फोटो – ET

2021 वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी आहे. 2020 हे वर्ष कोरोना व्हायरसची दहशतीमध्ये संपले. या वर्षाचा खूप मोठा कालावधी लॉकडाऊनमध्ये गेला. क्रिकेटसह सर्व खेळ बरेच महिने बंद होते. वर्षाच्या उत्तरार्धात खेळ सुरु झाले, पण त्याला बरेच निर्बंध होते. युएईमध्ये झालेल्या IPL स्पर्धेच्या दरम्यान फक्त खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या मैदानात उपस्थित होते.

भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमध्येही मर्यादीत संख्येमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येतोय. ऑस्ट्रेलिया नंतर भारतामध्येही आता 50 टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून मॅच पाहता येणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिज आणि IPL 2021 या दोन स्पर्धा 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये खेळवण्यास केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं परवानगी दिली आहे.

( वाचा : श्रीसंतचं 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक, संजू सॅमसनच्या कॅप्टनसीखाली खेळणार स्पर्धा )

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. तर IPL 2021 ला एप्रिलमध्ये सुरुवात होईल. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचं BCCI तसंच क्रिकेट फॅन्सनी स्वागत केलं आहे. या निर्णायमुळे क्रिकेट फॅन्सना आता मैदानात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या खेळाचा आनंद घेता येईल. तर, BCCI ला तिक्रीट विक्रीतून मिळाणारे उत्पन्न सुरु होईल.

अर्थात, मैदानात प्रेक्षकांना परवानगी देताना क्रीडा मंत्रालयाच्या 3 प्रमुख अटींचं पालन करणे आयोजकांना बंधनकारक असेल, त्या अटी अशा

  1. केंद्र सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार स्टेडियममध्ये मॅच पाहू शकणाऱ्या प्रेक्षकांची संख्या निश्चित केली जाईल
  2. आऊटडोअर (Outdoor) स्पर्धांना मैदानातील एकूण प्रेक्षक क्षमतेच्या जास्तीत जास्त 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल.
  3. प्रेक्षकांचे मैदानातील प्रवेशद्वार (Entry Gate) आणि बाहेर जाण्याचा दरवाजा (Exit Gate) तसंच मैदानात गर्दी होऊ शकते अशा सर्व जागांची CCTV च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे.

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजपासून या गाईडलाईन्स लागू होतील. या सीरिजमधल्या पहिल्या दोन टेस्ट चेन्नई (Chennai) तर शेवटच्या दोन टेस्ट आणि पाच T20 सामने अहमदाबाद (Ahmedabad)  मध्ये होणार आहेत. तर तीन्ही वन-डे पुण्यात (Pune) खेळल्या जाणार आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: