क्रिकेटच्या मैदानावर अचूकतेचं दुसरं नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लेन मॅकग्राचा आज वाढदिवस (Glenn McGrath Birthday) आहे. आजच्याच दिवशी ( 9 फेब्रुवारी 1970) रोजी मॅकग्राचा जन्म झाला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमला नंबर 1 बनवण्यात मॅकग्राचे मोठे योगदान होते. स्लेजिंग आणि मैदानावरील प्रभूत्व या दोन कारणांमुळे तेंव्हाची ऑस्ट्रेलियन टीम ओळखली जात असे. मॅकग्रा या दोन्ही ठिकाणी टीमचे आघडीवर राहून नेतृत्व करत असे.

न्यूझीलंडविरुद्ध 1993 साली मॅकग्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्याकडे वेग आणि अचूकता सुरुवातीपासूनच होती. मात्र, 1996 च्या वर्ल्ड कप त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. 96 च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) मॅकग्राची एका क्लब बॉलरसारखी पिसं काढली होती. या निराशाजनक कामगिरीनंतर मॅकग्रानं जिद्दीनं कमबॅक केलं आणि आज त्याचं नाव जगातील अव्वल फास्ट बॉलर्समध्ये घेतलं जातं.

ग्लेन मॅकग्राची टेस्टमधील कामगिरी

मॅच124
विकेट्स563
सरासरी21.64
सर्वोत्तम8/24
5/1029/3

वेस्ट इंडिज विरुद्ध 1997 साली झालेली टेस्ट सीरिज त्याच्या ( Glenn McGrath) करियरचा मोठा टर्निंग पॉईंट ठरली. त्या सीरिजमध्ये त्याने 26 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याचवर्षी मॅकग्रा इंग्लंडमध्ये पहिली टेस्ट खेळला. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने 38 रन्स देत आठ विकेट्स घेतल्या. त्या सीरिजमध्ये मॅकग्रा ‘मॅन ऑफ द सीरिज’ चाही मानकरी (Glenn McGrath Birthday) ठरला.

ग्लेन मॅकग्राची वन-डे मधील कामगिरी

मॅच250
विकेट्स381
इकोनॉमी रेट3.88
सर्वोत्तम7/15
एका मॅचमध्ये पाच विकेट्स7

इंग्लंडमध्ये 1999 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या. त्यानंतरच्या पूढील दोन्ही वर्ल्ड कपमध्ये मॅकग्राने सर्वोत्तम कामगिरी केली. वर्ल्ड कप इतिहासात सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम मॅकग्राच्याच नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन सलग वर्ल्ड कप विजेतेपदात मॅकग्राचे मोठे योगदान आहे.

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे बॉलर

बॉलरदेशविकेट्स
ग्लेन मॅकग्राऑस्ट्रेलिया71
मुरलीधरनश्रीलंका68
लसिथ मलिंगाश्रीलंका56
वासिम अक्रमपाकिस्तान55
मिचेल स्टार्कऑस्ट्रेलिया49

मॅकग्रा खेळत असताना ऑस्ट्रेलियन टीम क्रिकेट विश्वातील नंबर 1 टीम होती. ती प्रतिस्पर्धी टीम्सना हरवण्यासाठी नाही तर चिरडण्यासाठी ओळखली जात असे. प्रतिस्पर्ध्यांना संपूर्ण लोळवण्यात मॅकग्रा नेहमीच आघाडीवर असे. 2004 साली पर्थ टेस्टमध्ये पाकिस्तानसमोर विजयासाठी 564 रन्सचं विशाल टार्गेट होतं. पाकिस्तान मॅच जिंकणार नाही हे स्पष्ट होतं. पण पाकिस्तानने ती मॅच तब्बल 491 रन्सने गमावली. मॅकग्राने त्या मॅचमध्ये अक्षरश: आग ओकली. त्याने 16 ओव्हर्समध्ये 24 रन्स देत 8 विकेट्स घेतल्या.

वाढदिवस स्पेशल : मॅकग्राची उंची, ब्रेट ली चा वेग आणि अक्रमचा स्विंग! )

बेलगाम जीभ, शिस्तबद्ध बॉल!

प्रतिस्पर्धी टीमच्या प्रमुख बॅट्समनला विरुद्ध सीरिज सुरु होण्यापूर्वी डिवचण्यात आणि सीरिजचं भविष्य आधीच वर्तवण्यासाठी मॅकग्रा नेहमी आघाडीवर असे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील पारंपारिक अँशेस सीरिजमध्ये तर त्याची स्लेजिंगची नैसर्गिक कला आणखी बहरत असे. वेस्ट इंडिजच्या रामनरेश सरवान विरुद्धही त्याचा मैदानात मोठा राडा झाला होता. त्याची जीभ बेलगाम असली तरी त्याच्या बॉलने कधीही शिस्त मोडली नाही. तो शेवटपर्यंत अचूक टप्प्यावर पडला. त्याचमुळे शेवटच्या टेस्ट मॅचमधील शेवटचा बॉल, शेवटच्या टी-20 मधील शेवटचा बॉल आणि शेवटच्या वन-डे मॅचमधील शेवटच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर विकेट घेण्याचा पराक्रम मॅकग्राने केलाय.

ऑस्ट्रेलियन टीम 2005 च्या अँशेसमध्ये 1-2 ने पराभूत झाली. ऑस्ट्रेलिया पराभूत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये मॅकग्रा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतरच्या अँशेसमध्ये इंग्लंडला 5-0 असे चिरडल्यानंतर त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2007 च्या वर्ल्ड कपमध्येही त्याने सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. क्रिकेट करियरमधील शेवटच्या वन-डे सीरिजमध्ये ‘मॅन ऑफ सीरिज’ पुरस्कार जिंकून आणि ऑस्ट्रेलियाला सलग तिसरा वर्ल्ड कप जिंकून देऊन मॅकग्रा ( Glenn McGrath Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.  

चामिंडा वास, श्रीलंकेचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर )

मॅकग्राच्या निवृत्तीला एक तप उलटले असले तरी त्याच्या बॉलिंगचा प्रभाव आजही कायम आहे. बॉलिंगची अचूकता मोजण्याची तो फुटपट्टी आहे. जागतिक क्रिकेट त्याचं योगदान कधीही विसरणार नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: