फोटो – ट्विटर, बीसीसीआय

टी20 वर्ल्ड कपची सुपर 12 फेरी (ICC T20 World Cup 2021, Super 12) सुरू होऊन आता एक आठवडा उलटला आहे. दुसऱ्या आठवड्यातील टीम इंडियाची महत्त्वाची लढत रविवारी (31 ऑक्टोबर) रोजी होत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुबईमध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही टीमनं पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणे त्यांच्यासाठी आवश्यक असेल. टीम इंडियाला न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी 5 पावलं उचलणं आवश्यक (5 Steps for Team India) आहे.

ड्रेसिंग रूमपासून सुरुवात

 चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 ची फायनल (Champions Trophy 2017 Final), वन-डे वर्ल्ड कप 2019 ची सेमी फायनल (Cricket World Cup 2019 Semi Final) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2021) या प्रत्येक वेळी टीम इंडियाला मैदानात ड्रेसिंग रूममधील अपुऱ्या तयारीचा फटका बसला. टॉसनंतरचा निर्णय, बॅटींग ऑर्डरचा क्रम, टीमची निवड हे घटक भारतीय टीमच्या पराभवातील अनेक कारणांपैकी काही कारणं आहेत.

या तीन पैकी दोन वेळा तर न्यूझीलंडनंच टीम इंडियाचा पराभव केला आहे. कोणतीही मोठी मॅच जिंकण्यासाठी मैदानात सर्वस्व देण्याबरोबरच मॅचपूर्वी ड्रेसिंग रूममधील तयारी देखील महत्त्वाची आहे. न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियानं ड्रेसिंग रूममधूनच चांगली तयारी करावी लागेल. सर्वोत्तम प्लेईंग 11 ची निवड हा ड्रेसिंग रुमच्या तयारीचा महत्त्वाचा भाग (5 Steps for Team India) आहे.

टॉप ऑर्डरची जबाबदारी

टीम इंडियाची बलाढ्य समजली जाणारी बॅटींग ऑर्डर ही रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर अवलंबून आहे. हे तिघंही जगातील अव्वल बॅटर आहेत. पण, त्यांची बॅटींग स्टाईल एकसारखीच आहे. या तिघांचाही स्ट्राईक रेट 140 च्या आसपास आहे.

या तिघांपैकी किमान एकानं पहिल्या 6 ओव्हरमधील पॉवर प्लेचा फायदा उठवण्यासाठी 170 च्या स्ट्राईक रेटनं खेळणे आवश्यक आहे. विशेषत: पहिल्यांदा बॅटींग आल्यावर सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन 200 च्या आसपास स्कोअर करण्यासाठी टॉप ऑर्डरनं आक्रमक खेळणे आवश्यक आहे.

मिडल ऑर्डर सुसाट

टीम इंडियाची टी20 क्रिकेटमधील खेळाची पद्धतही वन-डे क्रिकेटसारखीच आहे. इंग्लंडसारखी टीम पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळ करते. वेस्ट इंडिजनंही याच पद्धतीचा वापर करत दोन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय टीमचा आजही शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये जास्त रन करण्यावर भर असतो. विशेषत: सातव्या ओव्हरपासून 13-14 ओव्हरपर्यंत भारतीय टीम आक्रमक खेळत नाही हा अनुभव आहे. न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्यासाठी ही सवय मोडायला हवी.

मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे बॅटर  आहेत. हे सर्वजण आक्रमक खेळू शकतात. त्यांनी आक्रमक खेळल्याचं आपण आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही पाहिलं आहे. न्यूझीलंड विरुद्धही त्यांनी याच पद्धतीनं सुसाट बॅटींग करत केन विल्यमसनच्या टीमवर दबाव (5 Steps for Team India) वाढेल.

T20 World Cup 2021: प्रतिस्पर्धी टीममुळे नाही फक्त 5 सेकंदांमुळे टीम इंडियाची चॅम्पियनशिप धोक्यात!

पांड्याबाबत योग्य निर्णय

हार्दिक पांड्या मॅचविनर खेळाडू आहे, यात काहीही वाद नाही. पण त्याचा सध्याचा फिटनेस आणि फॉर्म हा काळजीचा विषय आहे. विशेषत:  तो बॉलिंग करु शकत नसेल आणि बॅटींगमध्ये लय नसेल तर त्याला टीममध्ये का घ्यावं हा प्रश्न आहे. हार्दिक पांड्याला खेळवणं हा प्रतिष्ठेचा किंवा भावनेचा मुद्दा न करत टीमची गरज ओळखून घ्यायला हवा. टीमच्या गरजेतूनच हार्दिकच्या जागी इशान किशन किंवा शार्दुल ठाकूरमध्ये कुणाची निवड करायची हे मॅनेजमेंटला ठरवावं लागेल.

बॉलर्सची मोठी भिस्त

कोणतीही टीम वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी त्यांच्या बॉलर्सची जबाबदारी महत्त्वाची असते. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाच्या बॉलर्सना एकही विकेट मिळाली नव्हती. या खराब मॅचच्या ओझ्याखाली न दबता त्यापासून बोध घेऊन सर्व बॉलर्सनी एकत्र कमबॅक करणे आवश्यक आहे.

न्यूझीलंड विरुद्धही टीम इंडिया 5 बॉलर्सच्या जीवावरच उतरण्याची दाट शक्यता आहे. या पाचही बॉलर्सना कोणत्या एकावर अतिरिक्त दबाव येणार नाही किंवा एखाद्याचा खराब दिवस असेल तर त्याला सांभाळून घेत बॉलिंग करावी लागेल. बॅटींगप्रमाणेच बॉलर्सचा दबदबाही संपूर्ण 20 ओव्हर राहिला तर न्यूझीलंडला पराभूत करणे अशक्य नाही.

विराटनं तोडलेली जोडीच टीम इंडियाला वाचवणार! न्यूझीलंडविरुद्ध ठरणार गेम चेंजर

हा T20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी कोणत्याही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानकडून पराभूत झाली नव्हती. यंदा हा इतिहास बदलला. त्याचबरोबर T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला आजवर एकदाही न्यूझीलंडला पराभूत करता आलेलं नाही. आता रविवारच्या मॅचमध्ये ही परंपरा तोडत नवा इतिहास रचण्याची संधी टीम इंडियाला आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट टीमनं या लेखात दिलेली 5 पावलं उचलावी (5 Steps for Team India) लागतील.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

   

error: