फोटो – ट्विटर

वन-डे वर्ल्ड कप सर्वाधिक 5 वेळा जिंकणाऱ्या, टेस्ट क्रिकेटवर एक दशकांपेक्षा जास्त राज्य केलेल्या ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपनं हुलकावणी दिली आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी ही टीम फॉर्मात होती. तेव्हा T20 रँकिंगमध्ये ही टीम 1 नंबर होती. कोरोना ब्रेकनंतर परिस्थिती बदलली आहे. ऑस्ट्रेलियानं सलग 5 टी20 सीरिज गमावल्या असून शेवटच्या 21 पैकी फक्त 6 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये खेळताना आरोन फिंच (Aaron Finch) टीमकडं उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त (T20 WC Australia Preview) आहेत.

ऑस्ट्रेलियाची बॅटींग पॉवर

ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन्सनी वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करत टीमला विजेतेपद मिळवून दिलं आहे. आरोन फिंचलाही (Aaron Finch) यंदा ती कामगिरी करावी लागेल. फिंचनं 76 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 37.46 च्या सरासरीनं 2,473 रन काढलेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 150.24  इतका आहे. तसंच क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रकारात सेंच्युरी करण्याची क्षमता असल्याचंही (3 सेंच्युरी) फिंचनं दाखवून दिलंय. पण, आशिया खंडात त्याची आकडेवारी साधारण आहे. (373 रन, 23.31 सरासरी आणि 124.33 स्ट्राईक रेट) त्यामुळे फिंचला या वर्ल्ड कपमध्ये ही आकडेवारी सुधारण्याचं उत्तर शोधावं लागेल.

ऑस्ट्रेलियाचा आणखी एक आक्रमक बॅटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यंदा फॉर्मात आहे. त्याची आशिया खंडातील सरासरी आणि स्ट्राईक रेट हा एकूण आकडेवारीपेक्षा जास्त आहे. यूएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) प्ले ऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, आरसीबीच्या टीममध्ये होतं तसं एबी डिव्हिलियर्सचं कव्हर मॅक्सवेलकडं नसेल. त्याच्या नंतरचे बॅटर्स T20 क्रिकेटमध्ये बेभरवशाचे असताना मॅक्सवेलला मुक्त खेळण्याचं ऑस्ट्रेलिया किती स्वातंत्र्य (T20 WC Australia Preview) देतं ते पाहावं लागेल.

T20 WC New Zealand Preview: फॉर्मातील टीमला विजेतेपदाचा चान्स!

ऑस्ट्रेलियाची बॉलिंग पॉवर

T20 क्रिकेटमध्ये 18.66 च्या स्ट्राईक रेटनं 148 विकेट्स घेणारा मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॉलर असेल. स्टार्कचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग पॉवरमधील (T20 WC Australia Preview) महत्त्वाचा घटक असेल. मोठ्या ब्रेकनंतर परत येणाऱ्या पॅट कमिन्सची (Pat Cummins) स्टार्कला साथ असेल. ऑस्ट्रेलियाची टीम 5 प्रमुख बॉलरसह मैदानात उतरली तर कमिन्सला 7 व्या क्रमांकावर येऊन परिस्थितीनुसार बॅटींग करण्याची अतिरिक्त जबाबदारी आहे.

जोश हेजलवूडच्या T20 क्रिकेटमधील बॉलिंगमध्ये अलिकडच्या काळात चांगली सुधारणा झालीय. याच पिचवर आयपीएल खेळल्यानं त्याच्याकडं अनुभव आणि आत्मविश्वास दोन्ही असेल. तर केन रिचर्डसनवर ऑस्ट्रेलियाला डेथ ओव्हर्समध्ये विसंबून राहावं लागेल.

बेस्ट फिल्डर

ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरचा यंदा आधार असलेला ग्लेन मॅक्सवेल हाच या टीमचा प्रमुख फिल्डर आहे. ग्राऊंड फिल्डिंग करताना मॅक्सवेलनं अनेक चांगल्या कॅच घेतल्या आहेत. तसंच तो मैदानातील सर्व भागात तितकीच चपळ फिल्डिंग करू शकतो.

X फॅक्टर

ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केल्यापासून दुखापतीमुळे आत-बाहेर असलेला मिचेल मार्श (Mitchell Marsh) हा या वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा X  फॅक्टर (T20 WC Australia Preview) आहे. मार्शनं वेस्ट इंडिज विरुद्च्या सीरिजमध्ये जोरदार खेळ केला होता. तो 3 ते 6 पैकी कोणत्याही नंबरला येऊन आक्रमक बॅटींग करु शकतो. तो चांगला खेळला मॅक्सवेलवरील मिडल ऑर्डरमधील भार कमी होणार आहे. त्याचबरोबर मार्कस स्टॉईनिस (Marcus Stonis) आयपीएल स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे किती ओव्हर बॉलिंग करेल हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे मार्श पाचव्या बॉलरचं कामही करू शकतो.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा व्हिलन ठरणार टीमचा आधार

ऑस्ट्रेलियाची अडचण

आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) या ओपनिंग जोडीवर ऑस्ट्रेलियाची मोठी मदार आहे. पण यापैकी फिंचचा फिटनेस आणि वॉर्नरचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी काळजीचा विषय आहे. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यूएईतील पिचवर स्पिन बॉलिंग चांगली खेळू शकतो. पण, अजूनही तो T20 क्रिकेटशी पूर्ण एकरूप झालेला नाही. त्यामुळे स्मिथ कोणत्या नंबरवर खेळणार हे अद्याप स्पष्ट नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार लवकर विकेट गेली तर स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आणि चांगली सुरूवात मिळाली तर पाचव्या किंवा त्या खालील नंबरवर स्मिथ येण्याची शक्यता आहे.

मिचेल मार्शच्या फॉर्ममुळे स्मिथ प्रमाणेच मॅथ्यू वेडची देखील अडचण झाली आहे. ऑस्ट्रेलियातील टॉप ऑर्डरमधील या प्लेयरला पाचव्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर खेळावं लागू शकतं. तसंच ऑस्ट्रेलियाची बिग फिनिशर म्हणून ज्याच्यावर आशा आहे त्या स्टॉईनिसची सुरुवातीला बॉल खाण्याची सवय टीमला अडचणीत आणू शकते. यूएईच्या पिचवर ऑस्ट्रेलियन प्लेयर्स स्पिन बॉलिंग कशी खेळतात यावरही त्यांचं बरंच भवितव्य अवलंबून असेल.

स्टार्क, कमिन्स, हेजलवूड आणि कमिन्स हे ऑस्ट्रेलियाचं फास्ट बॉलिंग युनीट दमदार आहे. पण हे चारही जण एकत्र किती मॅच खेळतील हा प्रश्न आहे. यापैकी स्टार्क ही पहिली पंसती असेल. कमिन्स आणि हेजलवूड या जोडीला रिचर्डसन ऐवजी पसंती दिली तर ऑस्ट्रेलियाची डेथ बॉलिंग उघडी पडू शकते. त्याचबरोबर झम्पा आणि अगर हे दोन स्पिनर्स कशी कमगिरी करतात हा देखील प्रश्न आहे.

ऑस्ट्रेलियाची मिचेल मार्श आणि स्टॉईनिस जोडीकडून पाचव्या बॉलरचा कोटा पूर्ण करण्याची अपेक्षा असेल. त्यांच्या ओव्हर्सही इंग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या लीग स्टेजमधील तगड्या प्रतिस्पर्धीसमोर महत्त्वाच्या ठरतील. या दोघांपैकी एकाला ड्रॉप केलं किंवा एक अनफिट झाला तर ऑस्ट्रेलियाच्या बॅटींगची डोकेदुखी वाढू शकते. जोश इंग्लिस हा T20 लीग गाजवलेला बॅटर ऑस्ट्रेलियाकडं (T20 WC Australia Preview) आहे, पण त्याला आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव नाही.

वेस्ट इंडिजचं वेळापत्रक

दिनांकप्रतिस्पर्धी टीम
23 ऑक्टोबरदक्षिण आफ्रिका
28 ऑक्टोबर A1 (पात्रता फेरीतील टीम)
30 ऑक्टोबरइंग्लंड
4 नोव्हेंबर B2 (पात्रता फेरीतील टीम)
6 नोव्हेंबरवेस्ट इंडिज

ऑस्ट्रेलियाची टीम:  एरोन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, मार्कस स्टॉईनिस, अ‍ॅस्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, मिचेन स्वेपनसन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा आणि जॉश इंग्लिस  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

       

error: