडिजचे कॅप्टन होते. या काळात फक्त एकदाच 1995 साली वेस्ट इंडिजची टीम टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाली. ऑस्ट्रेलियाने तब्बल 15 वर्षानंतर वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं. रिचर्डसन यांच्याच कॅप्टनसीच्या काळात वॉल्स – अँम्ब्रोज ही फास्ट बॉलर्सची जोडी स्थिरावली. ब्रायन लारा (Brian Lara) या महान बॅट्समनचा उदय झाला.

भारतीय उपखंडात 1996 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रिचर्डसन वेस्ट इंडिज टीमचे कॅप्टन  (Richie Richardson Birthday) होते. त्या वर्ल्ड कपमध्ये दुबळ्या केनियानं वेस्ट इंडिजला पराभूत करुन क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. या पराभवानंतर रिचर्डसन यांच्यावर जोरदार टीका झाली. जगभरातून टीका होत असताना या पराभवानंतर वेस्ट इंडिजची टीम पेटून उठली. 1983 नंतर वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

स्वप्न अधुरे

मोहालीमध्ये वेस्ट इंडिज – ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्यात झालेली वर्ल्ड कप सेमी फायनल शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झाली. ऑस्ट्रेलियाच्या 208 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम 2 आऊट 165 या मजबूत स्थितीवरुन 202 रन्सवर ऑल आऊट झाली. रिची रिचर्डसननं या पडझडीतही एकाकी झुंज दिली. ते 49 रन्सवर नॉट आऊट राहिले. या कटू आठवणीसह रिचर्डसन रिटायर झाले. वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकून देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे त्यांचे स्वप्न  (Richie Richardson Birthday) अधुरे ठरले.

वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अंधारयुगातील दीपस्तंभ!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: