फोटो – ट्विटर, ब्लॅककॅप्स

आयसीसी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये हरणारी टीम अशी न्यूझीलंडची ओळख होती. गेल्या सहा वर्षांमध्ये या टीमनं ही ओळख बदलली आहे. 2015 आणि 2019 साली या टीमनं वन-डे वर्ल्ड कपमध्ये फायनल गाठली होती. यावर्षी त्याच्या एक पाऊल पुढे टाकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं (World Test Championship) विजेतेपद पटकावले. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) या टीममध्ये अनेक उपयुक्त खेळाडू असून गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या टीमला यंदा पहिल्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा (T20WC New Zealand Preview) चान्स आहे

न्यूझीलंडची बॅटींग पॉवर   

न्यूझीलंडचा T20 सुपरस्टार मार्टीन गप्टीलवर (Martin Guptill) न्यूझीलंडच्या बॅटींगची भिस्त असेल. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3 हजार रन करणारा दुसरा खेळाडू होण्यासाठी त्याला आणखी 61 रनची आवश्यकता आहे. या वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या 8 मॅचमध्ये 39.75 च्या सरासरीनं 318 रन करत गप्टीलनं आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलंय. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड असलेल्या गप्टीलला 150 चा टप्पा गाठण्यासाठी आणखी फक्त 3 सिक्सची आवश्यकता आहे.

गप्टीलप्रमाणेच कॅप्टन केन विल्यमसनवर (Kane Williamson) न्यूझीलंडची टीम बॅटींगमध्ये अवलंबून आहे. विल्यमसनचा T20 मधील रेकॉर्ड अन्य दोन प्रकाराइतका चांगला नाही. पण अनुभवी आणि शांत डोक्याचा विल्यमसन एका बाजूनं भक्कम उभा राहून टीमच्या इनिंगला आकार देऊ शकतो. आयपीएल स्पर्धेमुळे यूएईच्या पिचवर खेळण्याचा अनुभव विल्यमसनकडं आहे. त्याचा हा अनुभव न्यूझीलंडसाठी मोलाचा असेल. टीमची फसलेली गाडी बाहेर काढण्याची क्षमता विल्यमसनकडं (T20WC New Zealand Preview) आहे.

WTC 2021 : न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होण्याची 5 मुख्य कारणं

न्यूझीलंडची बॉलिंग पॉवर

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि लॉकी फर्ग्युसन (Lockie Fergusion) या फास्ट बॉलर्सच्या जोडीकडून न्यूझीलंडला मोठी आशा आहे. बोल्टसाठी आयपीएल सिझन साधारण ठरला.‘पॉवर प्ले’ मध्ये हमखास विकेट्स घेण्याचं त्याचं मॅजिक यंदा दिसलं नाही. तरीही न्यूझीलंडच्या या आघाडीच्या बॉलरला मोडीत काढण्याचं कोणतंही कारण नाही. महत्त्वाच्या विकेट्स घेऊन मॅच फिरवण्याची योग्यता बोल्टनं यापूर्वी दाखवून दिली आहे.

लॉकी फर्ग्युसननं या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) या बॉलरनं 8 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल फायनलमधील अपयश पुसण्याच्या निर्धारानं फर्ग्युसन मैदानात (T20WC New Zealand Preview) उतरेल. बोल्ट आणि फर्ग्युसनच्या जोडीला उंचापूरा कायले जेमिसन आणि अनुभवी फास्ट बॉलर टीम साऊदी देखील न्यूझीलंडच्या टीममध्ये आहे. तर इश सोधी, मिचेल स्टॅनर हे स्पिनर्स न्यूझीलंडकडं आहेत. यापैकी सँटनर उपयुक्त बॅटींग देखील करु शकतो.

VIDEO: पाकिस्तान घेणार इंग्लंड आणि न्यूझीलंडचा बदला! PCB अध्यक्षांची घोषणा

न्यूझीलंडच्या टीममधील सर्वच खेळाडू हे उत्तम फिल्डर आहेत. पण यापैकी एकाचं नावं घ्यायचं असेल तर मान निर्विवाद मार्टीन गप्टीलचा आहे. इनर सर्कल किंवा बाऊंड्री लाईन या दोन्ही ठिकाणी तो न्यूझीलंड टीमची वॉल आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये स्टीव्ह स्मिथचा त्यानं अफलातून कॅच घेतला होता. त्याच वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये निर्णयाक क्षणी महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni Run Out)  रन आऊट केलेल्या गप्टीलला कोणताही भारतीय फॅन्स विसरु शकणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वॉर्म अप मॅचमध्येही त्यानं डेव्हिड वॉर्नरचा सुरेख कॅच घेत आपल्या जवळ बॉल येऊ देऊ नका हा इशारा सर्व टीमना दिला आहे.

X Factor

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 वर्ष हे काही नवोदीत खेळाडूचं वय नाही. पण न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे (Devon Conway) त्याला अपवाद आहे. नोव्हेंबर 2020 मध्येच त्यानं आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर त्यानं या प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी केलीय. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची 59 बॉल 99 रन या इनिंगचा समावेश आहे.

कॉनवेचा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधला स्ट्राईक रेट हा 160 आहे. इंग्लंडमधील T20 ब्लास्टमध्ये त्यानं 8 मॅचमध्ये 43 फोर लगावले होते. गप्टील आणि त्याची जोडी पॉवर प्लेमध्येच समोरच्या टीमकडून मॅच हिसकावून (T20WC New Zealand Preview) घेऊ शकते.

न्यूझीलंडची अडचण

न्यूझीलंडच्या प्लेईंग 11 मधील काही मोजके अपवाद वगळले तर अन्य खेळाडूंना यूएईमध्ये अलिकडच्या काळात खेळण्याचा अनुभव नाही. या पिचशी ते किती लवकर जुळून घेतील यावर त्यांची वाटचाल अवलंबून असेल. न्यूझीलंडकडं ग्लेन मॅक्सवेल, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड यासारखा बिग फिनिशर नाही. जिमी निशमनं ते काम करावं अशी टीम मॅनेजमेंटची अपेक्षा आहे, पण त्याच्यात सातत्य नाही. कॉलीन मुन्रो, फिन एलन आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांची कमतरता न्यूझीलंडला जाणवू (T20WC New Zealand Preview) शकते.

न्यूझीलंडचं वेळापत्रक

दिनांकप्रतिस्पर्धी टीम
26 ऑक्टोबरपाकिस्तान
31 ऑक्टोबरभारत
3 नोव्हेंबर B1 (पात्रता फेरीतील टीम)
5 नोव्हेंबर A2 ( पात्रता फेरीतील टीम)
7 नोव्हेंबरअफगाणिस्तान

न्यूझीलंडची टीम :  डेव्हन कॉनवे, मार्टीन गप्टील, केन विल्यमसन (कॅप्टन), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅम्पमॅन, जिमी निशम, टीम सिफर्ट (विकेटकिपर), मिचेल स्टॅनर, टीम साऊदी, इश सोधी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, काईल जेमीसन आणि टॉड अ‍ॅस्टल  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: