फोटो – ट्विटर, स्टार स्पोर्ट्स तामिळ

2012 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2012) पहिल्यांदाच टीम इंडिया आयसीसी स्पर्धेची सेमी फायनल गाठू शकली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेली ही टीम कागदावर प्रचंड बलवान होती. या टीममधील प्रत्येक खेळाडू मॅच विनर होता. तरीही टीम इंडियाला सेमी फायनलपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. टीम इंडियाच्या या अपयशाची 5 मुख्य कारणं (Why Team India Failed) आहेत.

कमकुवत बाजू लवकर उघड

कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळताना समान शक्तींच्या टीममध्ये जी टीम आपली कमकुवत बाजू झाकू शकते, ती टीम यशस्वी होते. भारतीय टीमनं निवड करताना हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेस किंवा फॉर्म न पाहता जुन्या लौकिकावर जास्त विश्वास ठेवला. हार्दिकमुळे टीमचं संतुलन बिघडणार हे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माहिती होतं. पहिल्या दोन मॅचमध्ये ते उघड झालं.

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्येही तोच प्रकार घडला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना न्यूझीलंड विरुद्ध लेग स्पिनर्सनी रोखलं. पाकिस्तान विरुद्ध शाहिन आफ्रिदीनं पॉवर प्ले मध्ये धक्के दिले. भारतीय बॅटींग टॉप ऑर्डरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होती. यापूर्वी स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात टॉप ऑर्डर दगा देत असे. यंदा पहिल्या दोन मॅचमध्येच त्यांनी दगा दिला.

स्वत:वरचा विश्वास उडाला

पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमधील पराभवानंतर टीम मॅनेजमेंटचा विश्वास डळमळीत झाला. त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध बॅटींग ऑर्डरमध्ये बदल केले. रोहित आणि विराट यांच्या बॅटींगचे नंबर्स बदलले. त्यांची ही चाल अंगलट (Why Team India Failed) आली. रोहित शर्मावर टीम मॅनेजमेंटचा विश्वास नाही का? असा प्रश्न गावसकर यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचनंतर विचारला होता. रोहित आणि विराट हे सुरूवातीला सेट होण्यासाठी थोडा वेळ घेणारे बॅटर्स मधल्या ओव्हर्समध्ये एकत्र आले. त्यांची स्पिनर्सनी घुसमट केली आणि टीम इंडियाचा श्वास कोंडला.

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम

बॉलर्सची अयोग्य निवड

दीपक चहरची (Deepak Chahar) राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. त्यातच भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आऊट ऑफ फॉर्म होता. मोहम्मद शमी आता ‘पॉवर प्ले’ बॉलर फारसा राहिलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या 6 ओव्हर्समध्ये बुमराहवरच अवलंबून राहावं लागलं. बुमराही पाकिस्तान विरुद्ध फेल गेला. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये एकही विकेट मिळाली नाही. न्यूझीलंड विरुद्ध कमी स्कोअरचं संरक्षण करतानाही पॉवर प्लेमध्ये भारतीय बॉलर्सना कमाल करता आली नाही. पहिल्या दोन मोठ्या मॅचमध्ये सुरूवातीच्या ओव्हर्समधील अपयश हे देखील टीम इंडियाच्या अपयशाचं एक मुख्य कारण (Why Team India Failed) आहे.

स्पिनर्सची साथ नाही

दक्षिण आफ्रिकेचा शम्सी, श्रीलंकेचा हसरंगा, ऑस्ट्रेलिया झम्पा, या लेग स्पिनर्सनी मैदान गाजवले. त्यावेळी भारतीय टीमला अशा हुकमी लेग स्पिनर्सची कमतरता जाणवली. गेली काही वर्ष टीम इंडियाकडून सातत्यानं खेळणाऱ्या युजवेंद्र चहलची वर्ल्ड कपसाठी निवड झालीच नाही. त्याच्या जागी निवडण्यात आलेल्या राहुल चहरला पहिल्या 4 मॅचमध्ये एकदाही संधी मिळाली नाही.

वरुण चक्रवर्तीकडून खूप अपेक्षा होत्या. इतरांसाठी सरप्राईज पॅकेज म्हणून निवडण्यात आलेला वरूण टीम इंडियासाठीच सरप्राईज ठरला. वरुणवर पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या विकेट्स घेण्याची जबाबदारी होती. त्याला स्कॉटलंडविरुद्धही विकेट मिळाली नाही. अश्विनला तिसऱ्या मॅचमध्ये पहिल्यांदा उतरवण्यात आलं. जडेजानंही स्कॉटलंड विरुद्ध चांगली बॉलिंग केली, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

अनलकी विराट

विराट कोहलीचं टॉस हरण्याचं सातत्य या स्पर्धेतही कायम होतं. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही महत्त्वाच्या मॅचमध्ये विराट टॉसच्या बाबतीत दुर्दैवी ठरला. या वर्ल्ड कपमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदी फिल्डिंग घेणे हा विजयाचा पाया भरणारी गोष्ट ठरत होती. विराट त्याबाबतीत अपयशी ठरला.

प्रतिस्पर्धी टीममुळे नाही फक्त 5 सेकंदांमुळे टीम इंडियाची चॅम्पियनशिप धोक्यात!

मैदानातील ड्यू फॅक्टरचा परिणाम टीम इंडियाच्या बॉलिंगवर झाला. पहिल्या इनिंगमध्ये पिचकडून मिळाणारी मदत भारतीय बॉलर्सना दोन्ही महत्त्वाच्या मॅचमध्ये मिळाली नाही. मॅचचा निकाल ठरवणारी एक मोठी गोष्ट महत्त्वाच्या टीम इंडियाच्या विरोधात गेल्याचा फटकाही (Why Team India Failed) टीम इंडियाला या स्पर्धेत बसला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: