इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने या दशकातील सर्वोत्तम टीम T20, वन-डे आणि टेस्ट टीम जाहीर केली आहे. पुरुषांच्या तिन्ही टीमचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे सोपवण्यात आले आहे. टीम इंडियाच्या यशस्वी कॅप्टनपैकी एक असलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा T20 आणि वन-डे टीमचा कॅप्टन आहे. तर विराट कोहलीकडे (Virat Kohli) टेस्ट टीमची कॅप्टनसी देण्यात आली आहे.

कोणत्या भारतीयांचा समावेश?

दशकातील सर्वोत्तम टेस्ट टीममध्ये विराट कोहली आणि आर. अश्विन हे दोन भारतीय आहेत. वन-डे टीममध्ये कॅप्टन धोनीसह रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना जागा मिळाली आहे. तर T20 टीममध्ये धोनी, रोहित, विराट आणि जसप्रित बुमराह या चार भारतीयांचा अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

महिला टीममध्ये हरपनप्रीत कौर आणि पूनम यादव यांची दशकातील सर्वोत्तम T20 टीममध्ये निवड झाली आहे. वन-डे टीममध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना स्थान मिळाले आहे.

( वाचा : महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 : वाचा भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक )

पुरुष टेस्ट टीम

अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कॅप्टन), स्टीव्हन स्मिथ, कुमार संगकारा (विकेट किपर), बेन स्टोक्स, आर.अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

पुरुष वनडे टीम

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेट किपर ), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा

महिला वनडे टीम

एलिसा हिली, सुझी बेट्स, मिताली राज, मेग लॅनिंग (कॅप्टन), स्टेफनी टेलर, सराह टेलर (विकेट किपर), एलीस पेरी, डेन व्हॅन नायकर्क, मारीझेन कॅप, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद

पुरुष टी-20 टीम

रोहित शर्मा, क्रिस गेल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेट किपर), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

महिला टी-20 टीम

एलिसा हिली (विकेट किपर), सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, मेग लॅनिंग (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डीनद्रा डॉटिन, एलिस पेरी, अन्या श्रुबसोल, मेगन स्चूट, पूनम यादव

पाकिस्तानवर फुली

ICC टीमच्या निवडीमधील एक महत्तवाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला (पुरुष किंवा महिला) या टीममध्ये जागा मिळालेली नाही. ही टीम जाहीर होताच पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानच्या फॅन्सनी नेहमीप्रमाणे यंदाही BCCI ला टार्गेट केले आहे.

( वाचा : शोएब अख्तरचे ‘गझवा-ए-हिंद’ के जहरीले सपने, ‘काश्मीर ताब्यात घेऊ, भारतावर हल्ला करु’ – पाहा VIDEO )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: