फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या मॅचचा दिवस आता जवळ येऊ लागलाय. दुबईमध्ये येत्या रविवारी त्यांची मॅच होणार आहे. दोन्ही देशांची या वर्ल्ड कपमधील ही पहिलीच मॅच असेल. टीम इंडियासाठी ही अन्य कोणत्याही एका मॅचप्रमाणेच मॅच असेल, असं कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) यापूर्वी स्पष्ट केलं आहे. पण पाकिस्तानची तशी परिस्थिती नाही. भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी त्यांच्या देशात मोठे-मोठे दावे केले जात आहेत. पण, नेहमीप्रमाणे पाकिस्तान पुन्हा एकदा हरले तर त्यांच्या देशातील अनेक टीव्ही आणि क्रिकेटपटूंचे करिअर धोक्यात येणार हे नक्की आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमवर याचा सर्वात जास्त दबाव (Babar Azam in Trouble) आहे.

कोचनंच दिली कबुली

पाकिस्ताननं हा वर्ल्ड कप किंवा किमान भारताविरुद्ची मॅच तरी जिंकण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) मोठ्या अपेक्षेनं एका दिग्गज परदेशी खेळाडूला बॅटींग कोच म्हणून आणलं आहे. त्याच पाकिस्तानच्या बॅटींग कोचनं म्हणजेच मॅथ्यू हेडननं (Matthew Hayden) कॅप्टन बाबर आझमवरील दबावाची कबुली दिली आहे.

पाकिस्तानी टीमचा बॅटींग सल्लागार म्हणून काम करत असलेल्या हेडननं या मोठ्या मॅचमध्ये चुका झाल्या तर त्याचा फटका बसणार असल्याचं सांगत या चुका टाळण्यासाठी कॅप्टनची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं. त्यानं नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेचं (IPL 2021) उदारण देत कॅप्टनचा रोल टीमसाठी किती महत्त्वाचा असतो हे सांगितलं आहे.

T20 World Cup 2021: भारताच्या मॅचपूर्वी पाकिस्तानात लाथाळी, माजी कॅप्टननं केला गंभीर आरोप

बाबरवर दबाव

‘आयपीएल स्पर्धेत धोनी आणि मॉर्गनची वैयक्तिक कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. पण, त्यांनी ज्या पद्धतीनं टीमचं नेतृत्व केलं, खेळाडूंना आणि स्वत:ला यूएईमधील परिस्थितीशी एकरूप केलं ती गोष्ट या दोन्ही टीम फायनलमध्ये जाण्यासाठी निर्णायक ठरली.

माझ्या मते आगामी मॅचमध्ये कॅप्टनसी ही सर्वात महत्त्वाची असेल. यूएईच्या वातावरणात टीमला कमीत कमी चुका कराव्या लागतील. कारण, त्या चुकांची शिक्षा मोठी असेल. मैदनातील परिस्थिती देखील तितकी सोपी नसेल. बाबर आझमला कॅप्टनसीबरोबरच ओपनिंगची अतिरिक्त जबाबदारी पार पाडायची आहे. त्याला टार्गेट (Babar Azam in Trouble) केलं जाईल. सर्वच टीम त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.’ असं हेडननं सांगितलं.

2 खेळाडूंची सर्वात जास्त दहशत

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममधील प्रत्येक खेळाडू हा मॅच विनर आहे. पण सध्या कोणत्या दोन भारतीय खेळाडूंची सर्वात जास्त दहशत पाकिस्तान टीममध्ये आहे त्यांची नावं देखील हेडननं यावेळी सांगितली. विशेष म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ही पारंपारिक नावं त्यानं यावेळी घेतली नाहीत.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट जवळून पाहणाऱ्या हेडननं पाकिस्तानला सर्वात मोठा धोका हा लोकेश राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा आहे, असं सांगितलं आहे. ‘मी राहुलची प्रगती जवळून पाहिली आहे. त्याचा T20 क्रिकेटमध्ये मोठा दबदबा आहे. त्याचा पाकिस्तानला मोठा धोका असेल. त्याचबरोबर ऋषभ पंत देखील कोणताही बॉलिंग अटॅक फोडून काढू शकतो,’ असं हेडननं मान्य करत पाकिस्तान टीममध्ये या दोघांची सर्वात जास्त दहशत असल्याची (Babar Azam in Trouble) कबुली दिली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: