फोटो – सोशल मीडिया

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली टीम इंडियाची ही शेवटची T20 स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर आपण T20 प्रकारातील कॅप्टनसी सोडणार असल्याचं विराटनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. या वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेचं विजेतेपद पटकावून विराटच्या T20 कॅप्टनसीचा शेवट गोड करण्याचं टीम इंडियाचं स्वप्न (Team India Championship Dream) आहे.

पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये झालेला 10 विकेट्सनं पराभव हा टीम इंडियाला चॅम्पियनशिपची वाटचाल सोपी नसल्याची जाणीव करुन देणारा आहे. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमला सुरुवातीला धक्का बसला आहे. पण, अजूनही टीमचं स्पर्धेतील आव्हान कायम आहे. टीम इंडियाच्या अजून 4 मॅच बाकी असून त्या जिंकल्या तर सेमी फायनलमध्ये प्रवेश नक्की आहे.

5 सेकंदांची गोष्ट भारी

भारतीय टीमला चॅम्पियनशिप जिंकण्याच्या मार्गात प्रतिस्पर्धी टीम आणि त्या टीममधील दिग्गज खेळाडूंचा अडथळा आहे. पण, तो प्रत्येक स्पर्धेत असतो. हा अडथळा पार केल्याशिवाय कोणत्याही टीमला वर्ल्ड चॅम्पियन होता येत नाही. याची टीम इंडियाला नक्की जाणीव आहे. पण, या गोष्टीच्या पलिकडं 5 सेकंदांची एक गोष्ट टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा (Team India Championship Dream) बनली आहे.

T20 World Cup 2021: टीम इंडियाला हवं तितकं ट्रोल करुन झालं असेल तर हे वाचा

कोणतीही मॅच सुरू होताना होणारा टॉस हा टीम इंडियाच्या स्वप्नातील मोठा अडथळा आहे. या वर्ल्ड कपमध्ये बहुतेक टीम या टॉस जिंकल्यानंतर थेट फिल्डिंग घेत आहेत. टॉस जिंकून फिल्डिंग घ्या आणि मॅच जिंका हाच विजयाचा कानमंत्र झाला आहे. टीम इंडियाचं या स्पर्धेतील केंद्र असलेल्या दुबईमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय कॅप्टननं घेतला आणि त्यानंतर मॅचही जिंकली. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात दुबईत झालेली मॅचही याला अपवाद नव्हती.

विराट कोहलीनंही केलं मान्य

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीनंही टॉस फॅक्टर मॅचवर परिणाम करणारा ठरला असल्याचं मान्य केलं होतं. ‘टॉस या स्पर्धेतील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मॅच सुरु असताना मैदानात दव पडलं तर पहिल्या हाफमध्ये जास्तीत जास्त रन करायला हवीत. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या हाफमध्ये पिच बॅटींगसाठी तितकं मदत करणारं नव्हतं. पण सेकंड हाफमध्ये पाकिस्तानची टीम बॅटींगला आली तेव्हा ते एकदम सोपं झालं. त्यामुळे पाकिस्तानच्या बॅटर्सना खेळणं एकदम सोपं झालं.’ असं विराटनं सांगितलं.

सेकंड हाफमध्ये काय होतो बदल?

क्रिकेट मॅच रात्री सुरू असताना मैदानात पडणारे दव हा निकालामध्ये मोठा फॅक्टर पडतो. यामुळे बॉल ओला होतो आणि बॉलर्सना विशेषत: स्पिनर्सना बॉलवर पकड मिळवणे अवघड होते तर बॉल व्यवस्थित बॅटवर येत असल्यानं बॅटर्सना खेळणे सोपे होते. दव पडल्यानं पिच आणखी फ्लॅट होते. त्यामुळे बॉलर्सना स्विंग आणि स्पिन करण्यात मदत होत नाही त्याचाही फायदा बॅटींग करणाऱ्या टीमला होतो.

विराटनं तोडलेली जोडीच टीम इंडियाला वाचवणार! न्यूझीलंडविरुद्ध ठरणार गेम चेंजर

ओला बॉल पकडणे आणि तो फेकणे हे फिल्डर्ससाठीही अनेकदा सोपे ठरत नाही. त्यामुळे जगातील बेस्ट फिल्डरलाही त्या परिस्थितीमध्ये 100 टक्के योगदान देणे शक्य होत नाही. त्याचा मोठा फटका सेकंड हाफमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला बसतो. या सर्व गोष्टींमुळे मॅच सुरू होण्यापूर्वी 5 सेंकंदामध्ये होणारा टॉस हा या स्पर्धेतील महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेत टीम इंडियाचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी (Team India Championship Dream) विराट कोहली ‘टॉस चा बॉस’ व्हावा अशी प्रार्थना भारतीय फॅन्सना करावी लागेल.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: