फोटो – ट्विटर

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या 13 वर्षांमध्ये एक अलिखित नियम झाला आहे. टीम इंडिया खराब खेळायला लागली की अनेक फॅन्स इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेला जबाबदार धरतात. तर क्रिकेटपटू, बीसीसीआयचे अधिकारी पराभवाचं विश्लेषण करताना आयपीएल स्पर्धेबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. या T20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेवर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचा भारतीय टीमच्या कामगिरीवर किती परिणाम (IPL Affect T20I) होतो हे तपासणे आवश्यक आहे.

12 वर्ष जूनी गोष्ट

इंग्लंडमध्ये 2009 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2019) गतविजेती टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाऊ शकली नव्हती. त्या खराब कामगिरीनंतर बोलताना टीम इंडियाचे तेव्हाचे कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांनी आयपीएल स्पर्धेमुळे टीम इंडियाचे खेळाडू थकलेले होते. त्याचा परिणाम टीमच्या एनर्जीवर झाला हे मान्य केले होते. भारतीय क्रिकेट प्रशसानात काम करणाऱ्या एखाद्या जबाबदार व्यक्तीनं आयपीएल स्पर्धेबाबत दिलेली ही पहिली आणि शेवटची कबुली होती. कारण, बीसीसीआयच्या बड्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर कस्टर्न यांना आयपीएलबद्दल नकारात्मक बोलू नये अशी तंबी दिली होती.

2009 नंतर वर्षभरानी पुन्हा आयपीएल स्पर्धेनंतर लगेच वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कप झाला. त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अपयशी ठरली. त्या पराभवानंतर तेव्हाचा टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) खेळाडूंनी वर्क लोड प्रेशर व्यवस्थित हातळलं पाहिजे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, या आणि अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण, धोनी आयपीएलबद्दल काहीही बोलला नाही.

T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम

अन्य वर्ल्ड कपमध्ये काय झालं?

2012 चा T20 वर्ल्ड कप ऑक्टोबर महिन्यात झाला. त्यामुळे त्या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर कुणी आयपीएल स्पर्धेवर बोट दाखवलं नाही. 2014 साली आयपीएल स्पर्धेच्या आधी T20 वर्ल्ड कप झाला. तेव्हा टीम इंडिया फायनलपर्यंत गेली. 2016 साली देखील आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये आयपीएल स्पर्धेचा थकवा जाणवला (IPL Affect T20I) नाही.

अन्य खेळाडूंवर परिणाम का नाही?

जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये सर्व देशांचे टॉप खेळाडू खेळतात. त्यामुळे त्या खेळाडूंवर याचा परिणाम का होत नाही? भारतीय खेळाडूंनाच थकवा का जाणवतो? हा एक प्रश्न या संदर्भात नेहमी विचारला जातो. हा प्रश्न म्हणून बिनतोड वाटतो. पण, आयपीएलमधील परिस्थिती अधिक सखोल पाहिली तर यामधील नेमकं सत्य समजेल.

रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे टीम इंडियाचे टॉप बॅटर्स त्यांच्या आयपीएल टीममधील फक्त मुख्य खेळाडू नव्हते तर टीमचे कॅप्टनही होते. त्यांना फक्त एक प्लेयर म्हणून सर्व मॅच खेळायच्या नव्हत्या. तर जिथं प्रत्येक मॅच आणि विजेतेपद जिंकण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लागलीय, दबाव मोठा आहे, अशा परिस्थितीमध्ये कॅप्टनसी करायची होती. स्वत:चा खेळ आणि कॅप्टनसी दोन्ही गोष्टी त्यांच्या नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत पणाला लागल्या होत्या. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक थकव्यात होणे स्वाभाविक (IPL Affect T20I) आहे. विदेशी टीममधील सर्व प्रमुख खेळाडूंवर या प्रकारचे दडपण नव्हते.

इंग्लंडला दोनदा जमलं, टीम इंडियाला का जमत नाही?

यावर्षी परिस्थिती अधिक बिकट

टीम इंडियाचे सर्व प्रमुख खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत. इंग्लंड दौऱ्यातील हाय व्होल्टेज टेस्ट सीरिजनंतर लगेच त्यांना उर्वरित आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी उतरावं लागलं. त्यानंतर आठवडाभरातच T20 वर्ल्ड कप स्पर्धेत ते उतरले. अन्य कोणत्याही देशाच्या प्रमुख खेळाडूंनी गेल्या 4 महिन्यात इतकं सातत्यानं क्रिकेट खेळलेलं नाही.

इंग्लंडचे बटलर, मलान, बेअरस्टो, वोक्स हे खेळाडू यंदा यूएईमध्ये झालेलं आयपीएल खेळले नाहीत. जेसन रॉय, ख्रिस जॉर्डन मोजक्या मॅच खेळले. आदिल रशिद फक्त एक मॅच खेळला. तसंच रॉय, जॉर्डन हे टेस्ट सीरिजचा भाग नव्हते. मॉर्गन टेस्ट सीरिज खेळला नव्हता. तो केकेआरमध्ये फक्त कॅप्टन म्हणून खेळत होता. ऑस्ट्रेलियाचे स्मिथ, वॉर्नर हे आयपीएलपूर्वी झालेल्या बांगलादेश, वेस्ट इंडिज सीरिजमध्ये गेले नव्हते. ते आयपीएलमध्येही सर्व मॅच खेळले नाहीत. फिंच, कमिन्स, स्टार्क, झम्पा ही मंडळी आयपीएलचा भाग नव्हती. मॅक्सवेलला एबीडी आणि विराटचं कव्हर असल्यानं अतिरिक्त टेन्शन नव्हतं. दक्षिण आफ्रिकेचेही मोजकेच खेळाडू आयपीएलमध्ये खेळले. 

IPL चं यश फसवं!

आयपीएलवर सध्या टीका करणाऱ्या अनेक मंडळींचे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीमुळे डोळे दिपून गेलेले असतात. पण, आयपीएल टीमच्या प्लेईंग 11 मध्ये फक्त 4 खेळाडूच खेळतात ही गोष्ट ही मंडळी विसरतात. विदेशी टीमच्या सर्वात प्रबळ प्लेईंग 11 शी त्यांचा सामना होत नाही. आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे ग्रेट प्लेयर्स टीम इंडियाला आयपीएलमुळेच मिळाले आहेत. पण अन्य सर्व खेळाडू अगदी आजही आयपीएलच्या 14 सिझननंतर देशांतर्गत स्पर्धेत तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतरच टीम इंडियात आली आहेत, हे विसरता कामा नये.

IPL 2022 Retention Rules: कशा तयार होणार पुढील वर्षीच्या आयपीएल टीम? काय असतील नियम? वाचा सविस्तर

इंग्लिश फुटबॉल सारखी अवस्था

इंग्लिश प्रीमियर लीग ही फुटबॉल स्पर्धा जगातील सर्वात बलाढ्य प्रीमियर लीग आहे. जगातील शक्तीशाली, लोकप्रिय आणि मोठा ब्रँड असलेले फुटबॉल क्लब या स्पर्धा खेळतात. त्यांच्यात जगातील बलाढ्य खेळाडू आणि कोच यांना करारबद्ध करण्याची चढाओढ लागेली असते. ही सर्व मंडळी देखील या फुटबॉल लीगचा भाग होण्यासाठी आनंदानं तयार असतात. जगभरातील फुटबॉलपटू या लीगमध्ये खेळल्यानं त्यांच्या खेळाला फायदा झाल्याचं मान्य करतात. या सर्वांनंतरही इंग्लंडनं 1966 नंतर एकदाही फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेला नाही. इतकंच काय इंग्लंडला एकदाही युरो कप स्पर्धाही जिंकता आलेली नाही.

टीम इंडियानंही आयपीएल सुरू झाल्यानंतर एकदाही T20 वर्ल्ड कप जिंकलेला (IPL Affect T20I) नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: