फोटो – सोशल मीडिया

टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयमध्ये एकवाक्यता नसल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट झाले आहे. निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांच्या पत्रकार परिषदेनं या प्रकरणाला नवे वळण आले आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा माजी ऑफ स्पिनर हरजभन सिंग (Harbhajan Singh Blame BCCI) याने बीसीसीआयच्या कारभाराबात नवा गौप्यस्फोट केला आहे.

ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने नुकताच इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम केला. यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी खेळाडू आणि वर्ल्डकप विजेत्या टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला. टीममधून अचानक बाहेर का काढले याचे समाधानकारक उत्तरही मिळाले नाही, असा दावा हरभजनने केला आहे.

तगडा अनुभव

भज्जी, टर्बोनेटर याने नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंग याने टीम इंडियाकडून 103 टेस्ट, 236 वन डे आणि 28 टी-20 खेळल्या. तिन्ही फॉर्मेट मिळून त्याच्या नावार 700 हून अधिक विकेट्सची नोंद आहे. परंतु 2011 च्या वन डे वर्ल्डकपनंतर त्याने टीममधील जागा गमावली.

90’s Gold मधील शेवटच्या ताऱ्याचा अस्त!

2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीही हरभजनला (Harbhajan Singh Blame BCCI) डावलण्यात आले. 2015 मध्ये झालेल्या वन वे वर्ल्डकपच्या टीममध्येही त्याचे नाव नव्हते. मात्र 2016 ला भारतात झालेल्या T20 वर्ल्डकपसाठी त्याची टीममध्ये निवड करण्यात आली, परंतु त्याला खेळण्याची संधीच मिळाली नाही. भज्जी अखेरची वन डे मॅच 2015 आणि अखेरची T20 मॅच 2016 ला खेळला. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.

रहस्य कायम

टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला अशाप्रकारे टीममधून बाहेर काढणे एक रहस्यमय कथेप्रमाणे आहे. नक्की काय झाले? मी टीममध्ये राहिलो असतो तर कोणाला त्रास होता? या प्रश्नांची उत्तरे मला आजपर्यंत देण्यात आलेली नाही. ही गोष्ट मला नेहमीच अचंबित करते, असे हरभजन सिंग याने म्हटले आहे.

हरभजन सिंग याने याचे उत्तर त्यावेळचा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यालाही विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनीकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. उत्तरच मिळणार नसेल तर सतत तोच प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपण हा प्रश्न विचारणेही बंद केल्याचे हरभजन सिंग म्हणाला.

बीसीसीआयवर ब्लेम

धोनीसह हरभजन सिंग याने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही (Harbhajan Singh Blame BCCI) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मी टीम इंडियाकडून कमबॅक करावे असे बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना वाटत नव्हते. त्यावेळी धोनी कॅप्टन होता आणि त्याने बीसीसीआय अधिकाऱ्यांचे समर्थन केले, असा दावा हरभजनने केला.

विराट कोहलीनं कुणाचंही ऐकलं नाही, निवड समिती अध्यक्षांचा खळबळजनक दावा

नशिब नेहमीच माझ्या बाजूने होते. फक्त काही जण माझ्या विरुद्ध होते. मी चांगला खेळ करत होतो. मी 31 व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेतल्या होत्या. माझ्या मनात आणखी चार-पाच वर्षे खेळण्याचा विचार चालू होता. तसे झाले असते तर मी आणखी 100-150 विकेट्स घेऊ शकलो असतो, असा दावा हरभजननं केला.

धोनीला बीसीसीआय अधिकाऱ्यांची साथ

कॅप्टन, कोच किंवा टीम बीसीसीआयपेक्षा मोठी असू शकत नाही. परंतु त्यावेळी इतर प्लेअर्सच्या तुनलेमध्ये धोनीला बीसीसीआय अधिकाऱ्यांची (Harbhajan Singh Blame BCCI) नेहमीच साथ लाभली. जर अशी साथ अन्य प्लेअर्सला मिळाली असती तर ते देखील अधिक चांगला खेळ दाखवू शकले असते. ते खेळाडू बॅटिंग करणे किंवा बॉलिंग करणे विसरले नव्हते. टीम इंडियाची जर्सी घालून निवृत्त व्हावे ही प्रत्येक प्लेअरची इच्छा असते. परंतु असे सर्वांसोबत होत नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman), राहुल द्रविड (Rahul Dravid), विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांचे उदाहरण आपल्यासमोर आले, असेही हरभजन म्हणाला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: