
1992 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. 1999 किंवा 2009 सालाप्रमाणे ते विजेतेपदाचे प्रबळ दावेदार नाहीत. 2015 च्या वर्ल्ड कपसारखे त्यांच्या टीममध्ये सुपरस्टार्सचा भरणा नाही. वर्ल्ड कप स्पर्धांमधील नेहमीचा दबाव नसलेली दक्षिण आफ्रिका टीम (T20WC South Africa Preview) यंदा किती मोठा धमाका करणार यावर त्यांच्या देशाच्या क्रिकेटचं भवितव्य अवलंबून असेल.
दक्षिण आफ्रिकेनं या वर्ल्ड कपसाठी करारबद्ध खेळाडूंनाच घेण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. त्यामुळे आयपीएल स्पर्धा गाजवलेला फाफ ड्यू प्लेलिस (Faf Du Plessis), अनुभवी स्पिनर इम्रान ताहीर (Imran Tahir) आणि T20 स्पेशालिस्ट ख्रिस मॉरीस (Chris Moris) या फ्री लान्सर्सचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
टेम्बा बावूमा (Temba Bavuma) याच्या रूपाने पहिल्यांदाच एक ब्लॅक खेळाडू इतक्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत टीमचं नेतृत्त्व करतोय. सिया कोलिसी रग्बी टीमच्या पहिल्या ब्लॅक कॅप्टनच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेनं 2019 साली रग्बी वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाही असाच काहीसा चमत्कार घडेल, अशी अपेक्षा आफ्रिकेच्या कट्टर फॅन्सना आहे.
दक्षिण आफ्रिकेची बॅटींग पॉवर
क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) खांद्यावर आफ्रिकेच्या बॅटींगचा सर्वात मोठा भार असेल. 2016 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2016) आफ्रिकेच्या शेवटच्या तीन मॅचमध्ये त्यानं एक हाफ सेंच्युरी आणि दोनदा 40 पेक्षा जास्त रन काढले होते. एकूण T20 क्रिकेटमध्ये 7 हजारपेक्षा जास्त रन करण्याचा त्याच्याकडं अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला कमाल दाखवता आली नाही. पण दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना या वर्षात त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
एकेकाळी टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एडेन मार्कराम (Aiden Markram) हा आता T20 क्रिकेटमध्येही चांगलाच स्थिरावलाय. त्याचा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट 147.40 इतका असून त्याच्याकडं आफ्रिकेचा भावी कॅप्टन (T20WC South Africa Preview) म्हणून पाहिलं जात आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही खेळण्याचा त्याला अनुभव आहे. तसंच त्याची स्पिन बॉलिंगही टीमसाठी उपयुक्त आहे.
या दोघांशिवाय अनुभवी डेव्हिड मिलर (David Miller) आफ्रिकेच्या टीममध्ये आहे. आफ्रिकेच्या मिडल ऑर्डरला सावरण्याबरोबरच (Anchor Role) शेवटच्या ओव्हर्समध्ये मोठी फटकेबाजी करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पाकिस्तान विरुद्धच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये सेंच्युरी झळकावत आफ्रिकेला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला (Rassie van der Dussen) कमी लेखण्याची चूक टीम कोणतीही टीम करणार नाही. मिलरवरचा भार तो हलका करु शकतो.
T20 क्रिकेटमधील फास्ट सेंच्युरी, शून्यावर आऊट न होण्याचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेची बॉलिंग पॉवर
अनुभवी कागिसो रबाडा (Kagiso Rabada) हा आफ्रिकेचं मुख्य अस्त्र आहे. रबाडासाठी ही आयपीएल स्पर्धा साधारण गेली आहे. त्याचा इकोनॉमी रेट देखील वाढलाय. पण त्याच्या वेगाच्या जोरावर जगातील कोणत्या बॅटींग ऑर्डरला अस्थिर करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे. यूएईतील पिचवर त्याच्याकडं बॉलिंगचा मोठा अनुभव आहे. डेथ ओव्हर्समध्ये रबाडा आफ्रिकेचं हुकमी हत्यार असेल.
पहिल्या मॅचमध्ये हॅटट्रिक, शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीची विकेट आणि वर्ल्ड कप विजेतेपद
रबाडाचे साथीदार म्हणून एनरिक ऩॉर्खिया आणि लूंगी एन्गिडी हे फास्ट बॉलर या वर्ल्ड कपमध्ये खेळतील. नॉर्खियानं गेल्या काही वर्षात झपाट्यानं प्रगती केलीय. त्याच्याकडंही चांगला वेग आहे. इनिंगच्या सुरूवातीबरोबरच डेथ ओव्हर्समध्येही तो हल्ली चांगली बॉलिंग करतोय. तरबेज शम्सी आणि केशव महाराज हे स्पिनर्स आफ्रिकेकडून या वर्ल्ड कपमधील बहुतेक मॅच खेळतील.
बेस्ट फिल्डर
डेव्हिड मिलर हाच दक्षिण आफ्रिकेचा निर्विवाद बेस्ट फिल्डर आहे. बांऊड्री लाईनवर अनेक अवघड कॅच घेताना आपण त्याला पाहिलं आहे. मिलरनं पाकिस्तान विरुद्ध केपटाऊनमध्ये झालेल्या T20 मध्ये त्यानं निव्वळ फिल्डिंगच्या जोरावर ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळवला होता.
X फॅक्टर
इम्रान ताहीरचा वारसदार म्हणून पुढे आलेला तरबेझ शम्सी (Tabraiz Shamsi) हा आफ्रिकेचा या वर्ल्ड कपमधील X फॅक्टर (T20WC South Africa Preview) आहे. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर शम्सी आफ्रिकेच्या टीममध्ये स्थिरावलाय. सुरुवातीला रन रोखण्याचं काम करणारा शम्सी आता विकेट टेकिंग बॉलर बनलाय.
शम्सी या वर्षातील आंतराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर आहे. त्याच्याकडं स्टॉक बॉल आणि उत्तम गुगलीचा वापर करण्याची कला आहे. स्पिन बॉलिंग खेळणं अवघड जाणाऱ्या वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम आफ्रिकेच्या ग्रुपमध्ये आहेत. त्यांच्या बॅटर्सची शम्सीपुढे परीक्षा असेल.
दक्षिण आफ्रिकेची अडचण
क्विंटन डी कॉक यावर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2021) फारसा चमकला नाही. त्याला शेवटच्या दोन मॅचमध्ये बाहेर बसावं लागलं होतं. त्याचा बॅड पॅच कायम राहिल्यास आफ्रिका मोठी अडचणीत येऊ शकते. डेव्हिड मिलर देखील फॉर्मात नाही. या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये आफ्रिकेचे अन्य बॅटर्स अनअनुभवी आहेत. अनुभवी फॅफ ड्यू प्लेसिसकडं दुर्लक्ष करण्याचा फटका आफ्रिकेला बसू शकतो.
आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सपैकी एकानंही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या नाहीत. रबाडा फॉर्मात नाही. तसंच एन्गिडी अलिकडच्या काळात फार खेळलेला नाही. त्यामुळे नॉर्खियावर अतिरिक्त भार असेल.
T20 World Cup 2021 Afghanistan Preview: खचलेल्या देशाला उभारी देण्यासाठी क्रिकेटपटू करणार यत्न
दक्षिण आफ्रिकेची टीमवर प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये यंदा तरी वर्ल्ड कप जिंकू का? हे दडपण असे. यंदा या वर्ल्ड कपमध्ये आणखी खराब कामगिरी होणार नाही ना? याचं दडपण त्यांच्यावर आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी खराब कामगिरी केली होती. त्या वर्ल्ड कपनंतर आफ्रिकन क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली. यंदाही त्याची पुनरावृत्ती घडल्यास पुन्हा मोठे बदल अटळ आहेत. मात्र ‘आऊट ऑफ रडार’ असेलेली ही टीम सेमी फायनल आणि नंतर फायनलमध्ये पोहचली तर आफ्रिकन क्रिकेटला (T20WC South Africa Preview) पुन्हा एकदा चांगली कलाटणी मिळेल.
दिनांक | प्रतिस्पर्धी टीम |
23 ऑक्टोबर | ऑस्ट्रेलिया |
26 ऑक्टोबर | वेस्ट इंडिज |
30 ऑक्टोबर | A1 (पात्रता फेरीतील टीम) |
2 नोव्हेबर | बांगलादेश |
6 नोव्हेंबर | इंग्लंड |
दक्षिण आफ्रिकेची टीम: क्विंटन डी कॉक, टेम्बा बावूमा (कॅप्टन) एडेन मार्करम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासनेन, विआन मुल्डर, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिच नॉर्खिया, तरबेझ शम्सी, लुंगी एन्गिडी, रिझा हेंड्रीक्स, प्रिटोरियस आणि बुजोर्न फॉर्ट्यून
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.