फोटो – ट्विटर, आयसीसी

कायरन पोलार्ड (Kieron Pollard), ख्रिस गेल (Chris Gayle), ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) ही T20 क्रिकेटमध्ये धडका भरणारी फौज असलेली वेस्ट इंडिज टीम आता T20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2021) आऊट झाली आहे. 2012 साली झालेल्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup 2012 Final) श्रीलंकेला पराभूत करत वेस्ट इंडिज क्रिकेटचे T20 क्रिकेटमधील युग सुरू झाले होते. ते युग 2021 साली श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंच संपुष्टात आलं आहे. T20 क्रिकेट कोळून पिलेल्या वेस्ट इंडिजचं या वर्ल्ड कपमध्ये काय चुकलं? (Where West Indies Wrong) हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

बड्यांचा फ्लॉप शो

2012 साली कोलंबोमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये यजमान टीमला पराभूत केल्यानंतर गंगम स्टाईल नाच वेस्ट इंडिजच्या टीमनं केला होता. त्या टीममधील गेल, पोलार्ड, ब्राव्हो आणि रसेल ही मंडळी यंदाही या टीममध्ये होती. जगभरातील कोणत्या T20 लीगला पूर्णत्व या चार नावांशिवाय येत नाही. ही मंडळी त्यांच्या टीमचा आधार आहेत.

वेस्ट क्रिकेट बोर्डाशी मधील काळात बिनसल्यानं हे सर्व काही काळ त्यांच्या मुख्य टीमपासून दूर गेली होती. पण, 2018 साली वेस्ट इंडिज बोर्डात फेरबदल झाल्यावर त्यांनी यांना परत टीममध्ये सामावून घेतलं. पोलार्डला लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन केलं. ब्राव्हो 2019 साली रिटायरमेंटनंतर पुन्हा परतला. ख्रिस गेलनं त्याची रिटायरमेंट लांबवली. 42 वर्षांचा गेल या स्पर्धेतील सर्वात वयोवृद्ध खेळाडू होता. रसेल त्याचा फिटनेस आणि दुखापतीची पर्वा न करता ही स्पर्धा खेळला. तरीही ही टीम पहिल्या चार मॅचमध्ये त्यांच्यापेक्षाही खराब फॉर्म असलेल्या बांगलादेशवर (निसटता) विजय मिळवू (Where West Indies Wrong) शकली.

गेलनं 4 मॅचमध्ये मिळून 7.30 च्या सरासरीनं रन केले. फक्त 1 सिक्स मारला. पोलार्डलाही 50 रनचा टप्पा ओलांडता आला नाही. बांगलादेश विरुद्ध झगडणाऱ्या पोलार्डनं रिटायर हर्ट होत मैदान सोडलं होतं. रसेल तर 4 मॅचमध्ये फक्त 7 रन करू शकला. तर ब्राव्होनं 4 मॅचमध्ये रसेलपेक्षा थोडे जास्त म्हणजे 16 रन केले. श्रीलंकेविरुद्ध त्यानं 4 ओव्हर्समध्ये 42 रन दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटून दुसऱ्या मॅचमध्ये ब्राव्होनं त्याच्या कारकिर्दीतील तिसऱ्या क्रमांकाचा खराब स्पेल टाकला.

मलिंगाला वर्ल्ड कप फायनलमध्ये पाच सिक्स मारणारा बॅट्समन!

बॉलर्सचं अपयश

वेस्ट इंडिजच्या दोन वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये त्यांच्या वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅकचा वाटा होता. सॅम्यूअल बद्रीनं दोन्ही वर्ल्ड कपमध्ये पॉवर प्ले मध्ये जखडून ठेवणारी बॉलिंग केली. त्याला 2012 साली सुनील नरीननं तर 2016 साली सुलेमान बेननं उत्तम साथ दिली. यंदा स्पिन बॉलिंगमध्ये फिन एलनकडून वेस्ट इंडिजला आशा होत्या. पण, तो स्पर्धेपूर्वीच जखमी झाला. त्याच्या जागी आलेला सीपीएल स्टार अकील हुसेन या स्पर्धेत प्रभाव पाडू शकला नाही.

सीपीएलच्या कामगिरीवरच रवी रॉमपॉलला बऱ्याच वर्षांनी पुन्हा संधी देण्याचा जुगार फसला. ब्राव्हो 2016 साली सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्याला या स्पर्धेत बेस्ट कामगिरी सोडा नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत केली तितकीही कामगिरी (Where West Indies Wrong) करता आली नाही. 2016 साली डॅरेन सॅमी आणि कार्लोस ब्रेथवेट ही जोडी देखील बॉलिंगमध्ये उपयुक्त ठरली होती. वेस्ट इंडिजच्या बॉलर्सनी या स्पर्धेतील पहिल्या 4 मॅचमध्ये फक्त 14 विकेट्स घेतल्या. सुपर 12 मध्ये खेळणाऱ्या टीममध्ये या यादीत त्यांचा क्रमांक शेवटचा आहे.

बेभरवशाचे वेस्ट इंडिज फॅन्सचा ‘विश्वास’ सार्थ ठरवणार?

आता पुढे काय?

डॅरेन ब्राव्हो आता रिटायर होत आहे.ख्रिस गेलचं पुढचा T20 वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. रसेलचा फिटनेस पाहात त्याचा पर्याय वेस्ट इंडिजला लवकरच शोधावा लागेल. वेस्ट इंडिजकडं पोलार्डसारखा हुशार कॅप्टन आहे. निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायर हे नवे खेळाडू वेस्ट इंडिजचं भविष्य आहेत. त्यांनी या वर्ल्ड कपमध्ये काही चांगल्या इनिंग खेळल्या आहेत.

आक्रमक बॅटर्सची वेस्ट इंडिजकडं कमी नाही. ती त्यांची नैसर्गिक शैली आहे. ऑस्ट्रेलियन पिचवर जिथं बॉल यूएईपेक्षा व्यवस्थित बॅटवर येतो तिथं ही बॅटींग चालेल देखील. पण, वेस्ट इंडिजच्या बॉलिंगचे काय? सुनील नरीन नंतरचा बेस्ट स्पिनर अजूनही वेस्ट इंडिजला सापडलेला नाही. ब्राव्हो रिटायर होत असल्यानं त्यांची आधीच लंगडी असलेली बॉलिंग आणखी खाली बसणार आहे.

वेस्ट इंडिजचा टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमधला सुवर्ण काळ आता ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमा इतका जुना झाला आहे. T20 या क्रिकेटच्या एकाच प्रकारात या टीमचा सध्या जगभरात दबदबा आहे. हा दबदबा कायम टिकवायचा असेल तर वेस्ट इंडिजला प्रत्येक मॅचमध्ये 10 विकेट्स घेणारे बॉलर्स आणि लहरीपणे नाही तर सातत्यानं रन करणारे बॅटर्स शोधावे लागतील. तसं झालं तरच अनेक क्रिकेट फॅन्सची हळवी बाजू असलेली वेस्ट इंडिजच क्रिकेट टीमची T20 प्रकारात होणारी घसरण (Where West Indies Wrong) थांबेल.    

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: