फोटो – सोशल मीडिया

वन-डे क्रिकेटमधील टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) पदावरून हटवून त्याच्या जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी दक्षिण आफ्रिका सीरिजपासून (India vs South Africa ODI Series 2022) रोहित शर्मा वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून काम करणार आहे. भारतीय क्रिकेटमधील या सत्तांतरणाबाबत अनेक थिअरी सध्या मांडल्या जात आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून 70 टक्के विजयाचा दणदणीत रेकॉर्ड असलेल्या विराटला हटवून रोहितला कॅप्टन कसे करण्यात आले? याचा संपूर्ण घटनाक्रम (How Rohit Replaced Virat) आता उघड झाला आहे.

3 महिन्यांपूर्वी सुरूवात

विराट कोहलीनं 3 महिन्यांपूर्वी वर्क लोडचं कारण देत टीम इंडियाची T20 टीमच्या कॅप्टनसी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. विराटनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून ती घोषणा केली होती. यंदा बीसीसीआयनं विराटच्या जागी रोहित शर्माला कॅप्टन म्हणून नियुक्त केले अशी माहिती मीडियाला दिली. हा गेल्या तीन महिन्यातील बदललेल्या परिस्थितीमधील मुख्य फरक आहे.

‘मी टेस्ट आणि वन-डे टीमची कॅप्टन म्हणून पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे विराटने 16 सप्टेंबर रोजी सोशल मीडियात लिहिलेल्या पोस्टमध्ये जाहीर केले होते. 2023 साली भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्याची इच्छा होती. पण, निवड समितीचे विराटबद्दलचे मत (How Rohit Replaced Virat) बदलले होते.

विराट कोहली कॅप्टनसी सोडणार, T20 वर्ल्ड कपनंतर कमी करणार जबाबदारी

एक कॅप्टन हवा!

वन-डे आणि T20 या व्हाईट बॉल क्रिकेटमधील दोन प्रकारत दोन वेगळे कॅप्टन निवड समितीला मान्य नव्हते. या दोन्ही प्रकारात टीम जवळपास सारखी असते. तसेच खेळाची पद्धतही समान आहे. त्यामुळे या प्रकारत दोन वेगळे कॅप्टन ठेवून खेळाडूंचा गोंधळ आणि दोन्ही कॅप्टनमधील अवघडलेपण कमी करण्याचे निवड समिताने निश्चित केले होते, असा दावा ‘इंडियन एक्स्प्रेस’ मधील रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

या रिपोर्टनुसार, रेड बॉल क्रिकेट आणि व्हाईट बॉल क्रिकेट मधील कॅप्टन वेगळा असावा हे बीसीसीआयने निश्चित केले. त्यातच T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरीनंतर विराटला वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून काढण्याच्या निर्णय आणखी ठाम झाला. त्या वर्ल्ड कपनंतर वन-डे टीमच्या निवडीच्या पहिल्या बैठकीत तो निर्णय जाहीर (How Rohit Replaced Virat) करण्यात आला.

विराटला कल्पना नव्हती!

विराट कोहलीने T20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच त्या प्रकारातील कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याने याबाबत टीम इंडियाचे तेव्हाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri)  यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) तसेच सचिव जय शहा (Jay Shah) यांनाही या निर्णयाची कल्पना दिली होती. T20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय त्याचा होता.

वन-डे टीमची कॅप्टनसी विराटला सोडण्याची इच्छा नव्हती. त्याने याबाबत कोणताही निर्णय न घेता निवड समितीच्या कोर्टात बॉल टोलावला होता. निवड समितीने त्या बॉलवर संधी साधत विराटला कॅप्टन पदावरून दूर केले.

EXPLAINED: रोहित शर्मा यशस्वी कॅप्टन असल्याची 5 प्रमुख कारणं

…यापूर्वी मिळाले होते संकेत

विराट कोहलीचं टीम इंडियातील सत्ताकेंद्र कमी करण्याचे संकेत बीसीसीआयनं T20 वर्ल्ड कपपूर्वीच दिले होते. त्या वर्ल्ड कपची टीम निवड केल्यानंतर लगेच महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) मेंटॉर म्हणून झालेली नियुक्ती हा बीसीसीआयच्या बदललेल्या धोरणाचा भाग होता. क्रिकेट बोर्डाने विराटचे विश्वासू कोच रवी शास्त्रींच्या जोडीला ड्रेसिंग रूममध्ये धोनीलाही आणत बदललेला मूड जाहीर केला होता.

विराट कोहलीला ते बदललेला मूड ओळखता आला नाही किंवा ओळखूनही टोकाचा निर्णय लगेच होईल अशी अपेक्षा त्याने केली नसावी. भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून किती काळ राहयचं याबाबत कधीही खेळाडूंच्या नाही तर बोर्डाच्या मर्जीवर ठरत आलेलं आहे.

1983 साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वर्षभरातच कपिल देवची कॅप्टन पदावरून हकालपट्टी झाली. 1985 साली ऑस्ट्रेलियात ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ ट्रॉफी जिंकल्यानंतर वर्षभरात सुनील गावसकर यांनाही तोच अनुभव आला. अगदी सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीलाही टीम इंडियाचा कॅप्टन असताना तो अनुभव आला आहे. या यादीमध्ये आता विराट कोहलीची देखील भर (How Rohit Replaced Virat) पडली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: