फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलध्ये (U19 World Cup 2022) दाखल झाली आहे. आता फायनलमध्ये भारतीय टीमची लढत इंग्लंडशी (India U19 vs England U19) होणार आहे. दोन्ही टीमनं या संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच गमावलेली नाही. भारतीय टीम सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झाली आहे. तर इंग्लंडनं 24 वर्षांनी प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेत 1998 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्या वर्ल्ड कप टीममध्ये ग्रॅमी स्वान, ओवेस शहा हे स्टार खेळाडू इंग्लंडला मिळाले. आता यंदाच्या फायनलमध्ये इंग्लंडचे 4 खेळाडू (England U19 Key Players) भारतीय वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये अडथळा ठरू शकतात.

टॉम प्रेस्ट (Tom Prest)

इंग्लंडच्या टीमचा कॅप्टन असलेल्या टॉम प्रेस्टच्या खेळावर कॅप्टनसीच्या ओझ्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. कॅनडा विरूद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये 93 रनची खेळी करत त्यानं इंग्लंडला 106 रननं पहिला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत टॉम इतक्यावरच थांबला नाही.

दोनच दिवसांनी यूएई विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये टॉमनं 119 बॉलमध्ये 13 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं नाबाद 154 रनची मोठी खेळी केली होती. भारताच्या राज बावानं (Raj Bawa) युगांडाविरूद्ध 162 रन करत या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली आहे. आता फायनलमध्ये पुन्हा एकदा टॉम मोठी खेळी करत (England U19 Key Players) इंग्लंडला 24 वर्षांनी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जेकब बेथेल (Jacob Bethell)

वॉरविकशायरच्या या तरूण क्रिकेटपटूच्या उदयानंतर इंग्लंडचा टेस्ट क्रिकेटपटू इयान बेलला इयान बेलला (Ian Bell) टीममधील त्याची जागा गमावावी लागली. त्यानंतर बेलनं निवृत्त होतानाही बेथेलची प्रशंसा केली होती. 17 व्या वर्षीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या बेथेलनं या वर्ल्ड कपमध्ये ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली आहे.

बांगलादेश विरूद्ध मिळवलेल्या विजयात बेथेलनं इंग्लंडकडून सर्वाधिक 44 रन केले होते. त्याने यूएई विरूद्ध झटपट 62 रन करत इंग्लंडला आक्रमक सुरूवात करून दिली. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध फक्त 42 बॉलमध्ये 88 रन करत इंग्लंडच्या विजयाचा पाया बेथेलनं रचला होता.

टीम इंडियाची फायनलमध्ये ‘यश’स्वी धडक, ऑस्ट्रेलियाचा केला मोठा पराभव

जोश बोयडेन (Josh Boyden)

इंग्लंडच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरनं प्रत्येक मॅचमध्ये सुरूवातीला विकेट्स घेतल्या आहेत. जोश बायडेन हा या स्पर्धेतील फायनलपर्यंतचा इंग्लंडचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. त्याने 5 मॅचमध्ये 3.17 च्या इकोनॉमी रेटनं 13 विकेट्स घेतल्या आहेत.

बांगलादेश आणि कॅनडा विरूद्धच्या मॅचमध्ये प्रत्येकी 4 विकेट घेणाऱ्या बोयडेननं दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन्ही ओपनर्सना झटपट आऊट करत इंग्लंडला मॅचमध्ये आघाडी (England U19 Key Players) मिळवून दिली होती. त्याच्यापासून भारतीय टॉप ऑर्डरला सावध राहावे लागेल.

फायनलमधील पहिली टीम ठरली! रंगतदार लढतीत ठरला इंग्लंड-अफगाणिस्तानमधील विजेता

रेहान अहमद (Rehan Ahmed)

रेहान अहमद या इंग्लंडच्या लेग स्पिनरनं वयाच्या 13 व्या वर्षीच लॉर्ड्सवर नेट प्रॅक्टीसमध्ये बेन स्टोक्सला (Ben Stokes) बोल्ड करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. रेहानवर तेव्हापासून इंग्लिश मीडियाचा फोकस आहे. तो देखील सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याच्यातील गुणवत्तेला न्याय देत आहे.

रेहानला या स्पर्धेतील पहिल्या दोन मॅचमध्ये संधी मिळाली नाही. यूएई विरूद्धच्या त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये 4 विकेट घेत त्याने टीममधील जागा बळकट केली. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या क्वार्टर फायनलमध्येही त्याने 48 रन देत 4 विकेट्स घेतल्या. रेहानच्या स्पिन बॉलिंगमुळेच दक्षिण आफ्रिकेची इनिंग 3 आऊट 117 वरून 209 रनवर संपुष्टात आली.

रेहान सेमी फायनलमध्येही इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मॅचमधील अत्यंत अटीतटीच्या वेळी शेवटून दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट्स घेत इंग्लंडच्या विजयाचा दरवाजा उघडला. रेहाननं आत्तापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये 3 मॅच खेळल्या असून प्रत्येक मॅचमध्ये 4 विकेट्स अशा एकूण 12 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडच्या मुख्य टीमच्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या रेहानला फायनलमध्ये सांभाळून (England U19 Key Players) खेळावं लागणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: