फोटो – ट्विटर/@SkyCricket

टीम इंडियाचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्यासाठी 2020 हे वर्ष खराब होतं. तो 2021 मध्ये याची भरपाई करतोय. या वर्षाच्या सुरुवातीला पंतच्या खेळामुळे भारतानं सिडनी टेस्ट वाचवली. ब्रिस्बेन टेस्ट जिंकून टीम इंडियानं इतिहास रचला. त्यानंतर तो आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ बनला. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाली त्यावेळी पंतच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)  ही टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर होती. आता नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकींगमध्ये पंतनं रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड आजवर एकाही भारतीय विकेटकिपर – बॅट्समनला (Pant ICC Ranking) आजवर जमलेला नाही.

धोनीला जमलं नाही ते केलं

आयसीसीनं बुधवारी (5 मे) टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये ऋषभ पंत हा सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या विकेटकिपर – बॅट्समनचा ICC टेस्ट रँकिंगमधील टॉप 10 मध्ये समावेश होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ताज्या रँकिंगनुसार पंत 747 पॉईंट्सह सहाव्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि विकेट किपर-बॅट्समन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं यापूर्वी ICC टेस्ट रँकिंगमध्ये 19 व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. कोणत्याही भारतीय विकेटकिपर बॅट्समनची ती सर्वोच्च रँकिंग होती. पंतनं वयाच्या 23 व्या वर्षीच आणि अडीच वर्ष टेस्ट क्रिकेट खेळून हा विक्रम (Pant ICC Ranking) मोडला आहे. पंतनं आजवर 20 टेस्टमध्ये 45.26 च्या सरासरीनं 1358 रन काढले आहेत. यामध्ये 3 सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

‘या’ दोन जबरदस्त खेळीमुळे ऋषभ पंत ठरला पहिला ‘ICC Player of the month’

टॉप 10 मध्ये 3 भारतीय

आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार टॉप 10 मध्ये ऋषभ पंतसह तीन भारतीय बॅट्सनचा समावेश आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) 814 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) ऋषभ पंत आणि न्यूझीलंडच्या हेन्री निकोलससह 747 पॉईंट मिळवत संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या, मार्नस लाबुशेन तिसऱ्या तर इंग्लंडचा कॅप्टन जो रुट चौथ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम 9 व्या क्रमांकावर असून डेव्हिड वॉर्नर 10 व्या क्रमांकावर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: