फोटो – सोशल मीडिया

मोठ्या पराभवानंतर तितकीच मोठी उसळी मारत कमबॅक करणे हे टीम इंडियाच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षभरात घडलेल्या 2 घटना हे याचे प्रमुख उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड आणि इंग्लंडमधील लीड्स टेस्टमध्ये झालेल्या खराब कामगिरीनंतर टीम इंडियाने खणखणीत कमबॅक करत यजमान टीमला आश्चर्यचकित केले होते. टीम इंडियाच्या या कामगिरीनंतर आश्चर्यचकित झालेल्या माजी हेड कोच ग्रेग चॅपेल यांनी  तेव्हाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना फोन (Greg Chappell called Ravi Shastri) केला होता, असा गौप्यस्फोट टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) यांनी केला आहे.

कोणत्या जिंकल्या होत्या मॅच?

 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अ‍ॅडलेड टेस्टमध्ये (India vs Australia, Adelaide Test 2020)  टीम इंडिया 36 रनवर ऑल आऊट झाली होती. भारतीय टीमच्या टेस्ट इतिहासातील हा सर्वात कमी स्कोअर आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सीरिजमध्ये कमबॅक केले. त्यानंतरची मेलबर्न टेस्ट आधा जिंकली आणि पुढे ती सीरिज 2-1 अशा फरकाने जिंकत इतिहास घडवला.

टीम इंडिया यावर्षी इंग्लंड दौऱ्यातील लीड्स टेस्टमध्ये (India vs England, Leeds Test 2021) 78 रनवर ऑल आऊट झाली. ही टेस्ट गमावल्यानंतर लगेच ओव्हल टेस्टमध्ये भारतीय टीमनं कमबॅक केले. तब्बल 50 वर्षांनी ओव्हलमध्ये टेस्ट मॅच जिंकण्याचा पराक्रम केला. इंग्लंड सीरिज कोरोनामुळे स्थगित झाली त्यावेळी टीम इंडिया टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर होती.  

होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!

चॅपेल यांना धक्का

ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन ग्रेग चॅपेल हे टीम इंडियाचे कोच होते. जॉन राईट यांच्यानंतर ते टीम इंडियाचे हेड कोच झाले होते. चॅपेल यांची कारकिर्द चांगलीच वादग्रस्त ठरली. त्यांच्या कारकिर्दीत 2007 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया प्राथमिक फेरीतच पराभूत झाली. या पराभवानंतर चॅपेल यांनी पदाचा राजीनामा दिला.

चॅपेल यांनी भारतीय क्रिकेटमधील जबाबदारी सोडली असली तरी आजही ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलेच सक्रीय आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाच्या कामगिरीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे चॅपेल यांनी या दोन्ही दौऱ्यातील टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना फोन करत भारतीय टीम प्रत्येक वेळी या मोठ्या पराभवानंतर कमबॅक कसं करते? याचं रहस्य काय आहे? असा प्रश्न (Greg Chappell called Ravi Shastri)  विचारला, अस गौप्यस्फोट श्रीधर यांनी ‘पीटीआय’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

मोठा पराभव ही संधी!

श्रीधर यांनी या मुलाखतीमध्ये मोठे पराभव ही कोचसाठी शिकण्याची संधी असते, असे सांगितले. ‘माझ्यासाठी कोच म्हणून वाईट दिवस ही चांगल्या दिवसापेक्षा जास्त मोठी संधी होती. खराब दिवसानंतर एखाद्या खेळाडूला व्यक्ती म्हणून समजण्याची चांगली संधी मला मिळत असे. त्यामधून खेळाडूंशी चांगले नाते तयार होते आणि त्यांना गरज असेल तर तांत्रिक आणि मानसिक पातळीवर मदत करता येते.

एखाद्या खराब दिवशी तुम्ही कसं वागता यावरच टीम कशी आहे हे ठरते. या टीममधील खेळाडूंमध्ये या दिवसाचा प्रतिकार करण्याची मोठी लवचिकता आहे. त्यामुळेच चॅपेल यांनी रवी भाईंना फोन करून याचे रहस्य विचारले (Greg Chappell called Ravi Shastri)  होते.’ असे श्रीधर यांनी स्पष्ट केले.

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरूण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचा कार्यकाळ T20 वर्ल्ड कपनंतर संपला आहे. त्यांच्या काळात भारतीय टीमला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. पण विदेशात टीम इंडियाने अनेक संस्मरणीय विजय मिळवले. तसेच टीम इंडियाचा बॉलिंग आणि फिल्डिंगचा स्तर देखील उंचावला.

Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण…

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: