फोटो – ट्विटर, क्रिकेट वर्ल्ड कप

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या (Under 19 World Cup) सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या चौथ्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांगलादेशचा (IND U19 vs BAN U19) 5 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतीय टीमनं 2 वर्षांपूर्वीचा हिशोब पूर्ण केला आहे. 2 वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या फायनलमध्ये बांगलादेशनं टीम इंडियाचा पराभव केला होता.

पुण्यातील जुन्नरच्या कौशल तांबेनं (Kaushal Tambe) सिक्स लगावत 112 रनंच टार्गेट पूर्ण केलं. भारतीय टीमनं हे टार्गेट 30.5 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. त्यापूर्वी बांगलादेशची इनिंग फक्त 37.1 ओव्हर्समध्ये 111 रनवरच संपुष्टात आली. सुरूवातीला 3 विकेट्स घेत बांगलादेशच्या बॅटींगला खिंडार पाडणारा डावखुरा फास्ट बॉलर रवी कुमारला (Ravi Kumar) ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

बांगलादेशचे लोटांगण

भारतीय कॅप्टन यश ढूलनं (Yash Dhull) टॉस जिंकत बॅटींग करण्यासाठी आव्हानात्मक असलेल्या पिचवर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रवीनं सुरूवातीलाच घातक स्पेल करत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं बांगलादेशची टॉप ऑर्डर परत पाठवली. रवीच्या स्पेलमुळे बांगलादेशची 8 व्या ओव्हरमध्ये 3 आऊट 14 अशी अवस्था झाली होती. रवीनं 7 ओव्हर्समध्ये फक्त 14 रन देत 3 विकेट्स घेतल्या.

रवीनंतर पुणेकर विकी ओस्तवालनं 2 विकेट्स घेत बांगलादेश मॅचमध्ये परतणार नाही, याची काळजी घेतली. तर कौशल तांबेनं कॅप्टन रकिबूल हसनला आऊट केले. बांगलादेशची एकवेळ अवस्था 7 आऊट 56 अशी झाली होती. त्यानंतर एसएम मेहरोब (30) आणि अश्फिुर जमां (16) यांनी 8 व्या विकेटसाठी 50 रनची पार्टनरशिप केली. त्यामुळे बांगलादेशनं 111 पर्यंत मजल मारली. भारतीय बॉलर्सनी सुरूवातीच्या वातावरणाचा पूर्ण फायदा (IND U19 vs BAN U19) घेतला.

भारताची खराब सुरूवात

112 रनचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. हरनूर सिंग शून्यावर आऊट झाला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) आणि एसके रशिद (SK Rashid) यांनी टीमला सावरले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 रनची भागिदारी केली. मुंबईकर रघुवंशीनं या मॅचमध्ये सर्वाधिक 44 रन काढले. तर कोरोनामधून परतलेल्या रशिदनं 26 रन केले.

U19 World Cup: 4 भारतीय बॅटर जे होतील उद्याचे रोहित आणि विराट

रघुवंशी आणि रशिद आऊट झाल्यानंतर सिद्धार्थ यादव आणि मागील मॅचचा हिरो राज बावा हे झटपट आऊट झाले. कॅप्टन यश ढूल एका बाजूने शांतपणे खेळत होता. त्याने कौशलच्या मदतीनं विजयावर शिक्कामोर्तब (IND U19 vs BAN U19) केले.

सेमी फायनल कुणाविरूद्ध?

अंडर 19 वर्ल्ड कपचे 4 वेळा विजेतेपद पटकावणारी भारतीय टीम पाचव्या विजेतेपदापासून 2 विजय दूर आहे. भारताची सेमी फायनलमध्ये लढत ऑस्ट्रेलियाविरूद्ध (India U19 vs AUS U19) 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. इंग्लंड विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात या स्पर्धेची पहिली सेमी फायनल 1 फेब्रुवारी रोजी होईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: