फोटो – ट्विटर, बीसीसीआय

T20 वर्ल्ड कप विजेतेपदाची (T20 World Cup 2021) प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाची (Team India) या स्पर्धेतील सुरूवात धक्कादायक झाली आहे. पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्यासाठी प्रत्येक मॅच निर्णायक आहे. विशेषत: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या (India vs New Zealand) मॅचला आता मोठं महत्त्व प्राप्त झालंय. टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाची असलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमला वाचवण्याचं काम विराट कोहलीनं (Virat Kohli) तोडलेली जोडीच करणार आहे. टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा (Ashwin Jadeja Returns)  जोडीवरच आता टीमला वाचवण्याची जबाबदारी आहे.

अश्विन-जडेजा जोडीनं आजवर टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिली आहे. भारतामध्ये टेस्ट मॅच जिंकण्यासाठी आजही ही जोडी निर्णायक आहे. काही वर्षांपूर्वी लिमिटेड ओव्हरमध्येही ही जोडी एकत्र खेळत असे. पण 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर या दोघांना लिमिटेड ओव्हर्सच्या टीममधून वगळण्यात आलं.

चार वर्षांनी अश्निनचं पुनरागमन

अश्विन-जडेजा जोडीची जागा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या जोडीनं घेतली. कुलचा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जोडीनं काही वर्ष गाजवली. त्याचवेळी रवींद्र जडेजाचंही टीममध्ये पुनरागमन झालं. तो टीममध्ये स्थिरावला. मात्र अश्विन हा फक्त टेस्ट क्रिकेटपुरताच उरला होता. यंदा T20 वर्ल्ड कपच्या टीममधून चहल-कुलदीप बाहेर आहेत. तर तब्बल चार वर्षांनी अश्विनचं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये पुनरागमन (Ashwin Jadeja Returns) झालं आहे.

2 वर्षांपासून विचारत नाही कुणी, टीम इंडियाच्या बॉलरला आठवला महेंद्रसिंह धोनी!

पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये अश्विन खेळला नाही. त्या मॅचमधील पराभवानंतर टीममध्ये काही बदल अपेक्षित आहेत. यामध्ये आर. अश्विनचा टीममध्ये समावेश हा मोठा निर्णय मॅनेजमेंट घेऊ शकतं. एक फास्ट बॉलर कमी खेळवून टीम इंडियामध्ये अनुभवी अश्विनचा समावेश होण्याची शक्यता आहे.

अश्विन का हवा?

अश्विनकडं सर्व प्रकारच्या पिचवर बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्याच्या बॉलिंगमध्ये वैविध्य आहे. टीम इंडियाच्या वॉर्म-अप मॅचमध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली होती. तसंच न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्यांदा बॉलिंग आली तर ओल्या बॉलनं बॉलिंग करण्याचे कौशल्य त्याच्याकडं आहे.

डावखुऱ्या बॅटर्सविरुद्ध अश्विनचा सरस रेकॉर्ड हे देखील त्याचं न्यूझीलंड विरुद्ध खेळण्याचं महत्त्वाचं कारण ठरु शकतं. न्यूझीलंडकडं डेवॉन कॉनवे, जिमी निशम यांच्यासोबत लोअर ऑर्डरमध्ये मिचेल सँटनर हा डावखुरा बॅटर आहे. त्यांच्याविरुद्ध अश्विन उपयुक्त ठरु शकतो. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या काही ऐच्छिक प्रॅक्टीस सेशनमध्ये अश्विन एकदम सक्रीय होती. त्यामुळे चार वर्षांपूर्वी जी जोडी विराट कोहलीनं तोडली त्याच जोडीवर आता टीम इंडियाला संकटातून वाचवण्याची जबाबदारी असल्याचे संकेत(Ashwin Jadeja Returns)  मिळत आहेत.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: