फोटो – ट्विटर

T20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात या वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही टीमनं आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे फायनलनंतर क्रिकेट विश्वाला नवी T20 चॅम्पियन मिळणार आहे. T20 वर्ल्ड कपची ही सातवी फायनल आहे. यापूर्वीच्या सहा वर्ल्ड कप फायनलमध्ये काय झालं  (T20 WC Final Recap) ते पाहूया

2007 – भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan)

भारत आणि पाकिस्तान या दोन टीम पहिल्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभ्या होत्या. टीम इंडियानं पहिल्या बॅटींग करत पाकिस्तानसमोर 158 रनचं आव्हानात्मतक टार्गेट ठेवलं. गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) सर्वाधिक 75 रनची खेळी केली. तर पाकिस्तानकडून उमर गुलनं 3 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानच्या ठराविक अंतरानं विकेट्स पडत होत्या. पण त्या वर्ल्ड कपमध्ये टीममध्ये पुनरागमन झालेल्या मिसबाह उल हकनं (Misbah Ul Haq) एक बाजू लावून धरत पाकिस्तानच्या आशा कायम ठेवल्या. पाकिस्तानला शेवटच्या 4 बॉलमध्ये 6 रनची गरज होतीय त्यावेळी मिसाबहनं मारलेला स्कूप फसला. श्रीसंतनं त्याचा कॅच पकडला आणि टीम इंडियानं पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला. जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर देण्याची महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चाल ‘मास्टर स्ट्रोक’ (T20 WC Final Recap) ठरली. 16 रन देऊन 3 विकेट्स घेणाऱ्या इरफान पठाणला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आले.

2009 – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka)

इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) या आशियाई टीम आमने-सामने होत्या. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या श्रीलंकेला 138 पर्यंत मजल मारता आली. कुमार संगकारानं (kumara Sangakkara)  नाबाद 64 रनची खेळी केली. तर अब्दुल रझ्झाकनं 3 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानकडून तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या शाहिज आफ्रिदीनं 40 बॉलमध्ये नाबाद 55 रनची आक्रमक खेळी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आफ्रिदीलाच ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.          

2010 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England)

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2010) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या आशिया खंडाच्या बाहेरच्या टीमनं पहिल्यांदाच फायनलमध्ये होत्या. इंग्लंडचा कॅप्टन पॉल कॉलिंगवूडनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. इंग्लंडच्या बॉलर्सनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला 147 रनवर रोखलं.

इंग्लंडकडून केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) आणि क्रेग क्रिसवेटर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 111 रनची पार्टनरशिप केली. कॅप्टन कॉलिंगवूडनं 17 व्या ओव्हरला शेन वॉटसनला फोर मारला आणि इंग्लंडनं इतिहासात पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी (T20 WC Final Recap) जिंकली.

‘साहेबी’ क्रिकेट संस्कृती बदलणारा ‘परदेसी बाबू’

2012 – वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka)

श्रीलंकेत झालेल्या या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिल्या बॅटींग करताना 6 आऊट 137 पर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर अजंथा मेंडिसनं 4 विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजनं या कमी स्कोअरचं संरक्षण जिद्दीनं केलं. सुनील नरीननं 3 विकेट्स घेत श्रीलंकेला 101 रनवर रोखलं. वेस्ट इंडिजकडून 78 रनची खेळी करणारा मार्लन सॅम्युल्स (Marlon Samuels) ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

मलिंगाला वर्ल्ड कप फायनलमध्ये पाच सिक्स मारणारा बॅट्समन!

2014 – भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka)

श्रीलंकेनं सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली. बांगलादेशमध्ये झालेल्या या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यांच्यासमोर टीम इंडियाचं आव्हान होतं. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियाला मोठा स्कोअर करता आला नाही. टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 130 रन केले. विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वात जास्त 77 रन काढले.  

श्रीलंकेची सुरूवात अडखळती झाली. पण कुमार संगकारानं नाबाद 52 रनची खेळी करत यावेळी विजेतेपद श्रीलंकेच्या हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली. संगकारालाच ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

2016 – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies)

कोलकाताच्या इडन गार्डनवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन टीम दुसऱ्या विजेतेपदासाठी एकमेकांसमोर होत्या. इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना जो रूटच्या (Joe Root) हाफ सेंच्युरीच्या जोरावर 155 पर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजची अवस्था 3 आऊट 11 अशी बिकट होती. त्यावेळी मार्लन सॅम्युअल्सनं ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) सोबत चौथ्या विकेटसाठी 75 रनची पार्टनरशिप करत मॅचमध्ये पुनरागमन केलं.  

वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 19 रनची गरज होती. त्यावेळी कार्लोस ब्रेथवेटनं (Carlos Braothwaite) बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) ओव्हरमध्ये सलग 4 सिक्स लगावत वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब (T20 WC Final Recap) केलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: