फोटो – ट्विटर, विराट कोहली

टीम इंडियानं या T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) शेवटची मॅच नामिबिया विरुद्ध खेळली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी चमत्काराची गरज होती. न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव करत तो चमत्कार होणार नाही, याची खबरदारी घेतली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची ही शेवटची T20 स्पर्धा होती. विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन (Team India Next Captain) कोण होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.

कोण होणार नवा कॅप्टन?  

T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनचं नाव विराटनं सांगितलं आहे. नामिबियाच्या मॅचपूर्वी (India vs Namibia) विराटनं या कॅप्टनचं नाव सांगितलं. ‘टीम इंडियाची कॅप्टनसी करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. मी नेहमीच माझं सर्वश्रेष्ठ योगदान दिलं. क्रिकेटमधील मोठ्या प्रकारावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी या छोट्या प्रकारातील कॅप्टनसी सोडत आहे. मला कॅप्टनपदाची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे.

आता पुढे जाण्याची वेळ आहे. या टीमला खूप पुढं नेण्याची गरज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या प्रकारावर लक्ष देत आहे. भारतीय क्रिकेटची जबाबदारी योग्य खांद्यावर आहे.’ असं विराटनं यावेळी सांगितलं. विराटनं एकप्रकारे रोहित शर्मा आता T20 प्रकारात टीम इंडियाचा नवा कॅप्टन असेल अशी घोषणा (Team India Next Captain) केली आहे.

विराटनं मांडली व्यथा

T20 कॅप्टन म्हणून शेवटच्या मॅचमध्ये विराटला टॉस जिंकण्यात यश आलं. हा टॉस जिंकल्यानंतर विराटनं त्याच्या मनातील मोठी व्यथा बोलून दाखवली. या स्पर्धेत टॉस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध मॅचमध्ये टॉस न जिंकणं टीम इंडियासाठी महाग पडलं, असं मत विराटनं व्यक्त केलं.

विराट कोहलीनं पाकिस्तान (India vs Pakistan) आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन्ही मॅचमध्ये टॉस गमावला होता. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींग करावी लागली. T20 वर्ल्ड कपमधील डे-नाईट मॅचमध्ये ड्यू फॅक्टर हा खूप मोठा घटक ठरला. भारताला पहिल्या दोन मॅचमध्ये याचा फटका बसला. पाकिस्ताननं 10 विकेट्सनं तर न्यूझीलंडनं 8 विकेट्नं टीम इंडियाचा पराभव केला. या दोन पराभवामुळे 2012 नंतर पहिल्यांदा ICC स्पर्धेची सेमी फायनल गाठण्यात टीम इंडियाला अपयश आलं.

T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम

विराटचा रेकॉर्ड

विराट कोहली 2017 साली T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन झाला. गेल्या 4 वर्षांमध्ये त्यानं 50 मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली. यामध्ये 30 मॅचमध्ये त्यानं विजय मिळवला. तर 16 मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. 2 मॅच टाय झाल्या. तर 2 मॅचचा कोणताही निकाल लागला नाही.

‘या’ 5 कारणांमुळे रोहित शर्मा ठरेल विराट कोहलीपेक्षा चांगला कॅप्टन!

विराटची जागा घेणारा रोहित शर्मा हा देखील एक अनुभवी आणि यशस्वी कॅप्टन आहे. रोहित शर्मा 2013 पासून IPL स्पर्धेतील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा कॅप्टन आहे. त्यानं या काळात पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आयपीएल इतिहासात आजवर एकाही कॅप्टनला 5 वेळा ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. T20 इंटरनॅशनलमध्ये रोहितनं आजवर 19 मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी (Team India Next Captain) केली आहे. यामध्ये 15 मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला असून 4 मॅच गमावल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: