फोटो – ट्विटर

अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) स्पर्धेचं काऊंट टाऊन सुरू झाले आहे. वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. टीम इंडिया ही या स्पर्धेतील सर्वात यशस्वी टीम आहे. भारतीय टीमनं आजवर 4 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. विराट कोहली (Virat Kohli) , रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन्ही कॅप्टनसह अनेक स्टार बॅटर या स्पर्धेनं टीम इंडियाला दिले आहेत. टीम इंडियाच्या कोणत्या 4 बॅटरवरच्या खांद्यावर यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी आहे (4 U19 Indian Batter To Watch) ते पाहूया

यश ढूल

मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ या वर्ल्ड कप विजेत्या 4 भारतीय कॅप्टनच्या रांगेत जाण्याची यश ढूल (Yash Dhull) याला संधी आहे. दिल्लीकर यशनं अगदी लहान वयापासून सातत्याने वेगवेगळ्या देशांतर्गत स्पर्धेत रन केले आहेत. संयमी खेळी करण्याबरोबरच काही क्षणात आक्रमक खेळी करत मॅचचं चित्र बदलण्याची त्याची क्षमता आहे.

यशने 16 वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीची कॅप्टनसी करत पंजाब विरुद्ध नाबाद 186 रन केले होते. त्यानंतर विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत 302 रन (75 सरासरी) आणि चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत 168 रन (56  सरासरी) त्याने काढले होते. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून त्याने आशिया कप स्पर्धेत सर्वांना प्रभावित (4 U19 Indian Batter To Watch)  केले आहे. यशची ऑफ स्पिन बॉलिंग ही टीमसाठी उपयुक्त आहे. यशला बॅटर म्हणून आशिया कप स्पर्धा साधारण गेली होती. पण वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वॉर्मअप मॅचमध्ये त्याने हाफ सेंच्युरी झळकावत स्पर्धेपूर्वी  फॉर्मात परतल्याचे संकेत दिले आहे.

U19 World Cup: लॉर्ड्सवर विजय ते देश सोडण्याची वेळ वर्ल्ड कप विजेते कॅप्टन सध्या काय करतात?

एसके रशिद

आंध्र प्रदेशचा एसके रशिद (SK Rashid) या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. रशिद फक्त 17 वर्षांचा आहे. त्याने इतक्या कमी कालावधीत ज्युनिअर क्रिकेटमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे. रशिदने विनू मंकड स्पर्धेत 100  पेक्षा जास्त सरासरीने 805 रन काढले आहेत. रशिद आशिया कप स्पर्धेत सुरुवातीला अपयशी ठरला. पण त्याने सेमी फायनल आणि फायनलमध्ये अनुक्रमे नाबाद 90 आणि नाबाद 31 रनची महत्त्वाची खेळी केली.

रशिदने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वॉर्म अप मॅचमध्येही 74 बॉलमध्ये 72 रनची खेळी केली आहे. बॅटींग ऑर्डरमध्ये नंबर 3 वर खेळणाऱ्या रशिदवर कॅप्टन यशसह मिडल ऑर्डरची जबाबदारी (4 U19 Indian Batter To Watch) आहे.

हरनूर सिंग

पंजाबमधील जालंधरचा असलेला हरनूर सिंग (Harnoor Singh)  टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर आहे. त्याचे वडिल पंजाबकडून अंडर 19 तर आजोबा आणि काका रणजी क्रिकेट स्पर्धा खेळले आहेत. 2018 साली झालेल्या विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत त्याने 400 रन करत पंजाबच्या विजेतेपदात महत्त्वाचे योगदान दिले होते. तर चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत चार पैकी 3 इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावत त्याने वर्ल्ड कप टीममधील जागा नक्की केली.

आशिया कप स्पर्धेत हरनूरनं पहिल्याच मॅचमध्ये यूएई विरुद्ध 120 रनची खेळी केली होती. त्याने स्पर्धेत 251 रन करत ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वॉर्मअप मॅचमध्येही हरनूरने सेंच्युरी (4 U19 Indian Batter To Watch) झळकावली आहे.

युवराज सिंहला शिष्यानं दिली वाढदिवसाची भेट, 17 फोर आणि 9 सिक्ससह काढले 169 रन

अंगक्रिश रघुवंशी

मुंबईकर अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) देखील हरनूर प्रमाणे खेळाडूंच्या कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांनी टेनीस तर आईने व्हॉलीबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मुंबईचा क्रिकेटपटू साहिल कुकरेजा त्याचा भाऊ (Nephew) आहे. साहिलमुळेच त्याला मुंबईकर ऑल राऊंडर अभिषेक नायरच्या (Abhishek Nair)  मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवता आले आहेत.

अंगक्रिश देखील रशिद प्रमाणे 17 वर्षाचा आहे. त्याने आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध 67 बॉलमध्ये नाबाद 56 रनची खेळी (4 U19 Indian Batter To Watch) केली होती. तो पूर्ण भरात खेळत असेल तर त्याच्यात तरुणपणीच्या रोहित शर्माचा (Rohit Sharma) भास होतो असे मत मुंबईच्या अंडर 19 टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष अतुल रानडे यांनी व्यक्त केले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.