T20 वर्ल्ड कपचे पडघम आता वाजू लागले आहेत. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची ही शेवटची T20 स्पर्धा आहे. या वर्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय टीमला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) देखील उपलब्ध असेल. हुशार रणनीतीकार म्हणून ओळखण्यात येणारा धोनी या वर्ल्ड कपमध्ये काय योजना करतो, याची मोठी उत्सुकता आहे. त्याचवेळी धोनीनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाची माहिती (Dhoni Charged Nothing) आता उघड झाली आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या वर्ल्ड कपसाठी मेंटॉर म्हणून धोनीकडं जबाबदारी आहे. तो हे काम मोफत करणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे. सध्या तो फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो.

टीमवर सकारात्मक परिणाम

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली त्याच दिवशी धोनीचीही मेंटॉर म्हणून नियुक्ती झाली. तो संपूर्ण वर्ल्ड कप काळात भारतीय ड्रेसिंग रूममध्ये असेल. या काळात तो टीमला मार्गदर्शन करणार आहे. अनुभवी धोनीची या स्पर्धेसाठी नियुक्ती (Dhoni Charged Nothing) ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे.

टीम इंडियानं यापूर्वी शेवटची आयसीसी स्पर्धा 2013 साली जिंकली आहे. त्यानंतर 2014 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये फायनल, 2015 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल, 2016 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनल, 2019 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा सेमी फायनलमध्ये भारतीय टीम पराभूत झाली. इतकंच नाही तर यावर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही टीम इंडियाला विजेतेपदानं हुलकावणी दिली होती.

T20 WC 2021: धोनीच्या निवडीपासून ते तो पुढील कोच होणार का? पर्यंतच्या सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं

दुष्काळ संपवण्यासाठी धोनी

आयसीसी स्पर्धेतील भारताचा हा दुष्काळ संपवण्यासाठी कॅप्टन विराट कोहलीच्या मदतीला मेंटॉर महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं 2007 साली T20 वर्ल्ड कप, 2011 साली वन-डे वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कॅप्टन (Dhoni Charged Nothing) आहे.

धोनीच्या याच अनुभवाचा विराट कोहलीला आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत फायदा होणार आहे. भारतीय टीमची या वर्ल्ड कपमधील पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

धोनीनं तरूणांना If he can, then I also can ही प्रेरणा दिली!

T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, इशान किशन, अक्षर पटेल आणि राहुल चहर  

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: