फोटो- ट्विटर, आयसीसी

टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये (India U19 WC Final) सलग चौथ्यांदा प्रवेश केला आहे. कॅप्टन यश ढूलची (Yash Dhull) सेंच्युरी, व्हाईस कॅप्टन शेख रशिदचे (Shaik Rasheed) 94 रन यांनी या विजयाचा पाया रचला. त्यानंतर भारतीय स्पिनर्सनी ऑस्ट्रेलियाची अवस्था 1 आऊट 71 वरून 7 आऊट 125 अशी केली. ऑस्ट्रेलियानं शेवटी प्रतिकार केला. पण, तोपर्यंत भारताचा विजय ही औपचारिकता उरली होती. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India U19 vs Australia U19) 96 रननं दणदणीत पराभव केला. भारताने सलग तिसऱ्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढलं आहे. आता फायनलमध्ये आपली लढत इंग्लंडशी होईल.

खराब सुरूवात, सावध प्रतिकार

भारतीय टीमला हा विजय सहज मिळाला नाही. कॅप्टन यशनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात खराब झाली. अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) फक्त 6 रनवर आऊट झाला. त्यानंतर हरनूर सिंग (Harnoor Singh) देखील 12 रन काढून परतला. त्यावेळी 12.3 ओव्हर्सनंतर भारताची अवस्था 2 आऊट 37 अशी होती. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी भारतीय इनिंगला चांगलेच जखडून ठेवले होते.

टीम अडचणीत होती त्यावेळी यश आणि रशिद ही कॅप्टन-व्हाईस कॅप्टन जोडी मैदानात एकत्र आली. कोरोना ब्रेकनंतर परतलेल्या या दोघांचीही स्पर्धेतील तिसरीच मॅच होती. त्यांनी कोणताही धोका न पत्कारता पुढील 15 ओव्हर्स मोठ्या इनिंगचा पाया रचण्यासाठी खेळून काढली. भारताने 28 व्या ओव्हरमध्ये 100 रन पूर्ण केले. टीमनं शंभरी ओलांडताच यशनं गिअर (India U19 WC Final) बदलला.

U19 World Cup: 4 भारतीय बॅटर जे होतील उद्याचे रोहित आणि विराट

विराट, उन्मुक्त आणि यश!

यश ढूलनं 64 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. 29 व्या ओव्हरपासून यशनं मैदानातील गॅपचा योग्य वापर करत फोरच्या मदतीनं रन काढण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे भारताने 36 व्या ओव्हरमध्येच 150 चा टप्पा ओलांडला. यश-रशिद जोडीनं योग्य वेळी एकेरी-दुहेरी रन करत ऑस्ट्रेलियन फिल्डर्सवर प्रेशर वाढवले. त्या प्रेशरमध्ये त्यांनी काही चुका देखील केल्या. रशिदनं 78 बॉलमध्ये त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

रशिदनंही हाफ सेंच्युरीनंतर फटकेबाजी सुरू केली. आता दोन्ही बाजूनं वेगानं रन होऊ लागले. मॅचमधील पहिला सिक्स रशिदनं लगावला. त्याने यशच्या आधी नव्वदीमध्ये प्रवेश केला. रशिद नव्वदीमध्ये जातात यशनं सलग 2 फोर लगावत त्याला ओलांडले. त्यानंतर लवकरच या वर्ल्ड कपमधील त्याची पहिली सेंच्युरी त्याने पूर्ण केली. विराट कोहली (Virat Kohli) आणि उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यांच्यानंतर यश ढूल हा अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासात सेंच्युरी लगावणारा तिसरा भारतीय कॅप्टन (India U19 WC Final) आहे.

यशनं सेंच्युरीचा आनंद एक जोरदार सिक्स मारून साजरा केला. त्याला आऊट करणे ऑस्ट्रेलियन बॉलर्सना जमत नव्हते. अखेर रशिदनं मारलेला बॉल सरळ बॉलरच्या हाताला लागून स्टम्पला लागला आणि तो दुर्दैवी रन आऊट झाला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर रशिदचा एक अवघड कॅच फिल्डरनं योग्य पद्धतीने टिपल्याचा निर्णय थर्ड अंपायरनं दिला. रशिदची सेंच्युरी फक्त 6 रनने हुकली.

शेवटच्या ओव्हरमध्ये 27 रन!

यश आणि रशिद आऊट झाल्यानंतर पुढच्या 47 व्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन निघाला. त्यानंतर शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये भारतीय टीमनं 48 रन काढले. सातव्या क्रमांकावर आलेल्या दिनेश बानानं फक्त 4 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीनं नाबाद 20 रन काढले. त्याने आणि निशांत सिंधूने शेवटच्या 6 बॉलमध्ये 27 रन काढले. दिनेशनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत भारताचा स्कोअर 5 आऊट 290 वर (India U19 WC Final) पोहचवला.

स्पिनर्सचे जाळे

291 चा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. फॉर्मातील टीग वायलीला रवी कुमारनं (Ravi Kumar) झटपट आऊट केले. कोरी मिलर आणि कॅलवे कॅम्पबेल या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 68 रनची पार्टनरशिप करत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रघुवंशीनं 17 व्या ओव्हरमध्ये मिलरला आऊट केले. तर पुढच्याच ओव्हरमध्ये विकी ओस्तवालनं कॅम्पबेला परत पाठवत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला

पुणेकर विकीने आफ्रिकेला गुंडाळले, टीम इंडियाची विजयी सुरूवात

भारतीय स्पिनर्सनी त्यानंतर ठराविक अंतरानं विकेट घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था 1 आऊट 71 वरून 7 आऊट 125 अशी केली. एल. शॉने हाफ सेंच्युरी झळकावत ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे अंतर कमी केले. अखेर ऑस्ट्रेलियन टीम 41.5 ओव्हर्समध्ये 194 रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून विकी ओस्तवाल (Vicky Ostwal) सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्याने 3 विकेट घेतल्या. रवी कुमार आणि निशांत सिंधू यांना प्रत्येकी 2 तर अंगक्रिश रघुवंशी आणि कौशल तांबे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

पाचव्यांदा संधी

संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup 2022) एकही मॅच न गमावणाऱ्या टीम इंडियाची फायनलमध्ये लढत या स्पर्धेतील आणखी एक अपराजित टीम इंग्लंडशी शनिवारी होणार आहे. टीम इंडिया फायनलमध्ये (India U19 WC Final) पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इंग्लंडची टीम 24 वर्षांनी फायनलमध्ये आली असून दुसऱ्यांदा वर्ल्ड कप पटकावण्याचा प्रयत्न करेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: