
T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा (Australia vs Pakistan) 5 विकेट्सनं पराभव केला. या सेमी फायनलवर बराच काळ पाकिस्तानचं वर्चस्व होतं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात त्यांचा विकेट किपर बॅटर मॅथ्यू वेडनं (Matthew Wade) मोलाची भूमिका बजावली. त्यानं फक्त 17 बॉलमध्ये नाबाद 41 रन काढले. पाकिस्तानचा प्रमुख बॉलर शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) 19 व्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स लगावत वेडनं ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानं संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा हिरो बनलेल्या मॅथ्यू वेडनं (Mathhew Wade Story) अनेक संकटांवर मात करत हा प्रवास पूर्ण केला आहे.
कॅन्सरवर मात
मॅथ्यू वेड 16 वर्षांचा होता तेव्हा त्याला एका फुटबॉल मॅचच्या दरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीचा उपचार करताना वेडला टेस्टीकुलर कॅन्सर (Testicular cancer) असल्याचं निदान झालं. 16 व्या वर्षी जीवघेणा आजार झाला तर कोणत्याही व्यक्तीला खूप मोठा धक्का बसणे हे स्वाभाविक आहे.
वेड हार मानणाऱ्यातील नव्हता. त्यानं केमोथेरिपीच्या मदतीनं कॅन्सरवर मात (Mathhew Wade Story) केली. ‘मला फुटबॉल मॅचच्या दरम्यान दुखापत झाली नसती तर कॅन्सर झाल्याचं वेळीच लक्षात आलं नसतं’, असं मत त्यानंतर त्यानं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं.
पाकिस्तानला पुन्हा भोवला M फॅक्टर, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक, VIDEO
सुतारकाम केलं
मॅथ्यू वेडनं 2011 साली वयाच्या 24 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममध्ये पदार्पण केलं. विकेट किपर आणि ओपनिंग बॅटर असलेल्या वेडकडं गिलख्रिस्टचा वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. पण त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीत सातत्य नव्हतं. त्यामुळे तो टीमच्या आत-बाहेर होता. फिंच आणि वॉर्नर ही जोडी लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून स्थिर झाल्यावर त्याला मिडल ऑर्डरला ढकलण्यात आलं.
बांगलादेश विरूद्ध 2017-18 साली झालेल्या सीरिजसाठी त्याची टीममध्ये निवड करण्यात आली नाही. त्यावेळी आपली क्रिकेट कारकिर्द संपली असं वेडला वाटलं. त्यावेळी त्यानं त्याच्या कुटंबाजी जबाबदारी पेलण्यासाठी सुतारकाम सुरू केलं. लोक त्याची या कामासाठी टिंगल करत पण, तो मागे हटला नाही. त्यानं चिकाटीनं सुतारकाम (Mathhew Wade Story) केलं. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो रन काढत होता. या वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड होईल अशी आशा देखील त्याला नव्हती. पण, नियतीच्या मनात वेगळं होतं. त्यामुळे वेडला संधी मिळाली.
रंगाधळ्या वेडनं तारे चमकवले
मॅथ्यू वेड (Color blind) हा रंगाधळा आहे. त्यामुळे त्याला रंगांमधील फरक नीट ओळखू येत नाही. डे-नाईट मॅचमध्ये त्याला यामुळे अधिक त्रास होतो कारण बॉलचा रंग ओळखण्यास त्याला यामध्ये अधिक त्रास होतो. या सर्व संकटानंतरही टीम अडचणीत असताना वेड मागे हटला नाही.
तो बॅटींगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 96 अशी नाजूक होती. त्यावेळी त्यानं सुरूवातीला शांतपणे खेळ करत मार्कस स्टॉईनिसला (Marcus Stoinis) जास्तीत जास्त स्ट्राईक दिली. त्यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये आफ्रिदीला सलग तीन सिक्स लगावत त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकवले. वेडच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया तब्बल 11 वर्षांनी T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये (Mathhew Wade Story) पोहचवलं आहे. आता फायनलमध्येही त्याच्याकडून अशाच सर्वोत्तम खेळीची अपेक्षा असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.